Thursday, August 15, 2013

वन्दे मातरम!




(वरील छायाचित्र गूगल वरून साभार)

सर्वांना  स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अभिजीत 

Saturday, August 3, 2013

दुनियादारी..

The song which i liked most from the marathi movie दुनियादारी..
मला आवडलेल्या गाण्यातल्या काही ओळी.

देवा तुझ्या गाभार्याला उम्बराच नाही, सांग कुठे ठेवु माथा कळनाच काही
देवा कुठे शोधु तुला मला सांग ना, प्रेम केले एवढाच माझा रे गुन्हा..

देवा काळजाचि  हाक ऐक एकदा तरी, माझ्या या जीवाची आग लागु दे तुझ्या उरी
आरपार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू ..

दुनियादारी..

Wednesday, June 12, 2013

थोडीशी भिजलेली थोडीशी गोंधळलेली.....

रिमझिम पावसात धुक्यात हरवलेली ही वाट
थोडीशी भिजलेली थोडीशी गोंधळलेली
अगदी आठवणीतल्या तिच्यासारखी 
आज ही वाटत उभी असेल ती पुढच्या वळणावर
थोडीशी भिजलेली थोडीशी गोंधळलेली..

अभिजीत 

Tuesday, June 11, 2013

माझ्या मनातला पाऊस.....

हल्ली लिखाण जवळ जवळ थांबलच आहे. वेळच नाही मिळत म्हणाना. जॉब आणि बाकीच्या दुनियादारित अडकून पडलोय. जॉब आणि माझ पैशन (passion) याचा मेळच बसत नाही आहे. जॉबमुळे महिन्याच रोलिंग तर चालु आहे पण जे करायच आहे तिकडे दुर्लक्ष होत आहे. असो. इच्छा आहे तर मार्ग आहे.

आजकाल फेसबुकवर सर्वजण पावसाबद्दल कहिनाकाही लिहित आहेत म्हंटल आपण ही प्रयत्न करून बघुया.

माझ्या मनातला पाऊस.....

अखेरीस  मानसून सुरु झाला.
उन्हाचे मनाला बसलेले चटके काहीसे शीतल झाले.
मन  पुन्हा एकदा नव चैतन्य आणि उमेदेने पुरेपुर भरले.
आणि जगण्याला नविन बळ देवून  गेले.

अभिजीत 

Wednesday, May 1, 2013

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

अभिजीत 

Thursday, March 21, 2013

Quote!

Life had just stopped between "killing deadlines" and "an unachieved dream".

ABHIJEET

Sunday, February 3, 2013

शायरी.....

तेरी याद़ों से गुजर के हमने जाना प्यार क्या हे 
तन्हाई मे तेरेसे दूर होने का एहसास क्या हे
उस मोड़ पर तुम मिलोगी शायद
ये सोचकर, उस मोड़ से आज भी गुजरते हे.

अभिजीत 


Sunday, January 20, 2013

पुणे आणि मी!


पुण्याला  जेंव्हा जेंव्हा भेट दिली तेंव्हा पुणे नेहमी आपलसच वाटल. पुण्यात मॉल संस्कृती आली, बहुभाषिक लोक आले, तरीही पुणे काही बदलल नाही. आजही "अरे राव, बस का राव" काही कमी झाल नाही राव.

पुण्यात आलो की रात्री दिड दोन वाजेपर्यंत बाइक ने फिरायच. फक्त पान खाण्यासाठी किंव्हा कटिंग चायसाठी सर्व माहीत असलेल्या टपऱ्या हुडकायच्या, शेवटी सारस बाग च्या पाठ च्या खाऊ गल्लीत येयच. ही गल्ली रात्रि दिड वाजे पर्यंत ही चालू असते. इथे ज्या कामासाठी आलोय ते काम उरकायच आणि घर गाठायच.

गारठवणाऱ्या थंडीत रात्री सुनसान रस्त्यांवर बाइक जोरात दामटवण ह्या सारखी मजा दुसरी कसलीच नाही. खुप अगोदर पासून पुण्यातल्या हिरवळीबद्दल खुप काही ऐकून आहे. पण प्रत्यक्षात कधी स्पष्टपणे बघता नाही आली. जेंव्हा बघाव तेंव्हा स्कूटीवर आतंकवादी काईंड ऑफ़ मफलर घालून मुली फिरत असतात. त्यामुळे चेहरे कधी व्यवस्थित दिसलेच नाहीत. कसला त्रास असतो त्यांना, त्यांनाच ठाउक :)

पुण्यात आल की वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. पर्वती आहे, सारस बाग़ आहे, दगडू शेठ आहे, सिंहगड आहे, फरग्युसन रोड आहे, खुपकाही आहे फिरायला पुण्यात. पुणे आपलच आहे की हो, लोकांच्या ह्रुदयात आपला ठसा उमटवणार.

मागच्या आठवडयात पुण्यात आलो होतो. काकांशी बोलत होतो. पुण्याबद्दलच्या त्यांच्या आठवणी ते सांगत होते. चर्चा जेंव्हा संपली तेंव्हा मन थोड़ उदास झाल. पहिलेच पुणे आणि आत्ताच पुणे केवढ बदलल ते सांगत होते. बैठी घर जावून इमारती आल्या. इमारती गेल्या टॉवर उभे राहिले. कारकुनी ऑफिसच्या जुनाट इमारती गेल्या चकाचक ग्लासवाले मोठे कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभे राहिले. सर्व टेक्नोलॉजी बेस झाल.
 आयटी पार्क आले. लोक रात्री जागुन काम करायला लागले. पुण्यातल समाधान होटल, लोक पाहिले लग्नाचा  बस्ता बांधला की ह्याच होटलमध्ये येयचे नाशत्यासाठी. आजकाही तो प्रकार राहिला नाही. फ्लैट्स संस्कृती मधे शेजार्यांचे एकमेकांकडे येणे बंद झाले. आजकालची जनरेशन एका वर्षात 5 लाख कमवते, काकांना निवृत्ती नंतरही 5 लाख नाही मिळाले. काळ बदलला, पैसा वाढला, जनरेशन गैप वाढली, एकमेकांमधला संवाद कमी झाला. काका बोलत होते, तुम्ही पूर्ण दिवस कंप्यूटर समोर एसी मधे बसता. बाहेर दुपार, संध्याकाळ, रात्र कधी होते ते कळत नाही तुम्हाला. सर्वकाही बदलय, रात्री  उशिरा  येयच, झोपायच. सकाळी उठून परत कामावर. येणार भविष्य सुंदर करण्यासाठी आज तहान, भूक, झोप विसरून काम करतोय. पण आजचा दिवस फाट्यावर मारतोय तो कशासाठी.

काका बोलत होते. तुमची जनरेशन आमच्या समोर आहे ज्यांना आम्ही सांगतोय की पुणे अस होत  पहिले. तुमच्या पुढच्या जनरेशनला तर हे पुणे बघायला ही मिळणार नाही. तेंव्हा तुम्हीच आसाल, जे तुमच्या पुढच्या पिढीला सांगाल की पुणे अस होत.

काळ बदलतोय. पुणे ही नक्कीच बदलेल. पण सुरवातीला सांगितल्याप्रमाणे  पुणे आपल स्वतःच अस्तित्व कधीच पुसू देणार नाही.

चला, मित्रांनो निरोप घेतो। परत  भेटूच।

अभिजीत