मागचा १ महिना काही लिखाण झाल नाही. वाटायच लिहावस पण काही विषय मिळत नव्हता. आणि आज ही असा काही महत्वाचा विषय नाही. आयुष्यात महत्वाच अस काही घडतच नाही आहे. तस बघितल तर सर्व सामान्यांच्या आयुष्यात काय महत्वाच घडत अस??? शेतात राबणारया शेतकरया पासून ते औद्योगिक शहरात काम करणारया नोकरदार वर्गापर्यंत. काय आहे आपल आयुष्य???
शेतकरी शेतात राबराब राबतो, मेहनत करतो, पिक काढतो पण किती किंमत भेटते त्याला त्या पिकाची??? (श्रीमंत शेतकर्यां बद्दल मी इथे बोलत नाही आहे.) आपल्याकडे गरीब शेतकर्यांची संख्या जास्त आहे हो. त्यांना एक चांगल आयुष्य जगण्याचा अधिकार नाही आहे का?? मी आजकल खुप लोकांकडून ऐकतो की गावाकडच आयुष्य खुप सुंदर. गावाकडच निसर्ग सौंदर्य अप्रतिम. कामातून निवृत्त झालो की गावाला जावून राहणार, वगैरे. पण तिथे जावून कोणी आपल्याला त्यांच्या सारख खडतर आयुष्य जगण्यास सांगितल तर आपण जावू का???
औद्योगिक शहरात काम करणारा नोकरदार वर्ग. गावतल्या लोकांना खुप अप्रूप असत शहराच. पण शहरातले लोक काय आयुष्य जगत आहेत हो??? आपण किती तास काम करायचे, हे इथे कोणी पाळत नाही. सकाळी कामावर जाण्याची वेळ फिक्स, पण घरी येण्याची??? (काही सरकरी कार्यालय सोडली तर सगळयांची परिस्थिति हीच आहे.) आम्ही कमवण्यासाठी जगतो का जगण्यासाठी कमावतो??? हाच प्रश्न आहे. महिना आखेर एक फिक्स रक्कम घरात येते. त्या तुटपुंज्या रकमेतून, किती गोष्टी आपल्याला करायच्या असतात. बिल्स भरण्यापासून ते राहत्या घराचे हफ्ते भरे पर्यंत. तुमची मजा मस्ती तर राहिलीच बाजूला. मग का हा एवढा खटाटोप??? तुम्ही बोलाल की आज आमचे पगार वाढले आहेत. आम्ही जास्त खर्च करू शकतो. पण खर्च करण्यासाठी असा कितीसा वेळ तुमच्याकडे असतो??? असे किती जण आहेत की जे work satisfaction म्हणून काम करतात?? सोमवार ते शुक्रवार घासायची आणि वीकेंड ला ढोसायची. (दारू पिणे हा ही enjoyment चा भाग आहे शेवटी, खुप लोक सहमत होतील माझ्या ह्या वाक्याशी.) शेवटी काय हो, कमवण्यासाठी जगत आहोत आपण. खरच आयुष्य एन्जॉय करण विसरलो आहोत आपण.
आपल्याला अशा जगण्याची एवढी सवय झाली आहे की, आयुष्य हे असच असत. हा आपला समज झाला आहे. शेवटी सर्व सामान्य माणस ही पदवी आपल्याला बहाल केली गेली आहे. ह्या चाकोरी बाहेर या. आयुष्य एन्जॉय करा.
अभिजीत
No comments:
Post a Comment