Monday, December 5, 2011

आयुष्य.....

आपण नेहमी बोलत असतो की मला लाइफ एन्जॉय करायची आहे. मला हे करायच आहे ते करायच आहे पण नक्की काय करायच आहे??? तेच माहित नसत. थोडा जरी फावला वेळ मिळाला तरी काय करू आणि काय नको अस होवून जात कारण खर तर माहितच नसत काय करायच आहे ते.

आठवडाभर काम केल्यावर हक्काची एक सुट्टी मिळते. ती तर सार्थकी लागलीच पाहिजे. पण तिथेही वाट्याला disappointment च येते कारण नेहमीच आपली एंजोयमेंट कोणा ना कोणावर अवलंबून असते. दारू प्यायची आहे मित्र हवेत. मूव्ही ला जायच आहे मित्र मैत्रिणी हवेत. नाक्यावर बसून टाईमपास करायचा आहे मित्र मैत्रिणी हवेत. अर्थात एंजोयमेंटसाठी मित्र मैत्रिणी हवेच. आयुष्य ह्यांच्याविना बेरंग आहे.

पण मला वाटत की रोजच हे सर्व आपल्या सोबत नसणार. मग काय एन्जॉय करण सोडून देयच? एकटेपणा कवटाळत रडत बसायच??? रडत बसण रोज काही शक्य नाही. कधी तरी निघा एकटेच घराबाहेर. रोजची पायाखालची वाट पकड़ा, चालत रहा. सुरवातीला वाटेल काय करतोय मी एकटा??? प्रश्न पडूदेत उत्तर शोधायला जाऊ नका. थोड्यावेळाने प्रश्न सुद्धा उत्तर शोधायला जाणार नाहीत. फ्री होवून जगण ह्यालाच तर म्हणतात.

एंजोयमेंट पण मनापासून करत असल तर ठीक आहे हो. कारण आपल्याला सवय असते एंजोयमेंट पण मनाला मुरड घालत करण्याची. तशी आपल्या आयुष्यात रिस्ट्रिक्शन खुप असतात. सर्वात मोठ तर पैशाच रिस्ट्रिक्शन, वेळेच रिस्ट्रिक्शन, मनाच रिस्ट्रिक्शन, समाजाच रिस्ट्रिक्शन.....बाप रे बाप किती हे रिस्ट्रिक्शन.

शेवटी हे ही खर आहे की एंजोयमेंट बेलगाम नसावी, तिला पण काही तरी रिस्ट्रिक्शन असाव. पण किती हे ज्याच त्याने ठरवाव. आपण नोर्मल आयुष्य जगताना पण त्यात दुनियाभरचे रिस्ट्रिक्शन आणून ठेवतो आणि स्वतःच स्वताच्या दुनियादारित अड़कुन पडतो. एक आयुष्य जगतो पण तेहि दुनियादारी करत.

ज्या मुलीला मनापासून भेटावस वाटत, जिच्या सोबत काही क्षण घालवावेसे वाटतात. तिला भेटतानाही दुनियादारी. तिच्या सोबत अख्ख आयुष्य काढायच असत पण आपल्याला भेटायला येताना तिला तिची मैत्रिण सोबत लागते. दुनियादारी अजुन काय??? असो. कोणावर आपला काही जोर नाही.

हे एवढ सगळ बोलण्याचा अर्थ एवढाच की केवढी ही दुनियादारी. थांबवा ती. नाक्यावर बसून वायफळ गप्पा मारत असाल तर खुशाल मारा, एन्जॉय करा. प्रेयसी सोबत असाल तर तो क्षण तुमच्या आयुष्यातला तिच्या सोबतचा शेवटचा क्षण आहे अस समजुन फुल ऑन एन्जॉय करा. जे स्वप्न तुम्ही जिवापाड जपलेल आहे ते पूर्ण करण्यासाठी तहान, भूक, झोप विसरून काम करा. प्रत्येक क्षण मनापासून फुल ऑन जगण हेच आयुष्य आहे.

हे जे मी लिहिल आहे तस मलाही आयुष्य नाही जगता येत दुनियादारी सोडून. पण जेंव्हा मी विचार करतो आयुष्य कस असाव तेंव्हा मला वाटत ते असच असाव.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

  

Sunday, November 20, 2011

स्वप्न!!!!!

हल्ली लिखाण करण कमी झालय. रोज वाटत आज एक तरी पोस्ट लिहावी. असंख्य विचार एकाच वेळेला मनातून भरधाव वेगाने पुढे निघून जातात. विचारांवर विचार करायलाही वेळ मिळत नाही. दिवस संपतो आणि मी परत दुसर्या दिवशीच्या रूटीन कामांमध्ये व्यस्त होवून जातो.

खुप काही वाचायच आहे. खुप काही लिहायच आहे. पण..... हा पण काही माझा पिच्छा सोडत नाही आहे. सकाळी बस ने कामावर जात असताना नेहमीच हा विचार असतो की आजतरी ही दुनियादारी सोडून मी स्वतः साठी वेळ देवू शकेन का? अर्थात प्रश्न अनुत्तरितच राहतो.

स्वप्न पूर्ण होइल की नाही हा खुप पुढचा प्रश्न आहे. पण स्वप्नपूर्तीच्या मार्गावर अडचणी वर मात करत पुढे चालत राहण गरजेच आहे. कारण स्वप्नपूर्तीची मजा तेंव्हाच आहे जेंव्हा त्याला तुमच्या मेहनतीची साथ आहे.

मित्रांनो आयुष्य एकदाच भेटत. फुल ऑन जगा. स्वतःच स्वप्न पूर्ण करा.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Sunday, October 30, 2011

किस का जोर चले इस दिल के आगे.....

आजकाल चित्त थारयावर नाही. जिथे तिथे चोहिकडे तीच दिसत असते. मग मन ही आपल ह्रदय नेइल तिकडे धावत असत. क्या करे "किस का जोर चले इस दिल के आगे" अशी काही स्थिती झाली आहे माझी. मनातल्या भावना सांगता ही येत नाहीत आणि गप्प ही बसता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी ही वेळ येतेच. ती तुम्हाला भेटेल की नाही ही खुप पुढची गोष्ट आहे पण तिला प्रपोज करण्या पर्यंतचा प्रवास हा निश्चितच अविस्मरणीय असतो. शेवटी काय हो एक म्हण आहे की,

"सुरवात ही पुष्कळदा घाबरवणारी असते, शेवट ही पुष्कळदा दुःखदायक असतो 
पण ह्या दोहों मधला प्रवास हा नक्कीच महत्वाचा असतो."

इथे तुम्ही "सुरवात ही पुष्कळदा घाबरवणारी असते" ह्यापेक्षा सुरवात ही पुष्कळदा "हृदयाचा ठोका चुकवणारी असते" असा ह्या ओळीचा अर्थ घ्या. 

अशा वेळी बघायला गेल तर आपण एकदम हतबल असतो. आपण काही शाहरुख़ खान नाही की एक स्माइल दिली की मुलगी वेडी होइल. म्हणतात ना की जगात काही अशा परीक्षा आहेत की ज्यांचा रिझल्ट १-२ टक्के लागतो तसच काही ह्या प्रेमाच्या परिक्षेच आहे. खुपजण परीक्षेला बसतात हो पण उत्तीर्ण एखादाच होतो. असो. शेवटी काय हो प्रपोज करण महत्वाच आहे, बाकी काही नाही. पास होण, फेल होण चालूच असत आयुष्यात. 

ह्या प्रवासात अडचणी पण खुप असतात. आता प्रेम तर झालेल असत पण अप्रोच कस करायच इथून सुरवात. एक तर ती अशा अविर्भावात असते की तिला काही ह्यातल माहितच नाही. (पण बघायला गेल तर ते तिला अगोदरच समजलेल असत) असो. पोरींचे नखरे अजुन काय हो!!!!! शेवट पर्यंत मनाचा ठाव लागत नाही एवढ मात्र खर.

ह्या काळात तिला भेटण कठीण असत. मनातल व्यक्त करण्यासाठी पण दिवसें दिवस वाट पहावी लागते. वरचे वर कॉल, दररोज न चुकता एखादातरी एसेमेस, तिच्या एका हाकेवर मदतीला तयार राहण हे सर्व कराव लागत. कधी कधी वाटत "Is it going to be worth?" शेवटी काय हो माणस आहोत आपण. थोड़े फार का होइना मतलबी असतोच की.

हा प्रवास आता तर सुरु झाला आहे. बघुया काय होते ते. शेवट काय आहे मला नाही माहिती. पण ह्या प्रवासातली मजा काही औरच आहे.

मित्रांनो आयुष्य खुप सुंदर आहे. फुल ऑन एन्जॉय करा. आपल स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करा. 

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 


Wednesday, October 26, 2011

शुभ दिपावली


वरील चित्र अंतरजालावरून साभार....

अभिजीत

Thursday, October 6, 2011

सर्वांना दसरयाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!


सर्वांना दसरयाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!

(वरील चित्र अंतरजालावरून साभार)

अभिजीत 

Monday, October 3, 2011

ccd मधली संध्याकाळ

हा आठवडा एवढा हेक्टिक होता, काय सांगू तुम्हाला??? फोन घेयची सुद्धा फुरसत नव्हती. तिच्या १० कॉल पाठी एका कॉल ला उत्तर देत होतो. त्यामुळे बाईसाहेब थोड्या रागावल्या होत्या. रविवार च ccd च प्रोमिस मी तिला केल होत म्हणून ती शांत होती. 



रविवारी संध्याकाळी ४ वाजता मी तिला बस स्टॉप वर पिक केल आणि आम्ही निघालो. आभाळ दाटून आल होत कुठल्याही क्षणी पावसाला सुरवात होणार होती. पाउस सुरु होण्याच्या आत माला ccd गाठायच होत म्हणून बाइक मी अजुन जोरात दामटवली. पण काही उपयोग झाला नाही आणि पाउस सुरु झाला. आडोशाला बाइक घेयची म्हन्टली तर मैडम ऐकायला तयार नाहीत, त्यांना पावसात भिजत बाइक राईड ची मजा घेयची होती. काय बोलणार मी, तिला नाही बोलू शकलो नाही. लड़िकपणे तिने हट्ट पुरवून करून घेतले आहेत माझ्याकडून आणि मी ही सहसा तिला कधी नाही बोलत नाही. असो. 



भिजत भिजत आम्ही एकदाचे ccd ला पोहचलो. नेहमीची जागा पकडली आणि आर्डर दिली. स्काय ब्लू रंगाच्या पंजाबी ड्रेस मध्ये खुप सुंदर दिसत होती राव. तिच्यावरून नजर हटवण कठीण होत. ccd मधला अंधुक प्रकाशातला अम्बियंस, बाहेर पडणारा रिमझिम पाउस, वाऱ्यासंग झुलणारी झाड, समुद्रात वाऱ्यावर डोलणार जहाज. सर्वच कस सुंदर, आल्हादायक, ह्रदय स्पंदवणार.



थोड्या वेळाने तिच्या सोबत चौपाटी वर आलो. मावळतिच्या सुर्याला पाहत काही वेळ एकत्र घालवला आणि निघालो. ती रविवारची ccd मधली संध्याकाळ आज ही मनात घर करून आहे.            

Monday, August 15, 2011

सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....


Image source : google

अभिजीत

Jan Lokpal Bill

A look at the salient features of Jan Lokpal Bill:
1. An institution called LOKPAL at the centre and LOKAYUKTA in each state will be set up

2. Like Supreme Court and Election Commission, they will be completely independent of the governments. No minister or bureaucrat will be able to influence their investigations.

3. Cases against corrupt people will not linger on for years anymore: Investigations in any case will have to be completed in one year. Trial should be completed in next one year so that the corrupt politician, officer or judge is sent to jail within two years.

4. The loss that a corrupt person caused to the government will be recovered at the time of conviction.

5. How will it help a common citizen: If any work of any citizen is not done in prescribed time in any government office, Lokpal will impose financial penalty on guilty officers, which will be given as compensation to the complainant.

6. So, you could approach Lokpal if your ration card or passport or voter card is not being made or if police is not registering your case or any other work is not being done in prescribed time. Lokpal will have to get it done in a month's time. You could also report any case of corruption to Lokpal like ration being siphoned off, poor quality roads been constructed or panchayat funds being siphoned off. Lokpal will have to complete its investigations in a year, trial will be over in next one year and the guilty will go to jail within two years.

7. But won't the government appoint corrupt and weak people as Lokpal members? That won't be possible because its members will be selected by judges, citizens and constitutional authorities and not by politicians, through a completely transparent and participatory process.

8. What if some officer in Lokpal becomes corrupt? The entire functioning of Lokpal/ Lokayukta will be completely transparent. Any complaint against any officer of Lokpal shall be investigated and the officer dismissed within two months.

9. What will happen to existing anti-corruption agencies? CVC, departmental vigilance and anti-corruption branch of CBI will be merged into Lokpal. Lokpal will have complete powers and machinery to independently investigate and prosecute any officer, judge or politician.

10. It will be the duty of the Lokpal to provide protection to those who are being victimized for raising their voice against corruption.

वरील सर्व माहिती अंतरजालावरून साभार.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Wednesday, August 3, 2011

10 Things To Do After Breakup.....

ह्या जगात प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला कुठे ना कुठे ब्रेकअप होत असतात, म्हणून ब्रेकअप ही काय मोठी गोष्ट नाही राहिली आता. रिलेशन तुटल्याने कदाचित त्रास होत असेल कमी जास्त प्रमाणात किंवा होत ही नसेल. काही ठिकाणी ब्रेकअप पार्टीज सुद्धा सेलिब्रेट केल्या जात असतील. ब्रेकअपच्या आधी बेकअप (backup) च्या तरतूदी करून ठेवल्या जात असतील. रिलेशन वाचवण्यासाठी भांडलात तर, "r u nuts?" म्हणून तुम्हाला हिणवल जाइल. समोरची व्यक्ति अशी काही वागेल तुमच्याशी की काळजाला भोक पडतील तुमच्या. साष्टांग नमस्कार घालून प्रेमाची भिक मागाल पण ती हि मिळणार नाही. असो.

मग आता ब्रेकअप नंतर काय कराव. पहिली गोष्ट रडण थांबवा. काही मिळत नाही रडून. आठवणी पुसून टाकायच्या आहेत तुम्हाला फक्त. सोप्प नाही आहे हे, पण अशक्य हि नाही आहे.

१) तिचा एखादा फोटो असेलच तुमच्याकडे. पाकिटात ठेवला असेल किंवा पुस्तकात, वहीत जपून ठेवला असेल. पाहिले काढ़ा तो फोटो बाहेर. फाडून टाका, जाळून टाका, फ्लश करून टाका. (jab we met style) "ना रहेगा बांस, ना बजेगी बासूरी." :-)

२) मोबाईल मध्ये तिचा नंबर सेव्ह असेलच. रिनेम करून टाका तीच नाव. Ignore ह्या नावाने नामकरण करा. (जेंव्हा जेंव्हा कॉल करण्याची इच्छा होइल, तेंव्हा तेंव्हा आपोआप इग्नोर करायला शिकाल)

३) अंतरजालावर (internet) खुपवेळा गप्पा (chat) मारल्या असतील तिच्या सोबत. chat सेव्ह सुद्धा करून ठेवल्या असतील. chat history पूर्ण डिलीट करून टाका.

४) आजपर्यंत मिळालेले गिफ्ट्स, ग्रीटिंग कार्ड्स एकतर तिला परत द्या. (जे अशक्य आहे) किंव्हा त्या सर्व वस्तु  कुठेतरी नेउन टाकुन द्या. (हा ऑप्शन चांगला आहे)

५) तिच्यासोबत ज्या ज्या ठिकाणी फिरला असाल, त्या सर्व ठिकाणी जाण पुढचे २-३ महीने टाळा.

६) घरी बसून तिची आठवण काढत बसण्यापेक्षा स्वतःला कुठल्या ना कुठल्या कामात बिझी करून घ्या.

७) फ्रेंड सर्कल वाढवा. आउटिंगला जा.

८) मनापासून जोपासलेल एखाद स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करा. 

९) कोणासमोरही तिचा आणि तुमच्या ब्रेकअपचा विषय काढू नका.

१०) वर सांगितलेल्या सर्व गोष्टी मनापासून करण्याचा प्रयत्न करा.

ब्रेकअप हि आयुष्यातली एक फेज आहे. आज ना उद्या हि फेज संपणार आहेच. वेळ आणि काळ कितीही वाईट असला तरीही एकनाएक दिवस तो सरणार आहेच. रात्रि नंतर दिवस आहेच की. 

आयुष्य एकदाच मिळत मित्रांनो. तुमच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि लाइफ एन्जॉय करा.

चला, निरोप घेतो. परत भेटूच. 

अभिजीत   

Saturday, July 30, 2011

Monday, July 25, 2011

Breakup to Backup : सारांश माझ्या विचारातून

Breakup to Backup हा ब्लॉग लिहीण्यापाठी कारण एवढच होत की, Just move on in life friends.

काही दिवसां पूर्वी माझ्या एका मित्राने एक खुप चांगला एसेमेस मला पाठवला होता. जो मला तुम्हा सर्वांसोबत शेअर कारावास वाटतो.  

Life is too short  to wake up in the morning with regrets,
so love the people who treat you right,
forget about the ones who don't.
Believe that everything happens for a reason.
If you get a chance, take it.
If it changes your life, let it.
Nobody said life would be easy,
they just promised it would be worth it!

अभिजीत

Breakup to Backup : भाग - १

रात्रीचे १२.३० वाजले होते. मोबाइल वर मेसेज आला. झोप खुप आली होती पण रिप्लाय देण भाग होत. मेसेज काही अशा प्रकारचा होता.

नैना : hi, dear...r u der????? plzzz ans...
         meet me 2morrow @ Korum 6 pm sharp.....
         waiting for ur reply...love u...miss u..

अभि : hey, sweetheart.....i m here.....
         yes, definately i will b der 2morrow.....done.....
         love u.....

नैना : ok..love u..
         gn..tc..

अभि : ya...tc.....

दुसर्या दिवशी प्रोजेक्ट संबधी काही काम होती, ती पूर्ण केली. लंच जरा उशीराच झाल. संध्याकाळी ४ वाजता घरी आलो. काही pdf फाइल सेंड करायच्या होत्या, त्या केल्या आणि निघालो. बाइक काढली, साधारण ५.४५ ला मी ठरल्या ठिकाणी पोहचलो. नैना चा काही थांगपत्ता नव्हता. तिला कॉल केला तर तिचा नंबर नॉट रीचेबल होता. थोड्यावेळ वाट पहिली.

@ 6.00 pm : परत कॉल केला. ह्या वेळेस कॉल लागला. पण तिने काही उचलला नाही.
@ 6.17 pm : परत कॉल केला. पण तिने काही उचलला नाही.
@ 6.45 pm : परत कॉल केला. पण तिने काही उचलला नाही. 
@ 7.03 pm : परत कॉल केला. ह्या वेळेस कॉल उचलला पण समोरून कोणतरी मुलगा बोलत होता.

त्याला विचारल तू कोण आहेस??? नैना कुठे आहे??? ह्यावर तो बोलला, मी तिचा मित्र जयेश. ती आज बिझी आहे. ती तुला नंतर कॉल करेल आणि त्याने फोन ठेवला. म्हंटल ठीक आहे. नंतर मी मित्रांना कॉल केला आणि poptates मध्ये ती संध्याकाळ सार्थकी लावली.

Breakup to Backup : भाग - २

त्यादिवशी रात्रि १२.३० वाजता पुन्हा मेसेज आला. झोप खुप आली होती पण रिप्लाय देण भाग होत. मेसेज काही अशा प्रकारचा होता.

नैना : hi, dear...r u der????? plzzz ans...
         sorry, i didn't came today. I was really busy.
         meet me 2morrow @ Korum 6 pm sharp.....
         waiting for ur reply...love u...miss u..

अभि : hey, sweetheart.....i m here.....its ok.....
         yes, definately i will b der 2morrow.....done.....
         love u.....

नैना : ok..love u..
         gn..tc..

अभि : ya...tc.....


दुसर्या दिवशी ५.४५ ला मी ठरल्या ठिकाणी पोहचलो. पाहतो तर काय? नैना आणि जयेश. ३ तिकिटे नैना ने अगोदरच काढून ठेवली होती. वाटल होत नैना आणि मीच असू मूव्हिला. पण असो. कोक, पोपकोर्न आणि मूव्ही  मस्त एन्जॉय केला आणि घरी आलो. पाउस खुप होता म्हणून नैना जयेश सोबत त्याच्या गाडीतून घरी गेली. 

त्याच रात्रि १२.३० वाजता पुन्हा मेसेज आला. झोप खुप आली होती पण रिप्लाय देण भाग होत. मेसेज काही अशा प्रकारचा होता.

नैना : hi, dear...r u der????? plzzz ans...
         sorry, jayesh was wid me. he wants to see d movie &
         he don't have any company,
         so he came wid me.
         meet me 2morrow @ pizza hut 6 pm sharp.....
         waiting for ur reply...love u...miss u..

अभि : hey, sweetheart.....i m here.....& its ok.....
         yes, definately i will b der 2morrow.....done.....
         love u.....

नैना : ok..love u..
         gn..tc..

अभि : ya...tc.....

Breakup to Backup : भाग - ३


दुसर्या दिवशी ६ वाजता नैना सोबत मी पिझ्झा हट मध्य आलो. आर्डर दिली आणि बसलो. नैना खुप सुंदर दिसत होती. स्काय ब्लू कलरचा पंजाबी ड्रेस खुप उठून दिसत होता तिच्यावर. नटा-थटायला खुप आवडत मैडमना. मी एकटक बघत होतो तिच्याकडे. तेवढ्यात आर्डर आली. पिझ्झा खावुन फस्त केला. नैनाला बाइक वरून घरी सोडल आणि घरी आलो. आज नैना काहीशी शांत दिसत होती. हसत होती, बोलत होती, पण.....

तेवढ्यात मोबाईल वर मेसेज आला. झोप खुप आली होती पण रिप्लाय देण भाग होत. मेसेज काही अशा प्रकारचा होता.

नैना : hi, dear...r u der????? plzzz ans...
         I think, u don't love me anymore.
         u don't have any problem if i m wid somebody.
         u r not possesive for me.
         If u love me then meet me 2morrow @ korum 6 pm sharp.....
         waiting for ur reply...love u...miss u..

अभि : hey, sweetheart.....i m here.....& its not like dat.....
         yes, definately i will b der 2morrow.....done.....
         love u.....

नैना : ok..love u..
         gn..tc..

अभि : ya...tc.....

दुसर्या दिवशी ५.४५ ला मी ठरल्या ठिकाणी पोहचलो. आज नैना आणि मीच मूव्ही ला आलो होतो. मूव्ही पाहिला एन्जॉय केल. नैना ला ९.३० ला तिच्या घरी सोडल आणि मी एका रेस्टोरंट मध्ये आलो. टेबल अगोदरच बुक केल होत. सायली आधीच आली होती. वाट पाहत बसली होती. कालच तिने माझ्या प्रपोज ला होकार कळवला होता. आज तिची आणि माझी पहिली डेट होती. ७ दिवसांपूर्वी सायली माझी फ़क्त मैत्रिण होती आणि आज प्रेयसी. डिनर आर्डर केल आणि तिच्याशी गप्पा मारत होतो.

तेवढ्यात मोबाईल वर नैनाचा मेसेज आला. मेसेज काही अशा प्रकारचा होता.

नैना : hi, dear...
         had ur dinner???
         
अभि : hey, sweetheart.....
         no...not yet.....& urs???

नैना : no, not yet...helping mom in kitchen..
         ok..but have ur dinner first..love u..
         gn..tc..

अभि : ya...love u...tc.....

थोड्या वेळात आर्डर आली. हे सायली आणि माझ पहिल रोमेंटिक कैंडल लाइट डिनर.


Breakup to Backup : भाग - ४

डिनर झाल, सायली सोबत होटलच्या पार्किंग लोट मध्ये आलो. बाइक काढत होतो, तेवढ्यात जयेशची कार पार्किंग लोट मध्ये पार्क झाली. नैना आणि जयेश कार मधून बाहेर आले. बहुतेक ते ही डिनरलाच आले असावेत :). माझी बाइक त्यांच्यापासून ५ फूटावर उभी होती. नैना ने माझ्याकडे आणि सायली कड़े पाहिल. ती एकदम शॉक झाली. मी नैना कड़े पाहिल. मला कुठेनाकुठे हसू आल. मी नैना ला स्माइल दिली आणि सायली सोबत निघून गेलो.

सायली ला तिच्या घरी ड्रॉप केल आणि घरी आलो. नविन प्रोजेक्टवर उद्यापासून काम सुरु करायच होत. त्यासाठी काही पॉइंट्स काढत बसलो होतो. रात्रीचे १२.३० वाजले होते. मोबाइल वर मेसेज आला. काम खुप होत   पण रिप्लाय देण भाग होत. मेसेज काही अशा प्रकारचा होता.  

सायली : hi, dear...r u der?????
            2morrow @ R-mall 7 pm sharp.....
            love u...miss u..

अभि : hey, sweetheart.....
         yes, definately i will b der 2morrow.....done.....
         love u.....

सायली : ok..love u..
            gn..tc..

अभि : ya...tc.....

"Insecurities leads to breakup but provides backup."

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


(ह्या कथेतली सर्व पात्रे काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही जिवीत वा मृत व्यक्तिंशी संदर्भ नाही, अगर आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)

अभिजीत 



Quote

Money taste better with volumes.

ABHIJEET

Sunday, July 17, 2011

Monday, June 20, 2011

But sometimes winning is not just about finishing 1st.....

स्वप्न.....किती कठीण आहे समजायला. तरीही प्रत्येकाच कहिनाकाही स्वप्न आहेच की. स्वप्न म्हणजे नक्की काय????? ते निर्माण कस होत????? त्याची व्याख्या काय??? संकल्पना काय??? स्वप्न हा शब्द कुठून आला??? प्रश्न खुप पण उत्तर एकही नाही.

माझ्यामते आपण आपले जीवन का जगत आहोत? ह्याचे उत्तर म्हणजे "स्वप्न". स्वप्न म्हणजे एक प्रवास. माझ्यामते स्वप्न अस असाव की ते आपल्याला आयुष्यभर पुरेल. स्वप्नाचा शेवट कधी असू नये. ते कधीही न संपणार असाव. प्रयत्नशील राहून फ़क्त एकेक पड़ाव पार करत रहाव आपण.

समजण्यासाठी थोड सोप्प करुया आपण. खुप जणांना MTV Roadies बद्दल माहित असेल. आत्ताच त्याचा ८ वा सीझन संपला. (आंचल रोडीज टायटल जिंकली). असो. मी मुळ मुद्द्याकडे येतो. रघु राम हा रोडीजचा निर्माणकर्ता (creator) आहे. गेली ८ वर्ष हा त्याचा प्रवास सुरु आहे (successfully). फ़क्त पड़ाव पार होत आहेत. पहिला सीझन, मग दूसरा, मग तीसरा,...............आठवा. पुन्हा तो ९ वा सीझन घेवुन येईलच की. मगाशी म्हंटल्या प्रमाणे स्वप्न अस असाव की ते आपल्याला आयुष्यभर पुरेल. स्वप्नाचा शेवट कधी असू नये.

काही लोक स्वप्नपूर्तीसाठी एवढी डेस्परेट असतात की, त्या प्रवासातली मजाच त्यांना अनुभवता येत नाही. व्हिक्टरी आनंदाने स्विकारता मग डिफीट का नाही स्विकारत हो. (डिफीट झक मारून स्विकारण वेगळ आणि आनंदान स्विकारण वेगळ). एक कोट मला तुम्हा सर्वांशी शेअर करावासा वाटतो.

Everybody wants 2 be a winner. Who wouldn't want 2 reach d finish line 1st? But sometimes winning is not just about finishing 1st : Ranvijay

आयुष्य एकदाच भेटत. फुल ऑन एन्जॉय करा.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Monday, May 30, 2011

पाउलखुणा.....


मातीतल्या तिच्या पाउलखुणा
कुठ दूरsssssssवर धुक्यात हरवलेल्या 
माझ्या सोबतीला फ़क्त 
आता तिच्या पाउलखुणा.

अभिजीत

(फोटो संदर्भासाठी गूगल वरून घेतला आहे)

Wednesday, May 25, 2011

पण जिथे प्रेम आहे तिथे दुरावाही आहे.....

सकाळचे ५ वाजले होते. बाहेर मूसळधार पाउस पडत होता. बालकनी मध्ये मी तयार होवून पाउस जायची वाट पाहत होतो. अजुनही बाहेर अंधार होता. काल रात्रीच माझ तिच्याशी बोलण झाल होत. तेवढ्यात तिचा एसेमेस (sms) आला. मी जेकेट चढवल आणि निघालो. बाइकमध्ये काल रात्रीच पेट्रोल फूल केल होत. बिल्डिंग खाली आलो. घरासमोरील मंदिरात पहाटेच भजन चालू होत. पावसाचा जोर आता कमी झाला होता. आभाळ बऱ्यापैकी स्वच्छ झाल होत. बाइक काढली, हेलमेट चढवल आणि मी निघालो. मनात आज एक वेगळीच शांतता होती, कुठलीही चलबिचल नव्हती. मेन रस्त्यावर ५ मिनिटे बाइक चालवून मी चौकात आलो. डाव्या हाताला बाइक वळवली. तेवढ्यात तिचा एसेमेस आला की बस निघाली आहे, तू कुठे आहेस??? मी बाइक दामटवली, रस्त्यात मला तिचे आई वडिल दिसले, ते तिला बस स्टैंड वर सोडायला आले होते. बस स्टैंडच्या पुढच्या चौकात मला तिची बस दिसली. मी बाइक अजुन जोरात दामटवली आणि बस सोबत आलो. तिने अगोदरच मला पाहिल होत. ती जेकेट घालून तयार होती. पुढच्या सिग्नल्ला बस थांबली आणि ती खाली उतरली. रिझर्व्हेशन करून पैसे अगोदरच पेड़ केले होते म्हणून कंडक्टर काही बोलला नाही. तिला घेवुन मी निघालो पुण्याच्या दिशेने.



साधारण ७ च्या आसपास आम्ही पनवेल ला आलो. पावसाचा जोर आता चांगलाच वाढला होता. एका होटेलमध्ये सकाळचा नाश्ता करण्यासाठी आलो. गेला १ तास आम्ही एकमेकांशी एकही शब्द बोललो नव्हतो. आता समोरासमोर असून सुद्धा मी मेनू कार्ड उगाचच आलटून पालटून पाहत होतो तर ती कधी मोबाईल मध्ये तर कधी माझ्याकडे पाहत होती. शेवटी पोटभर कांदेपोहे आणि चहा असा नाश्ता उरकला आणि निघालो. बोलायाच खुप काही होत पण............... 

आमचा पुढचा स्टॉप होता लोणावळा. तिच्या सोबतचा हा प्रवास कधीच संपू नये अस वाटत होत. साडे नऊ - दहाच्या सुमारास आम्ही लोणावळयात आलो. मामा मामीसाठी तिने चिक्की आणि जेली घेतली आणि आम्ही निघालो. लोणावळयात अक्षरशः गारठायला झाल होत. मला चहाची खरच गरज होती. हे तिला कळल असाव. तिने खुणेनेच होटेलपाशी थांबण्यास सांगितल. पुढच्याच क्षणी आम्ही होटेल मध्ये चहा घेण्यास बसलो. न राहवून मी तिला विचारल मग ह्या नंतर परत कधी भेटणार??? पण आता पर्यंत रोखून ठेवलेल्या आसवांना तिने वाट मोकळी करून दिली. डोळ्यातले अश्रुच शब्दांची भूमिका बजावत होते.


मी काहीच बोललो नाही. बाइक काढली आणि आम्ही निघालो. शेवटच मला तिला डोळे भरून पहायच होत. मी aamby valley च्या दिशेने बाइक फिरवली. ती काहीच बोलली नाही. प्रेम असेल तर विश्वासही असतो की हो. रस्ता खुप सुंदर होता. नागमोडी वळणे घेत आम्ही जात होतो. जसजस आम्ही वर जात होतो तसतस गारठा वाढत चालला होता, धुक खाली उतरत होत. आयुष्यातला तिच्या सोबतचा अविस्मरणीय अनुभव.


एका ठिकाणी मी बाइक थांबवली. ती बाइकवरून उतरली. खुप काही बोलायच होत तिला आणि मला. पण आम्ही काहीच नाही बोलू शकलो. काहीही न बोलता उमजण हेच तर प्रेम आहे. आम्ही फ़क्त एकमेकांना पाहत राहिलो. एकमेकांपासून दूर होण्याच दुखः होत. ती काहीच न बोलता माझ्या मिठीत विसावली. त्यावेळेस घरून आलेले सर्व कॉल तिने रिजेक्ट केले. प्रेमाची पावतीच होती ती.


आता आम्ही पुण्याकडे येण्याची वाट धरली. वाटेत दुपारच जेवण उरकल. संध्याकाळी ५ वाजता मी स्वारगेटला तिला तिच्या मामा मामीकड़े सोडल. काही दिवसातच ती हायर स्टडीजसाठी यूरोपला जाणार होती. आयुष्यात एक मोठा पॉज (pause) येणार होता. आता आम्हाला एकमेकांचा निरोप घेण कठीण झाल होत. पण जिथे प्रेम आहे तिथे दुरावाही आहे.

आणि एक गोष्ट सांगायची राहिली की हो, बस लेट होती ही थाप घरच्यांना पटली.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.
(ह्यातले सर्व फोटो संदर्भासाठी गूगल (google) वरून घेतले आहेत)

अभिजीत

Sunday, May 22, 2011

Thoughts.....

Everytime I get inspired, when i read these peoples thought. They are the Best One. Respect.....Here are some of my favourite thoughts.....


"Everything tells me that I am about to make a wrong decision, but making mistakes is just part of life. What does the world want of me? Does it want me to take no risks, to go back to where I came from because I didn't have the courage to say "yes" to life?"
— Paulo Coelho (Eleven Minutes)


"Waiting hurts. Forgetting hurts. But not knowing which decision to take is the worst of suffering."
— Paulo Coelho



"Love is an untamed force. When we try to control it, it destroys us. When we try to imprison it, it enslaves us. When we try to understand it, it leaves us feeling lost and confused."
— Paulo Coelho



"Many young men started down a false path to their true destiny. Time and fortune usually set them aright."
— Mario Puzo (The Godfather)



"Power wears out those who do not have it."
— Mario Puzo



"Power isn't everything ...its the only thing."
— Mario Puzo (The Last Don)



"Life is Beautiful"
— Mario Puzo (The Sicilian)



अभिजीत



Friday, May 20, 2011

We're very, very pissed off.....

२-३ वर्षांपूर्वी Fight Club हा मूव्ही पहिला होता. आज ही तो माझ्या फेवरेट मूव्ही लिस्ट मध्ये आहे. ह्या मूव्ही मधले  Edward Nortan (The Narrator) आणि Brad Pitt (Tyler Durden) ह्या दोघांमधले संवाद एवढे फाडू आहेत की ते तुम्हाला आयुष्या बद्दल विचार करण्यास भाग पाडतील.

Soure : Google

इथे सर्वांची स्वप्न पूर्ण नाही होणार आहेत. काही जणच त्यांची स्वप्न पूर्ण करू शकणार आहेत. खूप जणांना त्यांची डेस्टीनी एक्सेप्ट करावी लागणार आहे. कारण काही असो त्यापुढे (डेस्टीनी पुढे) जाता येणार नाही.

Fight Club मध्ये Tyler Durden चा एक संवाद आहे. विचार करण्यास भाग पाडणारा.

"Man, I see in Fight Club the strongest and smartest men who've ever lived. I see all this potential, and I see it squandered. God damn it, an entire generation pumping gas, waiting tables — slaves with white collars. Advertising has us chasing cars and clothes, working jobs we hate so we can buy shit we don't need. We're the middle children of history, man. No purpose or place. We have no Great War. No Great Depression. Our great war is a spiritual war. Our great depression is our lives. We've all been raised on television to believe that one day we'd all be millionaires, and movie gods, and rock stars, but we won't. We're slowly learning that fact. And we're very, very pissed off."

Tyler Durden (Fight Club)

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 

Thursday, May 19, 2011

Life is so beautiful.....

आयुष्यात किती अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या चेहर्यावर स्मित हास्य उमटवटात????? ज्या आपल्याला सांगतात की, "आयुष्य खुप सुंदर आहे." माझ्या मते पुष्कळ आहेत. स्वप्नपूर्तीसाठी केलेले प्रयत्न, एखाद्या छोट्या बाळाच निरागस हसण, प्रेमात पडण, हिवाळ्यातली एखादी थंड पहाट, पावसात चिंब भिजलेली रात्र, ग्रीष्मातली सांयकाळ, अस्ताला चाललेला सूर्य, मित्रांसोबत शुद्ध हरपे पर्यंत ढोसलेल्या पार्ट्या, पावसात एखाद्या टपरीवर वाफाळलेल्या चहासोबत मारलेले सिगरेटचे झुरके, एखाद्या निर्जन रस्त्यावर अनुभवलेली नीरव शांतता, समुद्र किनारी तिचा हात हातात घेवुन अस्ताला चाललेल्या सुर्याला साक्षी ठेवून आयुष्यभर एकत्र राहण्याच्या खाल्लेल्या शपथा, भर पावसात एकाच छत्रीखाली तिच्या सोबत शक्य तेवढ्या धीम्या गतीने चालतानाचा अनुभव, सतत अपयश येवुनही "Never Say Die" ह्या एटीट्युड ने जगण.....किती सांगू????? यादी खूप मोठी आहे.

हे सर्व अनुभवण हेच आयुष्य आहे. आयुष्य खुप सुंदर आहे मित्रांनो. फ़क्त काळजी करत, दुनियादारी करत, रडत, टेन्शन घेत आयुष्य घालवू नका.

Mario Puzo ह्या लेखकाने त्याच्या The Godfather ह्या पुस्तकात एक छान वाक्य लिहिल आहे.

"He smelled the garden, the yellow shield of light smote his eyes, and he whispered, "Life is so beautiful." 
... 
Yet, he thought, if I can die saying, "Life is so beautiful," then nothing else is important."

-Mario Puzo (The Godfather)

आयुष्य ह्या पेक्षा वेगळ काय असू शकत?????

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Wednesday, May 18, 2011

We need approvals......

आपल आयुष्य हे नेहमी दुसर्यांवर अवलंबून असत. दुसर्या व्यक्तींच्या होकारावर आणि नकारावर आपल्या आयुष्यातल्या खुप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. मनासारख घडल तर आपण खुष, नाही घडल तर आपण दुखी. 

थोडक्यात काय????? "We need Approvals from somebody."

ह्यावर मी एवढच म्हणेन.....(जे आधीच एका व्यक्तीने म्हंटल आहे)

mujhe tumhare approval ki jarurat nahi hai.....
I like myself.....
f*** you all.....

आयुष्य एकदाच भेटत. ते कोणाच्या अप्रूवलच मोहताज नाही. स्वतः कोन्फीडंट रहा आणि आयुष्य एन्जॉय करा.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Thursday, May 5, 2011

Now I don't give a DAMN

हल्ली मी ब्लॉग्गिंग पासून थोडा दुरावा केला आहे. वेळ मिळत नाही म्हणा किंवा थोड़े दिवस लिखाण नाही करायच आहे अस म्हणा. असो. मी लवकरच येणार आहे तुमच्या समोर माझ्या काही नविन ब्लोग्जसह. आज पोस्ट टाकण्याच कारण एवढच की मी फेसबुक वर एक कोट वाचला. एक मुलीने पोस्ट केला होता तो तिच्या फेसबुक प्रोफाइल वर. तो कोट असा होता.

                              Time älöne cän pröve the wörth öf any relationship..
        As time göes by, we löse the fälse önes änd the best önes stäy.!

वाचायला आणि ऐकायला किती छान वाटत की नाही. पण रिलेशन तुटण्यासाठी हे लोक फ़क्त एकाच व्यक्तीला जबाबदार कसे ठरवू शकतात. टाळी एका हाताने नाही वाजत हो. ज्यांना फ्रेंडशिप मधला एफ कळत नाही अशा लोकांनी असे कोट्स लिहू नये. एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी जबाबदार ठरवण खुप सोप्प आहे हो आणि असे लोक अशा गोष्टी खुप चांगल्या प्रकारे करू शकतात. असे लोक तुमच्या समोर गोड बोलतील आणि तुमच्या पाठी तुमच्या बद्दल वाईट बोलतील. अर्थात अशा व्यक्तिंना पाठीशी घालणारे ही पुष्कळ आहेत. false ones आणि best ones ह्यातला फरकच जिला कळला नाही, तिला रिलेशनशिप काय कळणार हो. एक व्यक्ति गेली कित्येक वर्ष मित्र म्हणून तिच्यासोबत होता अगदी काल परवा पर्यंत. जेंव्हा बरेच जण मैत्री तोडून निघून गेले, तेंव्हाही तो तिच्या सोबत होता. जीला ही मैत्री कळली नाही. तिला आपण काय बोलू शकतो. असो. ह्यावर मी एवढच बोलेन की, "Now I don't give a DAMN".

काही व्यक्ति खरच अशा असतील की ज्यांच्यासाठी ह्या कोटचे मायने खरे असतील. ते ह्या प्रसंगातून गेले असतील. पण काही लोक स्वतःची चुकी असताना असे कोट्स वापरून दुसर्याला दोषी ठरवत असतील तर हे चुकिच आहे.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Wednesday, April 6, 2011

लोणावळा : भाग २ - एक प्रयत्न आयुष्याकड़े पाहण्याचा

थोड्यावेळ गाडीत झोप काढायच ठरवल पण झोप काही येत नव्हती. साधारण १० च्या सुमारास मी लोणावळा स्टेशन वर उतरलो. वडिलांचा एक मित्र अगोदरच स्टेशन वर आला होता. त्याच्या बाइक वरून आम्ही पाहिले अन्नपूर्णा होटेल मध्ये गेलो. स्टेशन पासून चालत १० मिनिटांच्या अंतरावर हे होटेल आहे. (नाश्ता करण्यासाठी हे चांगल होटेल आहे.) आम्ही नाश्ता उरकला आणि निघालो. ठरलेल्या ठिकाणी पोहचलो. माझ २-३ तासांच काम होत. ते उरकल आणि आम्ही निघालो.

काम अपेक्षेपेक्षा लवकर झाल होत. एक होटेल मध्ये दुपारच जेवण उरकल आणि वेळ होता म्हणून त्या माणसाच्या घरी गेलो. सिंहगड युनिव्हर्सिटीच्या पायथ्याशी त्याच घर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरून तुम्ही जात असाल तर डाव्या हाताला तुम्हाला डोंगरात  उभारलेली सिंहगड युनिव्हर्सिटी दिसते. संध्याकाळी एक्सप्रेस मार्गावरून खुप विलोभनीय दृश्य दिसत. डोंगरापलिकडे अस्ताला चाललेला सूर्य. युनिव्हर्सिटीवर पडणारी मावळत्या सुर्याची किरणे. डोंगरांना कापत निघालेला मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे. क्षितिजावर चढ़णारी संध्याकाळची नशा. थंड वारयाची लाट. सर्वच कस सुंदर. शब्दात मांडता न येण्याजोग. जस जस सिंहगड युनिव्हर्सिटीच्या पायथ्याशी येत होतो. तस तस आठवणी दृष्टी पटलावर येत होत्या. वाटत होत निघाव गाड़ी घेवुन मुंबई पुणे हायवे वर, थांबाव त्या ठिकाणी, पाहत रहाव त्या अस्ताला जाणार्या सुर्याला. त्या मोहक दृश्याला. तेवढ्यात आम्ही त्याच्या घरी आलो. थोडा वेळ थांबलो आणि निघालो कारण परतीचा प्रवास करायचा होता. तसे २ तास माझ्या हातात होते पण त्याला दुसर काही काम होत म्हणून मी शेवटचे २ तास स्टेशन वर थांबायच ठरवल.

स्टेशन वर आलो. स्टेशन वरचे सर्व पंखे बंद होते. सर्व इंडिकेटर बंद होते. गरमा बऱ्यापैकी जाणवत होता. बसण्यासाठी जागा शोधत होतो. थोडा पुढे आलो. तिथे एक खुर्च्यांची रांग होती. तिथे एक मुलगी बसली होती. आमच्या दोघांमध्ये एक खुर्चीच अंतर ठेवून मी बसलो. तिने कुठलातरी भारी परफ्यूम लावला होता. त्यामुळे त्या उकाड्यातही एक फ्रेशनेस जाणवत होता. ती काही शांत बसली नव्हती. मोबाईल चेक करत होती. बैग उघडत होती. कुठलीतरी क्रीम काढून ओठांना लावत होती. एक सेकंदा पुरता वाटुन गेल किती काम असतात मुलींना. नेहमी बिझी असतात त्या :-) थोड्या वेळाने तिच्या प्रियकाराचा फ़ोन आला असावा कारण बोलत बोलत ती निघून गेली. एखाद वेळेस स्टेशन बाहेर तो तिची वाट पाहत असावा. ती गेल्यावर सहज आजुबाजुला नजर फिरवली. तर कोणी स्टेशन वर रांग लावून उभे होते. कोणी शांत बसून होते. कोणी त्या उकाड्यातही झोपा काढत होते. तेंव्हा मला एवढ कळल की माणसाला खरच झोप आली असेल तर ए.सी., पंखा, गादी ह्या गोष्टींची गरज नाही पडत. एक लाकडी बाकडा सुद्धा पुरतो. सकाळी ए.सी. कोच मधल्या पुशबेक सीटवर सुद्धा मला झोप येत नव्हती. असो.

थोड्या वेळाने २ मुली आणि १ मुलगा खुप सार लगेज घेवुन स्टेशन वर आले. त्यातले १ मुलगा आणि १ मुलगी (बहुतेक ते कपल असावेत) कुठेतरी गेले. उरलेली एक मुलगी सामानावर लक्ष ठेवण्यासाठी तिथेच थांबली. तिलाही काही काम नव्हत. मलाही काही काम नव्हत. मी कधी तिच्याकडे पाहत होतो तर कधी ती माझ्याकडे. वेळ घालावण हच एक उद्देश होता तिचा आणि माझा :-) वेळ जाता जाता जात नव्हता. शेवटचा एक तास राहिला होता. अजूनही पुढे २ तास प्रवास करून मी घरी पोहचणार होतो. किती कंटाळा आला होता काय सांगू तुम्हाला. पण एक खुप चांगली गोष्ट घडली. एक सुंदर मुलगी स्टेशनवरच्या त्या रांगेत येवून उभी राहिली. ती रांग जनरल डब्यासाठी होती. लोणावळ्याला २ जनरल डब्बे उघडले जातात मुंबईसाठी. गाडी आल्यावर लोकांना रांगेने सोडल जात डब्यात. असो. पण तिला पाहिल्यावर कंटाळा कुठल्याकुठे निघून गेला. दिसायला खुप भारी होती राव. लाल रंगाचा टॉप, ब्लैक जीन्स, मनगटावर एक स्टायलिश घड्याळ, डोळ्यांवर एक मोठा गोगल, केस घट्ट बांधलेले, कानात इअर फ़ोन, हातात मोबाईल असा काहीसा तिचा गेटअप होता. त्या वेळेस त्या स्टेशन वर तीच एक सुंदर मुलगी होती. तिच्यावरून नजर हटण कठीण होत. तिलाही कळल की मी तिच्याकडे पाहत आहे. कधी ती माझ्याकडे पाहत होती तर कधी मी तिच्याकडे. पण गाडी येण्याची वेळ झाली आणि मी ए.सी. चा डब्बा जिथे येणार होता तिथे जावून उभा राहिलो.

थोड्यावेळातच गाडी आली. ए.सी. मध्ये विंडो सीट भेटली होती. सकाळी मी ह्याच गाडीने आलो होतो आणि ह्याच गाडीने घरी चाललो होतो. सकाळच्या प्रवासाची ती खतरनाक सुरवात, चाळीशी पार केलेला तो ग्रुप, एक्सप्रेस हायवे च्या त्या आठवणी, लोणावळा स्टेशन वरची ती मुलगी, अशा खुप आठवणी मनात साठवुन मी परतीच्या प्रवासाला लागलो.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Tuesday, April 5, 2011

लोणावळा : भाग १ - एक प्रयत्न आयुष्याकड़े पाहण्याचा

सुमारे एक दिड महीन्यानंतर ह्या ब्लॉगवर पोस्ट टाकत आहे. ह्या दरम्यान बाकीच्या माझ्या २ ब्लॉग वर मी अधून मधून पोस्ट टाकत होतोच. तुम्ही आता पर्यंत माझ्या तिन्ही ब्लॉगला दिलेला प्रतिसाद पाहून खुप बर वाटल. मी ठाण्यात राहतो. जेंव्हा माझ्या ब्लॉगला भारता बाहेरून विझिट दिल्या जातात त्या वेळेच्या भावना मला शब्दात नाही व्यक्त करता येणार. मला ओळखणारे माझे ब्लॉग वाचत आहेतच. जे माझ्यासाठी अनोळखी आहेत तरीही वारंवार माझ्या ब्लॉगला ज्यांच्या विझिट आहेत. अशा सर्व व्यक्तींचे मनापासून आभार. मी लेखक नाही. मी एक सामान्य व्यक्ति तरीही एक प्रयत्न आयुष्याकड़े पाहण्याचा.

गेल्या आठवड्यात लोणावळ्याला गेलो होतो. काम होत थोड. जाण्या-येण्याच रेल्वेच ए.सी.च बुकिंग अगोदरच केल होत. प्रवास सर्वात जास्त सुखकर कसा होइल ह्या कड़े माझ नेहमी लक्ष असत. असो. सकाळची ट्रेन होती. मी माझ्या आरक्षित असलेल्या सीटवर जावून बसलो. प्रवासाची सुरवात एकदम खतरनाक झाली. माझी सीट अगोदरच कोणीतरी पुशबेक करून ठेवली होती. म्हणून मी बटन प्रेस करून सीट पूर्ववत केली. पण त्यावेळेस  माझ्या लक्षात नाही आली की माझ्या पाठी जे गृहस्थ बसले होते त्यांनी माझ्या सीटला अटेच असलेल्या स्टैंड वर चहाचा कप ठेवला होता. बटन प्रेस करताच सीट पुढे ढकलली गेली आणि त्यांचा चहाचा कप खाली पडला. फ्लोअरवर सर्वत्र चहा होता वाटल आता काहीतरी भांडण होइल. पण त्यांना ही कळल की चुकी माझी नव्हती. भांडण काही झाल नाही आणि प्रवास सुरु झाला. कल्याण गेल आणि टी.सी. आला. एक व्यक्तिच आणि टी.सी. च वाजल. त्या व्यक्तीला बसण्यासाठी जागा हावी होती. त्यावरून त्या दोघां मध्ये काही तरी वाजल होत. त्या व्यक्तीचा एक ग्रुप होता. त्यामध्ये ३ पुरुष मंडळी आणि २ बायका होत्या. असे एकून ते ५-६ जण होते.

त्या २ बायका अशा काही बसण्यासाठी जागा शोधत होत्या की काही विचारू नका. शेवटी नेरळला काही लोक उतरले आणि त्या सर्वांना जागा भेटली. बसण्यासाठी सीट मिळण हा आयुष्यातला सर्वात मोठा आनंद असू शकतो हे त्या दिवशी मला कळल. जागा भेटता क्षणी त्यांनी लैपटॉप चालू केला आणि फोटो पाहू लागले. बेकग्राउंडला जुन्या गोलमाल मधल "आने वाला पल" हे गाण लावल. थोडक्यात काय तर एक माहोल बनवला जो त्यांना भूतकाळातल्या गोड आठवणीं मध्ये घेवुन जाइल. ते सर्वजण फोटो पाहत होते. एकमेकांवर कमेंट पास करत होते. काही उगाचच शो-शायनिंग करत होते. आपल स्थान ह्या ग्रुप मध्ये किती प्रभावी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. कोणी फिलोसोफी झाड़त होत. कोणी फॅमिली बद्दल बोलत होत. कोणी सेंटर ऑफ़ अट्रेक्शन बनण्याचा प्रयत्न करत होत. तरीही सर्वजण एकमेकांना पाठिंबा देत होते. एकमेकांचे नखरे मनापासून सहन करत होते. पुढचे पिकनिकचे प्लान ठरवत होते. त्यातील सर्वजणांनी चाळीसी पार केली असेल. एक व्यक्ति म्हणून प्रत्येकजण वेगळा असला तरी एक ग्रुप म्हणून ते एकत्र होते. माझ्या मते ग्रुप हा असाच असावा.

उर्वरित भाग पुढच्या पोस्ट मध्ये. 

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

क्रमशः

अभिजीत

Sunday, February 20, 2011

Quote 9

वक़्त तो मरने तक साथ रेहता है
साली जिंदगी धोका दे जाती है.

अभिजीत

Saturday, February 12, 2011

तिच्या नकारात सुद्धा होकार आहे.....

व्हेलेन्टाइन डे. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. गारठलेली सकाळ, रम्य सायंकाळ, प्रेमाची मुक्त उधळण करणारा हा दिवस. प्रेम व्यक्त करण्यासाठी तसा कुठलाही दिवस चांगलाच की हो. पण ह्या दिवशी प्रेम व्यक्त केल तर आपल्याला विसर पडत नाही तारखेचा. कारण १४ फेब्रुवारी ही तारीख कोण विसरणार??? आपल्या प्रेयसीला तारखा लक्षात ठेवण्याची खुप घाणेरडी सवय असते. तिच्या अशा प्रश्नांपासून तुम्हाला वाचायचे असेल तर असे लक्षात राहणारे दिवस निवडा. तीही खुश आणि तुम्हीही खुश. असो.

ज्या मुलीवर आपल प्रेम आहे, तिच्या सोबत हा दिवस सेलिब्रेट करण म्हणजे एक स्वप्न च जगण आहे. एका अशाच मुली बद्दल आज मी बोलणार आहे. साधारण एक वर्षा पूर्वी मी जॉब ला होतो. एका प्रोजेक्ट वर १८ - २० जणांची एक टीम तयार करण्यात आली होती. ह्या टीम मध्ये ती सुद्धा होती. रोज सकाळी मीटिंग रूम मध्ये आम्हाला बोलवल जायच. दिवस भराच काम सांगितल जायच. आम्ही शोर्ट डेडलाइन वर काम करत होतो म्हणून बनवलेल शेड्यूल काही झाल तरी सांभाळण गरजेच होत. एकंदरीत वेळ कमी होता, काम जास्त होत. एकमेकांशी बोलायलाही वेळ नसायचा. पण तरीही काय झाल मला माहीत नाही. तिला पाहता क्षणीच अस वाटल की हीच ती.

तिच्या बद्दल बोलायच झाल तर. आपल्याच विश्वात राहणारी ती. काम काही जास्त करायला आवडायच नाही तिला. लग्नानंतर जॉब सोडणार होती ती. स्वभावाने तशी शांत पण कधी कधी अग्रेसिव. पाहता क्षणीच प्रेमात पडलो होतो मी. दिसायला सुंदर, पाणीदार डोळे, त्यावर कोरलेल्या भुवया, छोटस नाक, नाजुक ओठ. नेहमी जीन्स आणि टॉप मध्ये असायची, कधीतरी पंजाबी ड्रेस असायचा. वाचनाची आवड, नेहमी बैग मध्ये एक पुस्तक असायच. केस नेहमी घट्ट बांधलेले. जास्त नटायला, थटायला आवडायच नाही तिला. पण जशी होती तशी खुप सुंदर होती राव. डोळे एवढे बोलके आणि सुंदर की तासनतास बघत रहाव तिच्याकडे.

फिरायला खुप आवडत तिला. फोटोंच कलेक्शन आहे तिच्याकडे. तिच्या डेस्क वर जायचो तेंव्हा नेहमी कुठलेना कुठले फोटो दाखवत असायची मला. फोटो कोण पाहत होतो हो. तिला पाहता याव, तिच्याशी बोलता याव म्हणून मी जायचो तिच्या डेस्क वर. दिवसभर खुप काम असायच पण तरीही वेळ काढून जायचो तिच्याकडे. तिच्याशी बोलताना आपोआप फ्रस्ट्रेशन निघून जायच. कामाचा तणाव कमी व्हायचा. खुप वेळा अस वाटायच की तिला कुठे तरी भेटाव. तिच्याशी बोलाव. एक चांगला वेळ तिच्यासोबत घालवावा. तिला मनोसक्त बघत रहाव, ऐकत रहाव. पण काम एवढ असायच की वेळ काढण कठीण होत. आणि तिला अस डायरेक्ट विचारणार तरी कस. तिची काय प्रतिक्रिया असेल हे माहीत नव्हत.

मला नेहमी अस वाटायच की मला ज्या फीलिंग आहेत तिच्या बद्दल ते तिला माहीत असेल. तिलाही माझ्या बद्दल थोड्फार का होइना वाटत असेलच की. पण कधी तिने हे दाखवण्याचा प्रयत्न नाही केला किंवा तिचे प्रयत्न मला कळले नाहीत किंवा समजुन सुद्धा मला त्या वेळेस तो क्षण हेरता आला नाही. एकदा तिला वोडाफोनच बिल भरायच होत. तिने मला विचारल की येतोस का माझ्यासोबत. पण ऑफिसच्या वेळात काम सोडून मला तिच्या सोबत नाही जाता आल. एखाद वेळेस तो क्षण मी गमावला, ज्यात फ़क्त ती आणि मी असतो. बोलण फ़क्त तीच आणि माझ असत. तो वेळ आमचा असता. एखादा क्षण हेरण खुप कठीण असत हो.

कालांतराने प्रोजेक्ट संपला. माझा शेवटचा दिवस होता ऑफिस मध्ये. त्या दिवशीही मला नाही वेळ काढता आला तिच्यासाठी. नंतर एक दिवस मी तिला सांगितल की तू मला आवडतेस. त्या वेळेस तिने मला विचारल होत की प्रेम म्हणजे काय??? प्रेमाची परफेक्ट व्याख्या मला आजही नाही माहीत. भावनांना मी फ़क्त शब्दात नाही मांडू शकलो. तिच्या नकारात सुद्धा होकार आहे. हे तिलाही माहीत आहे आणि मलाही.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Tuesday, February 8, 2011

कशाला एवढी दुनियादारी करता?????

हल्ली फेसबुक मुळे ऑरकुटच प्रस्थ फार कमी झाल आहे. बहुतेक सर्वचजण ऑरकुट सोडून फेसबुक वर असतात. बर्यापैकी प्रायव्हसी जपली जात आहे म्हणून खुप कमी कालावधीत फेसबुक सर्वांच लाडक झाल आहे. इथेही कोट्स अपडेट केले जातात, म्हणजे इमोशनल कोट्स, लव कोट्स, फ्रेंडशिप कोट्स रोजच्या रोज अपडेट केले जातात. तुम्ही जर खरच मनापासून मानत असाल हे कोट्स आणि त्यांचा अर्थ तर खुप चांगल आहे हो. पण लोकांना फ़क्त दाखवण्यासाठी करत असाल तर थांबवा रे. कारण तुम्ही मानतच नसाल तर कशाला लिहिता रे. समजा एखादा कोट तुम्हाला खरच आवडला, त्यातला अर्थ तुम्हाला पटला, तुम्हाला तो सर्वांसोबत शेअर करावसा वाटला तरच करा हो. नाही तर कशाला ही दुनियादारी करता...थांबवा की.

खुप वेळा अर्थ नसलेल्या ओळी फेसबुक वर पब्लिश केल्या जातात. विषय कुठलाही असू शकतो म्हणजे जॉब, मैत्री, प्रेम, आयुष्य, रूटीन लाइफ. पण तुम्ही ती ओळ वाचली तरी तुम्हाला कळेल काय फालतुगिरी आहे. आणि ह्यावर कहर म्हणजे त्या ओळी वर १५-२० कमेंट्स दिल्या जातात. थांबवा की हे सर्व. मला कधी कधी प्रश्न पडतो की ह्या सर्वातुन नक्की काय साध्य करायच असत लोकांना. काही चांगली वाक्य पब्लिश करा रे. त्यावर कमेंट्स देयला आम्हाला ही आवडेल की हो. असो.

गेल्या काही दिवसात मी एवढे फ्रेंडशिप कोट्स, लव कोट्स, इमोशनल कोट्स वाचले असतील की काही विचारू नका. मी काही व्यक्तींनी लिहिलेल्या अशा कोट्स वर कमेंट्स सुद्धा दिल्या की खुप भारी लिहिल आहेस. आवडल वगैरे. त्यावर त्यांचा रिप्लाय असा होता की, नाही रे, अस काही नाही. इट्स जस्ट अ कोट. म्हंटल व्वा, काय रिप्लाय आहे. ओके बोलून सोडून दिल. अशा व्यक्तिंशी तुम्ही अर्ग्युमेंट तरी काय करणार??? सेंटर ऑफ़ अट्रेक्शन बनायच असत बाकि काही नाही.

साधे फोटो अपलोड केले जातात. फोटो कसा ही असो, सुंदर आहे, छान आहे बोलून आपण मोकळे होतो. किती डिप्लोमेट राहणार आहात. एखादी मुलगी आवडते तुम्हाला तर बोला की तिला सरळ.....तू आवडतेस म्हणून. दरवेळेस घुमुन फिरुनच सांगायची काय गरज आहे??? असो.

माझ एवढच सांगण आहे की जे काही कराल ते मनापासून करा. दुनियादारी पासून स्वतःला दूर ठेवा. सर्वात महत्वाच म्हणजे आयुष्य एन्जॉय करा. 

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Tuesday, February 1, 2011

सर्वकाही सोडल प्रेमाखातिर.....

मागच्या वर्षी घटस्थापनेला मी महाड ला (माझे गाव) गेलो होतो. देव बसवयाचे असतात म्हणून दर वर्षी फॅमिली सोबत जातो. आज ही ते घर पूर्वीच्या घरां सारख आहे. कौलारू, घराच्या भिंती, अंगण शेणाने सारवलेल, जेवण आजही चुलीवर होत. घरात काही नविन आल असेल तर टेलीफोन आणि गैस सिलेंडर आला आहे. मला देवघर पहायला फार आवडत. घटस्थापनेच्या दिवशी काका देवघरात फुलांची आरास करतात. गेली कित्येक वर्ष एका खास प्रकारच्या फुलांनिच देवघर सजवल जात आहे. जेंव्हा उन्हाच कवडस देवघरात पडत तेंव्हा खुप सुंदर दिसत देवघर. घरातली कुठली माझी आवडती जागा असेल तर ती देवघरच आहे. घट बसले की काकी आम्हाला जेवायला वाढतात. गावच्या जेवणात चपाती हा प्रकार नसतो. भात, वरण, भाजी , पापड़ आणि लोंच एवढ साध जेवण असत. भात सुद्धा हलका गुलाबी रंगाचा असतो. (काकांची भाताची शेती आहे म्हणून भात डायरेक्ट घरातच येतो) आपण मुंबईत जो भात खातो तो खुप पोलिश केलेला असतो म्हणून तो पांढरा शुभ्र असतो. जेवण उरकल की आम्ही मामा मामी कडे येतो. एक दिवस त्यांच्याकडे राहतो आणि दुसरया दिवशी घरी येयला निघतो.

दुसरया दिवशी घरी येयला निघण्याच्या काही तास अगोदर घडलेला एक प्रसंग मी तुमच्या सोबत शेअर करत आहे. मामा ज्या वाडीत राहतो तिथे सर्व आमचीच माणसे राहतात. एकदा का गावाला गेलो की सर्वांकडे जाव लागत. मामाकडे रहायला आलो असलो तरी सकाळी नाष्टयासाठी बाजूच्याच एका घरातून आम्हाला बोलावण आल. गावाकडे पुष्कळदा ठरलेला नाश्ता असतो तो कांदेपोहे. पण कांदेपोहे म्हंटल की मला आठवण येते ती महाड मध्ये रहाणारया माझ्या एका दुसरया मामीची. एवढे भारी कांदेपोहे ती बनवते की मी चाहता आहे तिच्या कांदेपोह्यांचा. हे तिला सुद्धा माहीत होत. मी लहान असताना त्यांच्याकडे जेंव्हा जायचो तेंव्हा त्या आवर्जुन कांदेपोहे बनवायच्या. लहानपणी खाललेल्या कांदेपोह्यांची चव आजही जिभेवर आहे. तसेच माझी आजी (म्हणजे आईची आई) खुप सुंदर वाटाण्याची उसळ बनवायची. मी गावी आल्यावर खास आवर्जुन माझ्यासाठी बनवायची. ते खाल्लेले कांदेपोहे, ती वाटाण्याची उसळ आजही मनात कुठेतरी घर करून आहे. बोलत बसलो तर हे विषय कधी संपणार नाहीत, मूळ विषयाकडे येतो.

सकाळ चा नाश्ता झाला. गावात फेरफटका मारून झाला. नेहमीच्या ठिकाणी कोल्ड्रिंक, लस्सी मारून झाली. घरी आलो. जेवण झाल्यावर आम्ही घरी येयला निघणार होतो. टी.व्ही. बघत बसलो होतो. तेवढ्यात आई ची मैत्रिण आणि तिच्यासोबत एक मुलगी आली. नंतर मला कळल की ती मुलगी आईच्या मैत्रिणीची सुन होती. दोन मैत्रिणी खुप वर्षांनंतर भेटल्या होत्या. त्यांच्या गप्पा चांगल्या रंगल्या होत्या.

ही मुलगी शांत बसली होती. वयाने १८ असेल फार फार. आपल्या मुंबईचीच राहणारी होती ती. आईच्या मैत्रिणीचा मुलगा सुट्टीत मुंबई ला येयचा तेंव्हा त्याची हिच्याशी ओळख झाली. ओळखीच रूपांतर प्रेमात झाल आणि कालांतराने त्यांनी लग्न केल. पण मला थोड आश्चर्य वाटल. मुंबई सारख्या ठिकाणी राहणारी मुलगी. नुकतीच कॉलेज ला जायला लागली होती. खरतर आयुष्य एन्जॉय करण आता सुरु झाल होत. ह्याच वेळेस तिला प्रेम झाल आणि तिने लग्न केल. वयाच्या १८ व्या वर्षी तिची ही कमिटमेंट खरच वाखण्या जोगी आहे. आजकाल मुली २७ व्या, २८ व्या वर्षी तरी एवढ्या कमिटेड असतात का??? करीअर, पैसा ह्या दुनियादारित अडकून बसलेल्या आहेत. शेवटी काय हो लग्न करण्यासाठी पैसा गरजेचा आहे, प्रेम नाही.

ह्या मुलीने सर्वकाही सोडल प्रेमाखातिर. तुम्ही बोलाल की तिला अक्कल नाही, डोक नाही. बरोबर आहे तुमच. तिला डोक नाही. तिने जे काही केल ते मनापासून केल. जे प्रेम केल तेहि मनापासून केल. कालांतराने सर्वकाही चांगलच होइल की हो. प्रेम होण आणि निभावण कठीण असत. बाकीच्या गोष्टी आपोआप होवून जातात की हो.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 

Monday, January 24, 2011

कॉलेज आठवणी - सारांश (माझ्या विचारातून)

कॉलेज आठवणी ही एक काल्पनिक रंगवलेली आठवण आहे. ह्या कथे मध्ये रंगविलेल्या सर्व व्यक्तिरेखा राशी, सई, ग्रीथा, योगी, विरजा, अभि काल्पनिक होत्या. रंगवलेला प्रत्येक क्षण काल्पनिक होता. रंगवलेल प्रत्येक ठिकाण काल्पनिक होत. रंगवलेल प्रत्येक व्यक्ति चित्र काल्पनिक होत.

जेंव्हा मी ही कथा लिहायला घेतली तेंव्हा मला माहीत ही नव्हत की ह्या कथेचा शेवट काय असणार आहे. व्यक्तिरेखांचा विचार केला तर राशी ही एक अशी मुलगी होती की जी दिसायला खुप सुंदर होती. पण सुंदरतेचा तिला काही गर्व नव्हता. (पुष्कळ मुलींना सेंटर ऑफ़ अट्रेक्शन बनायला आवडत. दहा जणांनी त्यांची स्तुति करावी. वेळोवेळी त्यांना मदत करावी अस त्यांना वाटत. घेयला नेहमी तयार असतात हो, देण्याची वेळ आली तर तुम्हाला ओळखही दाखवत नाहीत) पण राशी ह्या मुलीं पेक्षा खुप वेगळी होती. राशीच हे वेगळ पण अभि ला मनापासून आवडल होत. कथे मध्ये राशी अभि ला शोधत लायब्ररी मध्ये येते आणि कथेला एक वेगळ वळण मिळत.

विरजा मित्रांचा मित्र. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी ही पार्टी मागणारा. नेहमी हसत खेळत जगणारा. कोणाला घाबरत नाही पण ग्रीथाने रागाने जरी त्याच्याकडे पाहिल तर शांत बसणारा. विरजा ही व्यक्तिरेखा रेखाटताना जास्त विचार नाही करावा लागला. विरजा त्याच्या भूमिकेत बरोबर फिट झाला. योगी ची भूमिका खुप छोटी होती. श्रीमंत घराण्यातला व्यक्ति. थोडासा शांत आणि गंभीर स्वरूपाचा. मोजकच बोलणारा पण विचार करून बोलणारा. त्यामुळे योगी सुद्धा त्याच्या भूमिकेत बरोबर फिट झाला. ग्रीथा ही एक सपोर्टिंग रोल मध्ये होती. पूर्ण कथेत तिच्या वाट्याला २ ते ३ वाक्यच आली असतील. विरजा जसा ग्रीथा शिवाय अधुरा आहे तसच ग्रीथा सुद्धा विरजा शिवाय अधूरी आहे.

शेवटची व्यक्तिरेखा पण खुप महत्वाची.....सई. सई ने थोडा त्रास दिला. भूमिकेत बसायलाच तयार नव्हती. राशी अभि च्या आयुष्यात आली आणि सई ने ह्या कथेची नायिका तीच आहे हे दाखवून दिल. राशी ह्या कथेत आली नसती तर कदाचित अभि आणि सई एकत्र येयला पुष्कळ वर्षे लागली असती.

ह्या कथेची नायिका जरी सई असली तरीही राशी कुठेही कमी पडत नाही. राशीच प्रेम. तिने घेतलेला इनिशिएटीव. अभि ला आपल समजुन त्याच्या सोबत फिरणारी राशी. हृदयाला कुठेतरी भिड़ते. सई बद्दल म्हणाल तर खुप शांत मुलगी हो. भावनांना समजणारी. लाडीकपणे स्वतःचे हट्ट पुरवून घेणारी. रडण्यासाठी जिला कधी कोणा दुसर्याच्या खांद्याची गरज नाही पडली. तिने अभि वर प्रेम केल आणि त्याच्या सोबतच राहिली. अशी सई सुद्धा तिच्या भूमिकेत बरोबर फिट झाली.

ही कथा ४ भागांमध्ये संपली पण आज जेंव्हा मी विचार करतो की माझी प्रेयसी (आयुष्यभराची सोबतीण) कोण असावी??? तेंव्हा वाटत ती सई च असावी.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

Friday, January 21, 2011

मैत्री.....समजणारे आणि निभावणारे

आजपर्यंत मी अर्ध्याहून जास्त लिखाण मुलीं बद्दल केल आहे. त्याप्रमाणे पुष्कळ जणांच्या मते मी फ्लर्ट आहे. पण ठीक आहे. ज्या व्यक्ति मला ओळखतात त्यांना माहीत आहे मी कसा आहे. असो. पुष्कळ वेळा आपण काही व्यक्तीं कडून काही गोष्टी एक्स्पेक्ट करतो आणि माझ्या मते हे बरोबर आहे. आपण आपल्या लोकांकडून एक्स्पेक्ट नाही करणार तर कोणांकडून करणार??? पण बघायला गेल तर एक्स्पेक्ट नकरणच चांगल असत.

आपले मित्र मैत्रिणी. पुष्कळ वर्ष आपण एकमेकांना ओळखत असतो. काही व्यक्ति अशा असतात की ज्या मनात कुठलिही कटुता न बाळगता आयुष्यभर मैत्री निभावतात. काही व्यक्ति तुमच्या बद्दल मनात मत्सर ठेवून मैत्री निभावतात. काही व्यक्ति स्वतःच्या हिशोबाने तुमच्याशी मैत्री निभावतात. काही व्यक्ति काही अटी घालून तुमच्याशी मैत्री निभावतात. काही व्यक्ति तुम्हाला मित्र, चांगला मित्र किंवा सर्वात चांगला मित्र या केटेगरी मध्ये ठेवतात. पण तुम्हाला जर मित्र, चांगला मित्र आणि सर्वात चांगला मित्र या मधला फरकच कळत नसेल तर तुम्ही फ़क्त मित्र म्हंटल तरी पुष्कळ आहे हो.

काही जणांना सवय असते की एकमेकांना जास्त ओळख़त नसतील तरीही बेस्ट फ्रेंड म्हणायच. माझ म्हणन एवढच आहे की जर खरच मनापासून वाटत असेल तरच बोला. त्या व्यक्ति कडून काही काम काढून घेण्यासाठी कशाला त्याला बेस्ट फ्रेंड म्हणता???

काही मित्र मैत्रिणी वर्षानुवर्षे तुम्हाला ओळखत असतात. पण मैत्री काय असते हेच त्यांना माहीत नसत.

काही व्यक्ति तुमच्याशी मैत्री करतात. मैत्री करताना काही अटी ठेवतात. ह्या अटी ते काही तुम्हाला सांगत नाहीत पण त्यांच्या  बोलण्यातून आणि वागण्यातून ते तुम्हाला बरोबर दाखवतात.

काही व्यक्ति मैत्री मधून शत्रुता निभावत असतात.

काही व्यक्ति तुमच्या मैत्रिणींना पटवण्यासाठी तुमच्याशी मैत्री करतात.

काही व्यक्ति तुमच्या प्रेयसीला पटवण्यासाठी तुमच्याशी मैत्री करतात. (पण बघायला गेल तर हीच खरी वेळ असते आपल्या प्रेयसीला ओळखण्याची)

पुष्कळ व्यक्ति तुम्हाला गृहीत धरतात. अड़चणीत असताना त्यांना तुमची आठवण येते. आनंदाच्या क्षणी ते तुम्हाला विसरतात.

सांगण्याचा हेतु एवढच की हो, पुष्कळ वेळा काहीतरी हेतु ठेवूनच मैत्री केली जाते. मैत्री समजणारे आणि निभावणारे खुप कमी व्यक्ति आहेत हो ह्या जगात.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 

Wednesday, January 19, 2011

Quote 8

people wrote big things in der quote like they care for the people.....but do they understand small things?????


ABHIJEET

Quote 7

If you can't argue, then just ignore.

ABHIJEET

Tuesday, January 18, 2011

Quote 7

In friendship some people say "you don't understand me" but do they understand others feeling?????


ABHIJEET

Quote 6

I don't like "Best Friends" tag because many people don't mean dat.


ABHIJEET

Saturday, January 15, 2011

माझ्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना "मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!"


अभिजीत


Quote 5

Don't entertain people to prove that you are a joker.

ABHIJEET

Quote 4

Forgiveness can't fix broken heart.

ABHIJEET

Quote 3

Worst choices leads to unforgiven destiny.

ABHIJEET

Quote 2

Beautiful scene can be a sinful beauty.

ABHIJEET

Quote 1

I left everything for the sake of nothing.

ABHIJEET

Thursday, January 13, 2011

कॉलेज आठवणी - अंतिम भाग

मी राशीचा निरोप घेतला आणि निघालो. त्या दिवशी मुसळधार पाउस पडत होता. विरजा ला कॉल केला. विचारल कुठे आहात तुम्ही??? पाउस पडत होता म्हणून ते सर्वजण कैंटीन मध्येच होते. धावत धावतच कैंटीन मध्ये गेलो. योगी ने विचारल राशी हो बोलली का??? मी बोललो की, नाही रे, मी तिला प्रपोज नाही केला. त्याला मध्येच अडवून मी विचारल सई कुठे आहे??? ग्रीथा बोलली की ती क्लास रूम मध्ये गेली आहे, येइल थोड्या वेळात. मी म्हंटल ठीक आहे. नंतर प्रश्नांचा एवढा काही भडिमार झाला माझ्यावर काही विचारू नका. विरजा च सुरु झाल की का नाही रे प्रपोज केला??? आता काय उत्तर देवू मी विरजाला. त्याला म्हंटल, प्रेम नाही रे माझ तिच्यावर मग कशाला तिला खोट्या आशा दाखवू. हाँ थोड़ी नाराज असेल माझ्यावर ती. पण ओळखते मला ती. आज ना उद्या समजुन घेइल ती मला. मधेच ग्रीथा ने विचारल आता काय??? मी म्हंटल आता काही नाही, एक नॉर्मल रूटीन लाइफ. हे ऐकून सर्वजण हसायला लागले. योगी बोलला की तुझी लाइफ कधी नॉर्मल रूटीन राहिली आहे का??? आत्ता सुद्धा तू काही तरी नविन करण्याच्या बेतात असणार. माझ योगीच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नव्हत. मला सई ला भेटायच होत.

मी सई ला कॉल केला. कुठे आहेस विचारल. तर मैडम बोलल्या मी क्लास रूम मध्ये आहे. मी विचार केला काही खर नाही आपणच जाव क्लास रूम मध्ये. मी सई ला बोललो की मी येतो क्लास रूम मध्ये, तिथेच थांब. जावू नकोस कुठे. निघताना ग्रीथा ने विचारलच की काय झाल??? मी तिला बोललो की काही नाही. येतो मी थोड्या वेळात. धावत धावत क्लास रूम मध्ये गेलो. बघतो तर काय सई तिथे नाही. परत तिला कॉल केला तर मैडम लायब्ररी मध्ये होत्या. सई माझ्या डोक्यात जायच काम करत होती. मी धावत धावत लायब्ररी मध्ये गेलो. तर मैडम तिथे ही नव्हत्या. एक तर मला कळत नव्हत ती अस का करत आहे??? मी स्वतःलाच म्हंटल ठीक आहे, तिला नाही भेटायच तर राहू देत.

मी तिथून निघालो आणि आमच्या नेहमीच्या जागेवर आलो. कॉलेज सुटल्यावर आम्ही सर्वजण ह्याच जागी भेटायचो. विरजा ची बाइक पण नेहमी ह्याच ठिकाणी उभी असते. विरजाच आणि माझ सिगरेट पिण्याच ठिकाणही हेच. पण ग्रीथा समोर विरजा काय सिगरेट मारेल! म्हणून ह्या सर्व गोष्टी लपुनच. मी तिथे आलो. मला काहीच कळत नव्हत की काय चालू आहे??? विचार करून करून डोक्याची वाट लागली होती. मी सिगरेट लाइट केली आणि बाइक वर बसलो. आता थोडा शांत झालो आणि मन आपोआप सई च्या आठवणीत गुंतत गेल.

२ वर्षापूर्वी सई आणि माझी ओळख झाली होती. सई.....काय सांगू मी तुम्हाला हिच्या बद्दल. खुप शांत. मोजकच बोलणारी. मनाने खुप चांगली. दुनियादारी पासून अलिप्त राहणारी. सर्व लेक्चर्स अटेंड करणारी. तीच फ्रेंड सर्कल सुद्धा तस खुप छोट. आमच्या ग्रुप व्यतिरिक्त दूसरा कुठलाही ग्रुप नाही. म्हणून हसण, रडण, रूसण-फूगण सर्व आमच्या समोरच. कोणा दुसरयाकडे जायची गरज नाही पडली तिला. हट्टाने स्वतःचे लाड पुरवून घेतले आहेत तिने माझ्याकडून. नेहमी पंजाबी ड्रेस मध्येच दिसणार. खुप छान दिसायची राव. आज मला उमजत की मला मुली पंजाबी ड्रेस मध्येच का आवडतात. पडलेल्या प्रश्नांची उत्तर खुप सोप्पी असतात हो फ़क्त संदर्भ जुलून आले पाहिजेत. हाताला सिगरेटचा चटका लागला आणि मी भानावर आलो.

विचार केला निघाव आता. रिसॉर्टला जायच होत. सई सुद्धा कैंटीन मध्ये असेल. आतापर्यंत तिला कळल असेल की मी राशी ला प्रपोज नाही केला ते. मी बाइक वरून उतरलो. सहजच माझ समोर लक्ष गेल. तर साधारण माझ्यापासून १० फुटांवर सई पाठमोरी उभी होती. मैडम भर पावसात भिजत उभ्या होत्या. म्हंटल काय मुलगी आहे ही??? एक तर मला पूर्ण कॉलेज फिरवल आणि आता अशी उभी आहे इथे येवून. किती नखरे करायचे??? कधी आली ही इथे मला कळलच नाही. मी आपल्याच तंद्रित होतो. म्हंटल जावुया तिच्याकडे पण पाउस होता. म्हणून जागेवरुनच तिला हाक मारली. मैडम ओ देयला काही तयार नाही. शेवटी मी तिच्या बाजूला जावून उभा राहिलो.

आमच्या दोघां मधल संभाषण काही अशा प्रकाराच होत :-

अभी : मग झाले का नखरे करून???
सई : नाही अजुन.....बाकि आहेत.
अभी : ओके.
(२ मिनिटे शांतता)
सई : मग काय झाल राशीच??? (माहीत असून सुद्धा)
अभी : होकार दिला तिने.
सई : मग इथे काय करतोयस??? गेला नाही तिच्या सोबत???
अभी : नाही रे. सिगरेट मारायची होती म्हणून आलो होतो. निघतोय आता.
(सई अभीच्या हातावर चापटी मारते)
अभी : ग्रीथाची सवय तुला कधी पासून लागली??? शोभतेस तिची मैत्रिण.
सई : (चिडून) निघ तू. तुला उशीर होत असेल.
अभी : निघायच्या आधी एक विचारू का???
सई : एक काय हजार प्रश्न विचार.
अभी : (चिडून) अस बोलणार असशील तर मी निघतो.
सई : नाही नाही विचार.
अभी : (स्माइल) किती प्रेम करतेस माझ्यावर??? आयुष्य घालवणार का माझ्या सोबत???
सई : (स्माइल) तोच विचार करत आहे.

आम्ही एकमेकांकडे पाहिल. सई ला पहिल्यांदा लाजताना पाहिल होत. त्या पावसात तीच ते लाजण अधिकच खुलुन आल होत. आज कळल होत की प्रेम आहे हे सांगण्यासाठी त्या तीन शब्दांची गरज नसते. मी सई ला बोललो की, पावसात भिजुन झाल असेल तर आपण निघुया. सगळे आपली वाट पाहत असतील. रिसॉर्टला जायच आहे विसरलीस का???

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Wednesday, January 12, 2011

कॉलेज आठवणी - भाग ३

मी आणि ग्रीथा सई च्या घरी गेलो. पाहतो तर काय??? दाराला कुलुप नव्हत म्हणजे मैडम घरातच होत्या. एवढा राग आला होता, म्हंटल काय फलातुगिरी आहे??? एक कॉल नाही अटेंड करू शकत का ही मुलगी. मी कधी कोणावर एवढा रागवत नाही पण त्या वेळेस माझा कंट्रोल नाही राहिला स्वतः वर आणि मी सई वरती खुप रागावलो. मैडम ला काही रडू आवरल नाही आणि त्या सुरु झाल्या. रागाच्या भरात मी ग्रीथा ला बोललो की तू रहा हिच्या सोबत मी चाललो, मला उशीर होत आहे आधीच आणि मी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी काय होणार आहे याची मला काहीच कल्पना नव्हती.

नेहमी प्रमाणे आम्ही लेक्चर्स अटेंड करून कैंटीन मध्ये बसलो होतो. आज कोणीच काही बोलत नव्ह्त. सगळे एकदम गप्प. मला वाटल काय झाल???? मी विचारल सुद्धा. पण तरीही कोणीही काहीही सांगायला तयार नाही. मी सई ला विचारल, तर सई मैडम पण गप्प. तिला विचारल, काय झाल होत काल??? तरीही ह्या मैडम गप्प. ती शांतता माझ्या डोक्यात जात होती म्हणून मी तिथून निघालो. पुढचे काही दिवस वातावरण असच होत. पण नंतर सगळ पूर्ववत झाल. राशीच आणि माझ आता वारंवार भेटण होत असे. मी कॉलेज सुटल्या नंतर एखादा तास राशी सोबत असायचो. योगी आणि विरजा रात्री मला नाक्यावर भेटायचे. एकंदरीत लाइफ एकदम कूल चालली होती. राशीला मी फ्रेंडशिप डे च्या दिवशी प्रपोज करण्याच ठरवल.

एकदिवशी कैंटीन मध्ये बसलेलो असताना मी सर्वांना ही गोष्ट सांगितली. विरजा नेहमी अशी गोष्ट सांगितल्यावर पार्टी मागणारा पण भाई आज शांत होता. मी न राहवून सर्वाना विचारल, काय झाल आहे तुम्हाला??? तुम्हाला काही प्रोब्लेम आहे माझ्यापासून??? माझ्या आनंदात तुम्हाला सहभागी नाही होयच आहे का??? मी अजाणतेपणी कोणाला दुखावल आहे का??? तेंव्हा योगी बोलला की नाही रे, अस काही नाही. आम्हाला तुझी काळजी वाटते एवढच रे. मी पुन्हा विचारल, राशी चांगली मुलगी नाही का??? तेव्हा योगी बोलला, अस नाही रे, राशी खुप चांगली मुलगी आहे. पण तू खरच प्रेम करतो का तिच्यावर??? सेटल होणार आहेस का तिच्या सोबत??? अस तर नाही ना की थोड्या दिवस फिरणार आणि मग सोडून देणार. त्यांचे प्रश्न बरोबर होते. पण माझ्याकडे उत्तर नव्हत. पण त्यांनी मला विचार करण्यास भाग पाडल एवढ नक्की.

नंतरचे काही दिवस मी सतत राशी ला भेटत होतो. दोन तीनदा मुंबई दर्शन सुद्धा करून झाल होत.
ती आणि मी खुप कम्फर्टेबल होतो एकमेकांसोबत. शेवटी फ्रेंडशिप चा दिवस उजाडला. आज मी ग्रुप सोबत वाटर रेसोर्ट ला जाणार होतो आणि राशी ला मी आज विचारणार होतो. कॉलेज ने रिसेस नंतर आम्हाला फ्रेंडशिप डे साजरा करण्यास वेळ दिला. पहिले तर आमचा ग्रुप मध्येच सेलिब्रेट झाला फ्रेंडशिप डे. मी सई ला फ्रेंडशिप रिबिन बांधत होतो. तेंव्हा सई ने मला विचारल की, अभी तू माझ्या सोबत राहशील ना??? आपली फ्रेंडशिप कधी तुटणार तर नाही ना??? सई च्या डोळयात पाणी होत. मी सई ला पहिले कधी अस पाहिल नव्हत. मी आज ना उद्या निघून जाईन अस तिला वाटत होत. मी सई ला बोललो, मी कुठे ही नाही जाणार तुझ्या सोबतच असेन नेहमी. सई चे हे रूप पाहून मी भारावून गेलो होतो. कॉलेज सुटल्यावर भेटू अस बोलून मी राशी ला भेटायला कैंटीन मध्ये गेलो.

कैंटीन मध्ये जात असताना माझ्या डोक्यात असंख्य विचार येत होते. दिड महिन्यापूर्वी मी राशी ला ओळख़त सुद्धा नव्हतो आणि आज मी तिला प्रपोज करणार होतो. योगी ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर शोधत होतो. सई चा तो चेहरा डोळया समोर येत होता. राशी अशी मुलगी होती की जिच्यासोबत मी माझ पूर्ण आयुष्य काढू शकत होतो. काहीच कळत नव्ह्त काय चालू आहे??? आता प्रश्न एवढाच होता की, मी राशी वर प्रेम करतो का??? कारण राशी माझ्यावर प्रेम करते हे मला माहीत होत. शेवटी आज मला एक निर्णय घेण भाग होत. खुप कॉम्प्लीकेटेड असत हो हे प्रेम. जेवढा विचार करणार तेवढे सीरियस होणार तुम्ही. बेस्ट सोल्यूशन.....विचारच करू नका. तेच मी केल आणि राशी समोर जावून उभा राहिलो.

राशी चा त्या दिवशीचा तो रेड आणि ब्लैक कॉम्बिनेशन असलेला पंजाबी ड्रेस तिच्यावर खुप उठून दिसत होता. काय बोलायच काहीच कळत नव्हत. शांत उभा राहिलो. राशी बोलली की बोल काय बोलायच आहे ते. फ़क्त ३ शब्द बोलायचे होते. पण शब्द तोंडातून बाहेर येण्यास काही तयार नव्हते. मला समजुन चुकल होत की माझ राशी वर प्रेम नाही. काल पर्यंत मी माझ्या निर्णयावर ठाम होतो की मी राशीला प्रपोज करणार. पण आज सई ने बोललेल, "अभी तू माझ्या सोबत राहशील ना???" हे वाक्य आपल काम करून गेल होत. सई च्या आवाजातला तो आपलेपणा हृदयाला कुठेतरी भिडला होता.

क्रमशः.....

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत