Thursday, January 13, 2011

कॉलेज आठवणी - अंतिम भाग

मी राशीचा निरोप घेतला आणि निघालो. त्या दिवशी मुसळधार पाउस पडत होता. विरजा ला कॉल केला. विचारल कुठे आहात तुम्ही??? पाउस पडत होता म्हणून ते सर्वजण कैंटीन मध्येच होते. धावत धावतच कैंटीन मध्ये गेलो. योगी ने विचारल राशी हो बोलली का??? मी बोललो की, नाही रे, मी तिला प्रपोज नाही केला. त्याला मध्येच अडवून मी विचारल सई कुठे आहे??? ग्रीथा बोलली की ती क्लास रूम मध्ये गेली आहे, येइल थोड्या वेळात. मी म्हंटल ठीक आहे. नंतर प्रश्नांचा एवढा काही भडिमार झाला माझ्यावर काही विचारू नका. विरजा च सुरु झाल की का नाही रे प्रपोज केला??? आता काय उत्तर देवू मी विरजाला. त्याला म्हंटल, प्रेम नाही रे माझ तिच्यावर मग कशाला तिला खोट्या आशा दाखवू. हाँ थोड़ी नाराज असेल माझ्यावर ती. पण ओळखते मला ती. आज ना उद्या समजुन घेइल ती मला. मधेच ग्रीथा ने विचारल आता काय??? मी म्हंटल आता काही नाही, एक नॉर्मल रूटीन लाइफ. हे ऐकून सर्वजण हसायला लागले. योगी बोलला की तुझी लाइफ कधी नॉर्मल रूटीन राहिली आहे का??? आत्ता सुद्धा तू काही तरी नविन करण्याच्या बेतात असणार. माझ योगीच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नव्हत. मला सई ला भेटायच होत.

मी सई ला कॉल केला. कुठे आहेस विचारल. तर मैडम बोलल्या मी क्लास रूम मध्ये आहे. मी विचार केला काही खर नाही आपणच जाव क्लास रूम मध्ये. मी सई ला बोललो की मी येतो क्लास रूम मध्ये, तिथेच थांब. जावू नकोस कुठे. निघताना ग्रीथा ने विचारलच की काय झाल??? मी तिला बोललो की काही नाही. येतो मी थोड्या वेळात. धावत धावत क्लास रूम मध्ये गेलो. बघतो तर काय सई तिथे नाही. परत तिला कॉल केला तर मैडम लायब्ररी मध्ये होत्या. सई माझ्या डोक्यात जायच काम करत होती. मी धावत धावत लायब्ररी मध्ये गेलो. तर मैडम तिथे ही नव्हत्या. एक तर मला कळत नव्हत ती अस का करत आहे??? मी स्वतःलाच म्हंटल ठीक आहे, तिला नाही भेटायच तर राहू देत.

मी तिथून निघालो आणि आमच्या नेहमीच्या जागेवर आलो. कॉलेज सुटल्यावर आम्ही सर्वजण ह्याच जागी भेटायचो. विरजा ची बाइक पण नेहमी ह्याच ठिकाणी उभी असते. विरजाच आणि माझ सिगरेट पिण्याच ठिकाणही हेच. पण ग्रीथा समोर विरजा काय सिगरेट मारेल! म्हणून ह्या सर्व गोष्टी लपुनच. मी तिथे आलो. मला काहीच कळत नव्हत की काय चालू आहे??? विचार करून करून डोक्याची वाट लागली होती. मी सिगरेट लाइट केली आणि बाइक वर बसलो. आता थोडा शांत झालो आणि मन आपोआप सई च्या आठवणीत गुंतत गेल.

२ वर्षापूर्वी सई आणि माझी ओळख झाली होती. सई.....काय सांगू मी तुम्हाला हिच्या बद्दल. खुप शांत. मोजकच बोलणारी. मनाने खुप चांगली. दुनियादारी पासून अलिप्त राहणारी. सर्व लेक्चर्स अटेंड करणारी. तीच फ्रेंड सर्कल सुद्धा तस खुप छोट. आमच्या ग्रुप व्यतिरिक्त दूसरा कुठलाही ग्रुप नाही. म्हणून हसण, रडण, रूसण-फूगण सर्व आमच्या समोरच. कोणा दुसरयाकडे जायची गरज नाही पडली तिला. हट्टाने स्वतःचे लाड पुरवून घेतले आहेत तिने माझ्याकडून. नेहमी पंजाबी ड्रेस मध्येच दिसणार. खुप छान दिसायची राव. आज मला उमजत की मला मुली पंजाबी ड्रेस मध्येच का आवडतात. पडलेल्या प्रश्नांची उत्तर खुप सोप्पी असतात हो फ़क्त संदर्भ जुलून आले पाहिजेत. हाताला सिगरेटचा चटका लागला आणि मी भानावर आलो.

विचार केला निघाव आता. रिसॉर्टला जायच होत. सई सुद्धा कैंटीन मध्ये असेल. आतापर्यंत तिला कळल असेल की मी राशी ला प्रपोज नाही केला ते. मी बाइक वरून उतरलो. सहजच माझ समोर लक्ष गेल. तर साधारण माझ्यापासून १० फुटांवर सई पाठमोरी उभी होती. मैडम भर पावसात भिजत उभ्या होत्या. म्हंटल काय मुलगी आहे ही??? एक तर मला पूर्ण कॉलेज फिरवल आणि आता अशी उभी आहे इथे येवून. किती नखरे करायचे??? कधी आली ही इथे मला कळलच नाही. मी आपल्याच तंद्रित होतो. म्हंटल जावुया तिच्याकडे पण पाउस होता. म्हणून जागेवरुनच तिला हाक मारली. मैडम ओ देयला काही तयार नाही. शेवटी मी तिच्या बाजूला जावून उभा राहिलो.

आमच्या दोघां मधल संभाषण काही अशा प्रकाराच होत :-

अभी : मग झाले का नखरे करून???
सई : नाही अजुन.....बाकि आहेत.
अभी : ओके.
(२ मिनिटे शांतता)
सई : मग काय झाल राशीच??? (माहीत असून सुद्धा)
अभी : होकार दिला तिने.
सई : मग इथे काय करतोयस??? गेला नाही तिच्या सोबत???
अभी : नाही रे. सिगरेट मारायची होती म्हणून आलो होतो. निघतोय आता.
(सई अभीच्या हातावर चापटी मारते)
अभी : ग्रीथाची सवय तुला कधी पासून लागली??? शोभतेस तिची मैत्रिण.
सई : (चिडून) निघ तू. तुला उशीर होत असेल.
अभी : निघायच्या आधी एक विचारू का???
सई : एक काय हजार प्रश्न विचार.
अभी : (चिडून) अस बोलणार असशील तर मी निघतो.
सई : नाही नाही विचार.
अभी : (स्माइल) किती प्रेम करतेस माझ्यावर??? आयुष्य घालवणार का माझ्या सोबत???
सई : (स्माइल) तोच विचार करत आहे.

आम्ही एकमेकांकडे पाहिल. सई ला पहिल्यांदा लाजताना पाहिल होत. त्या पावसात तीच ते लाजण अधिकच खुलुन आल होत. आज कळल होत की प्रेम आहे हे सांगण्यासाठी त्या तीन शब्दांची गरज नसते. मी सई ला बोललो की, पावसात भिजुन झाल असेल तर आपण निघुया. सगळे आपली वाट पाहत असतील. रिसॉर्टला जायच आहे विसरलीस का???

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

No comments:

Post a Comment