Monday, November 22, 2010

प्रेम.....बघता क्षणीच!

प्रेम. आयुष्यात प्रत्येकाला एकदा का होईना प्रेम होतच. हे खुप ठिकाणी ऐकल आहे आपण. कमीत कमी एकदा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा प्रेम होवू शकत. हे माझ मत आहे. (खुपजण माझ्या ह्या मताशी सहमत नाही होणार पण काहीजण  नक्कीच सहमत होतील) असो.

माझ्या मते प्रेम हे नेहमी love at first sight च असत. बघायला गेल तर खुप सिंपल आहे. एखादी मुलगी आपल्याला बघताच क्षणी आवडते. तिचा चेहरा, तिचे डोळे, तिची स्माईल आपल्याला वेड करून जाते. आपल्याला तिचा स्वभाव, तिचे विचार ही माहीत नसतात. तरीही आपल्याला ती आवडते. (इथे काहीजण बोलतील की हे फ़क्त attraction आहे) तर मी अस म्हणेन की प्रेमाची पाहिली पायरी हे attraction च आहे. एकमेकांचे स्वभाव जाणून घेयला अख्ख आयुष्य पडलय हो.

खुप वेळा मैत्रीतून प्रेम तयार होत. एखादी मुलगी फ़क्त आपली मैत्रिण असते. आपण काही वेळ तिच्या सोबत घालवतो. तिचे विचार आपल्याला आवडतात, स्वभाव जुळतात आणि आपण प्रेमात पडतो. माझ्या मते एकमेकांना समजुन घेवुन नंतर प्रेम कसे करायचे?? (या वर तुम्ही बोलाल की नुसत प्रेम महत्वाच नाही, एकमेकां सोबत आयुष्य घालवायच आहे त्यासाठी स्वभाव, विचार जुळण गरजेच आहे.) तुम्ही जे बोलत आहात ते बरोबर आहे. पण माझ्या मते, प्रेमात पडल्यावर बघा स्वभाव च काय आहे ते. स्वभाव जुळतात म्हणून प्रेमात कसे पडायचे??? सगळ्या गोष्टी adjust करता येतात हो पण प्रेम नाही adjust करता येत.

आपल्याला प्रेम व्हायच असेल तर ते बघता क्षणीच होत. दूसरा कुठला way नाही प्रेम होण्यासाठी. म्हणून खुप विचार, दुनियादारी करून काही फायदा नाही. शांत रहा. आपल स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि महत्वाच म्हणजे आयुष्य एन्जॉय करा.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

.

Thursday, November 18, 2010

केवढा हा त्रास.....

कधी कधी लिहिण्यासाठी विषय सापडत नाही, कधी कधी एखादा विचार डोक्यात येतो आणि आपण लिहिण्यासाठी बसतो. तुमच्या रोजच्या आयुष्यात अशा खुप काही गोष्टी घडतात की ज्याचा तुम्हाला त्रास होतो. मग सहाजिकच आपण तत्वन्यानी बनतो, काही तत्व निर्माण करतो स्वताची की जेणेकरून होणारा त्रास कमी व्हावा. आपल्याला होणारया त्रासातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करावे लागतील ते आपण करावेत. पण बघायला गेल तर आयुष्यात येणारे हे प्रोब्लेम्स खुप मजेशीर असतात. शेवटी काय हो प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोण. (खुप झाली प्रस्तावना, आता जरा पाहुया काय प्रोब्लेम असतात ते) 

१. आपण  कामाला निघतो. कड़क इस्त्री केलेला शर्ट घालून ट्रेन मध्ये चढतो. उतरे पर्यंत त्या शर्ट चे जे काही हाल झालेले असतात ते आपल्यालाच पहावत नाही आणि ज्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी हे प्रयत्न केलेले असतात, ते एका क्षणात विफळ होतात. केवढा हा त्रास.

२. आपण कॉलेज ला जायला निघतो. नविन कपडे घातलेले असतात आणि पक्षी त्यावर आपले सकाळचे विधि उरकतात. काय अवस्था होत असेल आपली.

३. आपण बार मध्ये ड्रिंक्स घेत असतो आणि समोरच आपल्या ओळखिची एक व्यक्ति बसलेली असते.
(ती व्यक्ति बहुतेक वेळा आपल्या वडिलांच्या ओळखिचीच असते)

४. टपरीवर आपण सिगरेट मारत असतो आणि तेंव्हाच कोणतरी रिक्षातून आपल्याकडे बघत निघून जात.

५. जी मुलगी आपल्याला आवडत असते, तिला नेमक दुसर कोणतरी आवडत असत.

६. graduation, post-graduation करून ही, आयुष्य सेटल होई पर्यंत अर्ध आयुष्य निघून गेलेल असत.

७. ज्या मुलीशी आपल वाकड असत, ती अशी ना तशी आपल्या समोर येतेच.

८. वर्षभर काम करूनही appraisal चांगल मिळत नाही.

९. लग्न करताना प्रेम महत्वाच नाही, पैसा महत्वाचा आहे. भूतलावर बहुतेक सर्व लोकांनी हे मान्य केलेल आहे. (मग हुंडा मागणे हा गुन्हा का आहे???)

१०. ज्या मुलीवर आपल प्रेम असत, त्याच मुलीच्या मैत्रिणीच आपल्यावर प्रेम असत.

११. खिशात १००० रुपये असताना, खरेदी करताना आपल्याला २००० ची  जीन्स आवडते. (पण १००० रुपयात आपल्याला जीन्स आणि शर्ट दोन्ही खरेदी करायच असत हो)

१२. एखाद्या मुलीला तुम्ही आवडत असाल तरीही तुम्हीच तिला propose करावा असा तिचा अट्टाहास का???

१३. जी मुलगी तुम्हाला आवडते, ती दुसऱ्या कोणाची तरी प्रेयसी असते.

१४. ज्या दिवशी आपल्याला लवकर घरी जायच असत, त्याच दिवशी आपण उशिरा घरी येतो.

१५. मोबाइल वर काही महत्वाच बोलत असताना, मोबाइल स्विच ऑफ होणे, मोबाइल च नेटवर्क गायब होणे, मोबाइल मध्ये disturbance येणे, अशा गोष्टी घडतात.

खुप प्रोब्लेम सांगितले हो. अजुन ही बरेच असतील, आठवत नाहीत मला आता. हे एवढे प्रोब्लेम लिहून काढण्याचा सुद्धा केवढा हा त्रास.

चला निरोप घेतो, परत भेटूच.

अभिजीत  

Tuesday, November 16, 2010

मला तिला भेटायच आहे.....

मागचा महिना आणि दिवाळी चा पहिला आठवडा, मस्त मजा मस्ती चालू होती. एरव्ही पण असतेच हो पण दिवाळी म्हंटल की जरा जास्तच. आणि मित्र म्हंटले की मजा मस्ती आलीच हो. दिवाळी चा पहिला दिवस म्हणजे खुपच भारी दिवस. 

ह्यावेळे ही असच, सकाळी लवकर (म्हणजे ८ वाजता) आंघोळ उरकली आणि मित्रांना भेटायला राम मारुती रोड वर आलो. (मी ठाण्याला राहतो, आमच्या इथल खुप प्रसिद्ध ठिकाण) दिवाळी च्या पहिल्या दिवशी ठाण्यात राम मारुती रोड, तलावपाळी, कोपिनेश्वर मंदिर ह्या ठिकाणी तरुण वर्गाची जरा जास्तच गर्दी असते. मी ही त्याच गर्दीचा एक हिस्सा आहे. 
(विषयांतर होत आहे मी मूळ मुद्द्याकडे येतो)

मी राम मारुती रोड वर आलो. तिथे कुठल्यातरी एका संस्थेतर्फे एक band group आला होता. कुठली तरी नविन जुनी गाणी ते गात होते. गर्दी ही चांगली जमली होती. (कधी संपणार हो ही प्रस्तावना, मूळ मुद्द्या कडे येयच राहून जातय) 
(एकंदरीत तुमच्या डोळ्या समोर चित्र उभ राहिल असेल की, सकाळी ८-९ वाजताच थंड वातावरण, तरुण तरुणीनी भरलेला राम मारुती रोड, त्या band group च्या गाण्यांनी सजलेला आसमंत)

आम्ही नंतर कोपिनेश्वर मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला कारण आमचा एक मित्र आम्हाला तिथेच भेटणार होता. पण मुलीं वरून नजर काही हटत नव्हती. खुप सुंदर दिसत होत्या. (ज्या मुलीला नेहमी जीन्स आणि टीशर्ट मध्ये पाहिलेल असत, तिला साडी मध्ये पाहण्याची मजा काही औरच असते) मुली साडी परिधान करुनच खुप सुंदर दिसतात, माझ्या ह्या वाक्याशी सर्वजणच सहमत असतील. (खुप झाल, परत विषयाकडे याव)

मंदिरात जाण्यास आम्ही निघालो. वाटेवरच कूल कैंप नावाच आइसक्रीम पार्लर येत. आम्ही काही तिथे ब्रेक घेतला नाही. पण तिथे एका मुलीने माझ लक्ष वेधून घेतल. तिची सुंदरता मी शब्दात नाही व्यक्त करू शकणार. खुप सुंदर आहे दिसायला ती. तीच नाव मी इथे नाही घेणार. (ह्याच मुलीला मी एक आठवडया पूर्वी गोखले रोड वर तिच्या आई सोबत पाहिल होत) कूल कैंप ला ती मैत्रिणीं सोबत उभी होती.

तिथून आम्ही पुढे निघालो, ते थेट मंदिरातच आलो. अगोदरच उशीर झाला होता. आमचा मित्र वाट पाहून वेडा झाला होता. त्याला आलेला राग त्याच्या बोलण्यातुन प्रगट होत होता. थोड्यावेळाने काही जण मंदिरात दर्शनासाठी गेले आणि आम्ही  बाहेरच थांबलो. काही ओळखीचे चहरे दिसले, त्यांना भेटलो. कॉलेज च्या आठवणी ताज्या केल्या. निघण्या आधी फोटो बीटो काढले.बाहेर थांबायच कारण म्हणजे मुली पाहणे एवढच. (खुपच विषयांतर होत आहे, मंदिराचा हा प्रसंग घालण, हे काही एवढ महत्वाच नव्हत पण म्हंटल असू दे)

नंतर आम्ही जो मोर्चा वळवला तो पेटपूजे कडे. साईं कृपा मध्ये पेटपूजा करून झाली. नंतर आम्ही थेट आलो ते सिगरेट च्या टपरी वर. तिथे ठरल की गोलमाल ३ बघुया, म्हणून दोघे जण बाईक ने जावून टिकिट मिळतील की नाही ते पाहून आले. शो काही एवढे हाउसफुल नव्हते म्हणून दुसऱ्या दिवशी येवून टिकिट काढण्याचे ठरले. गेली २ वर्षे आम्ही दिवाळीत  मूव्ही पाहत आलेलो आहोत. चांगला असो वा बकवास, पहायचा नक्की. अनुभव काही चांगला नाही कारण मागच्या वर्षी 'blue' पहिला आणि त्याच्या आदल्या वर्षी 'om shanti om' पहिला. तुम्हाला सांगायला नको, काय आमची अवस्था झाली असेल ती. असो दुसऱ्या दिवशी आम्ही eternity ला आलो. टिकिट काढायच होत ना हो.

mall च्या campus मध्ये उभा होतो. मित्र बोलला, रिक्षातून जी उतरत आहे तिला बघ. बघतो तर काय. काल जिला आइसक्रीम पार्लर बाहेर पाहिल होत, तीच होती. २ आठवडयात ३ वेळा ती माझ्या समोर आली होती. एकदा गोखले रोड वर, दुसर्यांदा कूल कैंप आइसक्रीम पार्लर बाहेर आणि तिसर्यांदा eternity mall मध्ये. घरी गेल्यावर मी तीच फेसबुक प्रोफाइल शोधून काढल. (नाव माहीत असल्यामुळे ते सहजच सापडल) पण तिला काही मी friend request पाठवली नाही. साधारण १ महीन्या पूर्वी एका मित्राशी मी ह्या मुली बद्दल बोललो होतो. माझी काही अपूर्ण राहिलेली काम पूर्ण झाली की मला तिला भेटायच आहे. बघू, कस काय जमतय ते.

गोलमाल ३ विषयी सांगायच राहून गेल की हो. संध्याकाळच्या शो च टिकिट काढल. मूव्ही म्हणाल तर फुल ऑन टाइमपास  आहे. डोक बाजूला ठेवा आणि मूव्ही एन्जॉय करा. (मी काही इथे गोलमाल ३ ची advertisement  नाही करत आहे)

चला निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 

Wednesday, November 10, 2010

सर्वसामान्य माणूस

मागचा १ महिना काही लिखाण झाल नाही. वाटायच लिहावस पण काही विषय मिळत नव्हता. आणि आज ही असा काही महत्वाचा विषय नाही. आयुष्यात महत्वाच अस काही घडतच नाही आहे. तस बघितल तर सर्व सामान्यांच्या आयुष्यात काय महत्वाच घडत अस??? शेतात राबणारया शेतकरया पासून ते औद्योगिक शहरात काम करणारया नोकरदार वर्गापर्यंत. काय आहे आपल आयुष्य???

शेतकरी शेतात राबराब राबतो, मेहनत करतो, पिक काढतो पण किती किंमत भेटते त्याला त्या पिकाची??? (श्रीमंत शेतकर्यां बद्दल मी इथे बोलत नाही आहे.) आपल्याकडे गरीब शेतकर्यांची संख्या जास्त आहे हो. त्यांना एक चांगल आयुष्य जगण्याचा अधिकार नाही आहे का?? मी आजकल खुप लोकांकडून ऐकतो की गावाकडच आयुष्य खुप सुंदर. गावाकडच निसर्ग सौंदर्य अप्रतिम. कामातून निवृत्त झालो की गावाला जावून राहणार, वगैरे. पण तिथे जावून कोणी आपल्याला त्यांच्या सारख खडतर आयुष्य जगण्यास सांगितल तर आपण जावू का???

औद्योगिक शहरात काम करणारा नोकरदार वर्ग. गावतल्या लोकांना खुप अप्रूप असत शहराच. पण शहरातले लोक काय आयुष्य जगत आहेत हो??? आपण किती तास काम करायचे, हे इथे कोणी पाळत नाही. सकाळी कामावर जाण्याची वेळ फिक्स, पण घरी येण्याची??? (काही सरकरी कार्यालय सोडली तर सगळयांची परिस्थिति हीच आहे.) आम्ही कमवण्यासाठी जगतो का जगण्यासाठी कमावतो??? हाच प्रश्न आहे. महिना आखेर एक फिक्स रक्कम घरात येते. त्या तुटपुंज्या रकमेतून, किती गोष्टी आपल्याला करायच्या असतात. बिल्स भरण्यापासून ते राहत्या घराचे हफ्ते भरे पर्यंत. तुमची मजा मस्ती तर राहिलीच बाजूला. मग का हा एवढा खटाटोप??? तुम्ही बोलाल की आज आमचे पगार वाढले आहेत. आम्ही जास्त खर्च करू शकतो. पण खर्च करण्यासाठी असा कितीसा वेळ तुमच्याकडे असतो??? असे किती जण आहेत की जे work satisfaction म्हणून काम करतात?? सोमवार ते शुक्रवार घासायची आणि वीकेंड ला ढोसायची. (दारू पिणे हा ही enjoyment चा भाग आहे शेवटी, खुप लोक सहमत होतील माझ्या ह्या वाक्याशी.) शेवटी काय हो, कमवण्यासाठी जगत आहोत आपण. खरच आयुष्य एन्जॉय करण विसरलो आहोत आपण.

आपल्याला अशा जगण्याची एवढी सवय झाली आहे की, आयुष्य हे असच असत. हा आपला समज झाला आहे. शेवटी  सर्व सामान्य माणस ही पदवी आपल्याला बहाल केली गेली आहे. ह्या चाकोरी बाहेर या. आयुष्य एन्जॉय करा.

अभिजीत