पुण्याला जेंव्हा जेंव्हा भेट दिली तेंव्हा पुणे नेहमी आपलसच वाटल. पुण्यात मॉल संस्कृती आली, बहुभाषिक लोक आले, तरीही पुणे काही बदलल नाही. आजही "अरे राव, बस का राव" काही कमी झाल नाही राव.
पुण्यात आलो की रात्री दिड दोन वाजेपर्यंत बाइक ने फिरायच. फक्त पान खाण्यासाठी किंव्हा कटिंग चायसाठी सर्व माहीत असलेल्या टपऱ्या हुडकायच्या, शेवटी सारस बाग च्या पाठ च्या खाऊ गल्लीत येयच. ही गल्ली रात्रि दिड वाजे पर्यंत ही चालू असते. इथे ज्या कामासाठी आलोय ते काम उरकायच आणि घर गाठायच.
गारठवणाऱ्या थंडीत रात्री सुनसान रस्त्यांवर बाइक जोरात दामटवण ह्या सारखी मजा दुसरी कसलीच नाही. खुप अगोदर पासून पुण्यातल्या हिरवळीबद्दल खुप काही ऐकून आहे. पण प्रत्यक्षात कधी स्पष्टपणे बघता नाही आली. जेंव्हा बघाव तेंव्हा स्कूटीवर आतंकवादी काईंड ऑफ़ मफलर घालून मुली फिरत असतात. त्यामुळे चेहरे कधी व्यवस्थित दिसलेच नाहीत. कसला त्रास असतो त्यांना, त्यांनाच ठाउक :)
पुण्यात आल की वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. पर्वती आहे, सारस बाग़ आहे, दगडू शेठ आहे, सिंहगड आहे, फरग्युसन रोड आहे, खुपकाही आहे फिरायला पुण्यात. पुणे आपलच आहे की हो, लोकांच्या ह्रुदयात आपला ठसा उमटवणार.
मागच्या आठवडयात पुण्यात आलो होतो. काकांशी बोलत होतो. पुण्याबद्दलच्या त्यांच्या आठवणी ते सांगत होते. चर्चा जेंव्हा संपली तेंव्हा मन थोड़ उदास झाल. पहिलेच पुणे आणि आत्ताच पुणे केवढ बदलल ते सांगत होते. बैठी घर जावून इमारती आल्या. इमारती गेल्या टॉवर उभे राहिले. कारकुनी ऑफिसच्या जुनाट इमारती गेल्या चकाचक ग्लासवाले मोठे कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभे राहिले. सर्व टेक्नोलॉजी बेस झाल.
आयटी पार्क आले. लोक रात्री जागुन काम करायला लागले. पुण्यातल समाधान होटल, लोक पाहिले लग्नाचा बस्ता बांधला की ह्याच होटलमध्ये येयचे नाशत्यासाठी. आजकाही तो प्रकार राहिला नाही. फ्लैट्स संस्कृती मधे शेजार्यांचे एकमेकांकडे येणे बंद झाले. आजकालची जनरेशन एका वर्षात 5 लाख कमवते, काकांना निवृत्ती नंतरही 5 लाख नाही मिळाले. काळ बदलला, पैसा वाढला, जनरेशन गैप वाढली, एकमेकांमधला संवाद कमी झाला. काका बोलत होते, तुम्ही पूर्ण दिवस कंप्यूटर समोर एसी मधे बसता. बाहेर दुपार, संध्याकाळ, रात्र कधी होते ते कळत नाही तुम्हाला. सर्वकाही बदलय, रात्री उशिरा येयच, झोपायच. सकाळी उठून परत कामावर. येणार भविष्य सुंदर करण्यासाठी आज तहान, भूक, झोप विसरून काम करतोय. पण आजचा दिवस फाट्यावर मारतोय तो कशासाठी.
काका बोलत होते. तुमची जनरेशन आमच्या समोर आहे ज्यांना आम्ही सांगतोय की पुणे अस होत पहिले. तुमच्या पुढच्या जनरेशनला तर हे पुणे बघायला ही मिळणार नाही. तेंव्हा तुम्हीच आसाल, जे तुमच्या पुढच्या पिढीला सांगाल की पुणे अस होत.
काळ बदलतोय. पुणे ही नक्कीच बदलेल. पण सुरवातीला सांगितल्याप्रमाणे पुणे आपल स्वतःच अस्तित्व कधीच पुसू देणार नाही.
चला, मित्रांनो निरोप घेतो। परत भेटूच।
अभिजीत
No comments:
Post a Comment