Friday, December 31, 2010

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.....

आज ३१ डिसेंबर २०१०, वर्षाचा शेवटचा दिवस. तुम्ही आज पर्यंत माझ्या ब्लॉग ला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुम्हा सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना येणारे वर्ष समाधानाचे, समृद्धिचे, आनंदाचे जावो.

ह्या वर्षाचा शेवटचा ब्लॉग मी पब्लिश केला आहे. ही एक कविता आहे. "उरले काही तास शेवटचे....."


चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

Thursday, December 30, 2010

रेस्टोरेंटमधली पहिली भेट.....

अजुन अशीच एक आठवणीतली मैत्री. आठवणीतली एक मैत्री हा ब्लॉग जेंव्हा मी लिहित होतो तेंव्हा अशा बर्याच व्यक्ति माझ्या डोळयासमोर आल्या. त्यातलीच ही एक व्यक्ति.

दोन अडीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळेस मी खुप मुलींना ऑरकुट वरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या होत्या. प्रतिसाद ही चांगला भेटला. त्याप्रमाणे पुष्कळशा मुली अकाउंटला add ही झाल्या. काहीजणी चांगल्या मैत्रिणी बनल्या. काहीजणी कालांतराने निघून गेल्या. काही चांगल्या मैत्रिणी पैकी ही एक. आम्ही दोघे एकाच शाळेतले, म्हणून तिने माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली होती. कालांतराने फ्रेंडशिप वाढत गेली. मोबाईल नंबर एक्सचेंज झाले. जी-टॉक वरती तिने तिचा फोटो ही दाखवला. पण फोटो दाखवताना केवढे नखरे केले असतील तिने, काय सांगू तुम्हाला. स्वतः चा फोटो दाखवताना कशाला एवढे नखरे करायचे हे कळत नाही मला. असो. तो ज्याचा त्याचा प्रश्न.

कालांतराने आम्ही भेटण्याच ठरवल. त्याप्रमाणे गोखले रोड वरती असलेल्या अमृता रेस्टोरेंट मध्ये आम्ही भेटलो. काय आर्डर केल असेल हे तुम्हाला कळलच असेल. अमृताची स्पेशालिटी पाव-भाजी आहे की हो. मग तेच मागवल. साधारण एक दिड तास आम्ही तिथे होतो. गप्पा मारल्या, मजा केली. पहिल्यांदाच भेटलो होतो पण बोलताना एकदम कम्फर्टेबल होती ती. तिच्या सोबत वेळ कसा गेला कळल नाही.

ह्या मैडम ने आपल्या आई ला सांगितल होत की, ती मला ह्या ह्या ठिकाणी ह्या ह्या वेळेला भेटणार आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटल. कारण माझ्या अनुभवानुसार मुली अस काही सांगत नाहीत घरात. असो. आज ही आम्ही एकमेकांच्या contact मध्ये आहोत. सध्या तिने C.A. ची फायनल वर्षाची परीक्षा दिली आहे. खुप मेहनती आहे. down to earth person. C.A. होण हे तीच स्वप्न आहे, ते पूर्ण होवो ही इच्छा.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

Tuesday, December 28, 2010

८ वर्ष जुनी मैत्री.....

काल एका मैत्रिणीकडे सत्य नारायणाच्या पूजेसाठी गेलो होतो. पोहचायला तसा उशीरच झाला होता. पण एकंदरीत सर्व कार्यक्रम तसा चांगला पार पडला. घरी येयला रात्रीचा १ वाजला. माझी झोपायची वेळ साधारण हीच आहे. पण झोप काही येत नव्हती. तिच्या सोबत घालवलेले काही क्षण, कॉलेज चे ते दिवस आठवले आणि मन आठवणी मध्ये रमत गेल.

८ वर्षापूर्वी कॉलेज नवरंग ला आमची ओळख झाली होती. तेंव्हा पासून आम्ही ओळखतो एकमेकांना. ग्रेजुएशनची शेवटची ३ वर्ष ती कोल्हापुरला होती. पण आज ही ते नवरंग चे दिवस आठवले की हसायला येत. खुप धमाल केली होती. सुरवातीचे काही दिवस आम्ही खुप कमी बोलायचो. कालांतराने फ्रेंडशिप वाढत गेली. पण फ्रेंडशिप समजण्याच, वाढवण्याच, निभवण्याच ते वय ही नव्हत. साधारण १ वर्षा नंतर ती कोल्हापुरला निघून गेली.

इकडे मी माझ्या लाइफ मध्ये बिझी झालो आणि ती तिकडे तिच्या लाइफ मध्ये. खुप कमीवेळा भेटलो आहोत आम्ही आजपर्यंत. शेवटी काय हो मी कधी कोणाला फोर्स नाही करत भेटण्यासाठी. मला एवढच वाटत की, समोरच्या व्यक्तीला मनापासून वाटत असेल तरच त्या व्यक्तीने मला भेटाव. असो. कालांतराने तीच ग्रेजुएशन पूर्ण झाल. ती मुंबईला परत आली. फिरण्याची खुप आवड या मैडम ना. ठाणे, पुणे, कोल्हापुर सारख्या फिरतीवर असतात. आता गेली २ वर्ष मुंबईतच आहेत. तेंव्हा आता आमच भेटण होत.

ग्रेजुएशन पूर्ण झाल्यावर तिने तीच पोस्ट ग्रेजुएशन पुण्यातून केल. आता पर्यंत आमच्याकडे मोबाईल आले होते. आता संपर्कात राहण जरा जास्त सोयीस्कर झाल होत. पुणे ते ठाणे तासनतास गप्पा मारल्या आहेत आम्ही, कधी सीरियस तर कधी एखाद्या गंमतीदार टॉपिकवर. कधी भांडलो आहोत तर कधी एकमेकांना समजुन घेतल आहे. जे काही क्षण एकत्र घालवले ते स्मरणात राहिले. गेली ८ वर्ष ना ती कधी माझ्या वाढदिवसाच्या पार्टीला आली ना कधी मी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलो. पण जेंव्हा जेंव्हा आम्ही भेटलो तेंव्हा तेंव्हा फुल ऑन एन्जॉय केल. मग ते एखाद्या होटेल मधल डिनर असो वा एखाद्या mall मध्ये बसून मारलेल्या वायफळ गप्पा असोत.

आज जेंव्हा मी तिच्याकडे पाहतो तेंव्हा मला खुप बर वाटत. कारण आयुष्य कस जगायच आहे हे तिला समजतय. गरज पडली तर ठामपणे ती निर्णय घेवु शकते. हल्ली आम्ही सहसा मोबाईल वर बोलत नाही. कधी भेटलो तर बोलण होत. पण तीच आणि माझ बोलण म्हणजे खुप मजाक मस्ती आणि खुप कमीवेळा सीरियस.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

Monday, December 27, 2010

आज वो मंझर भी कुछ धुंदला सा है.....

उसका चेहरा कुछ धुंदला सा है
उसकी यादे भी कुछ धुंदली सी है
पता नही किस मोड़ पे वो मिली थी मुझे
आज वो मंझर भी कुछ धुंदला सा है.

अभिजीत

रात का नशा अभी ढला नही.....

रात का नशा अभी ढला नही
प्यार का खुमार अभी छाया नही
रोज आती तो है वो सपनों में
पर प्यार का इजहार अभी हुआ नही.

अभिजीत

Friday, December 24, 2010

आठवणीतली एक मैत्री.....

उद्या २५ डिसेंबर नाताळ. २ वर्षापूर्वी ह्याच दिवशी एका मुलीला मी तलावपाळी ला भेटलो होतो. भेट काही जाणून बुजुन घडवून आणली नव्हती. अचानकपणे आम्ही एकमेकां समोर आलो होतो. पहिल्यांदाच समोरा समोर बोलणही झाल. मी हिला २ वर्षापूर्वी भेटलो हे खर पण ह्याची सुरवात साधारण त्याच्याही ६ महीने अगोदर झाली होती.

त्या वेळेस ऑरकुट खुप प्रसिद्ध होत. खुप जणांची फ्रेंडशिप जमवून देण्यात ऑरकुट चा हातखंडा होता. मी ही एकदा माझ ऑरकुट प्रोफाइल चेक करत होतो. तेंव्हा एका मुलीच प्रोफाइल मला चांगल वाटल. मी तिला add request पाठवली. तिने ही जास्त आढेवेढे न घेता request एक्सेप्ट केली. वरचेवर एकमेकांना स्क्रैप पाठवण चालू झाल. फ्रेंडशिप वाढू लागली. काही दिवसांनी g-talk ला आम्ही एकमेकांना add केल. आणि बऱ्या पैकी बोलण चालू झाल. तासनतास बोलत बसलो आहोत आम्ही chat वर. विषय कसे सापडायचे माहीत नाही. पण बोलायला बसलो तर विषयांची कमी नसायची. तिचा नेहमी एकच विषय असायचा बोलताना आणि तो म्हणजे फ्रेंडशिप. तिच्यासाठी फ्रेंडशिप म्हणजे सर्वकाही. करीअर, फॅमिली, स्वतःच्या आयुष्या पेक्षा ही जास्त महत्त्व फ्रेंडशिप ला. मला थोड आश्चर्य ही वाटायच आणि थोडा राग ही येयचा. अस वाटायच की तिला स्वतःच अस्तित्व अस काही नाही. मित्र मैत्रिणी बोलतील तेच तीच लाईफ. कोणीही तिचा फायदा घेवु शकत. कोणीही तिला हर्ट करू शकत. तरीही या मैडम शांतच राहणार. खुप समजवायचो. काही गोष्टी तिला समजल्या, काही अनुभवाने समजल्या. शेवटी काय हो काळ सगळयांना शिकवतोच की. २ वर्षा पूर्वीची ती आणि आजची ती.....ह्या मध्ये खुप फरक आहे.

एकदिवशी आम्ही chat वर बोलत असताना, मोबाईल चा विषय निघाला. तो पर्यंत आम्ही आमचे मोबाईल नंबर पण एक्सचेंज केले नव्हते. त्यावर शेवटी आमच अस ठरल की ज्या दिवशी आम्ही अचानक पणे एकमेकां समोर येवू त्या दिवशी आपण मोबाईल नंबर एक्सचेंज करू. आता आमच ठरवून भेटण होणारच नव्हत. कसे भेटणार होतो याची काहीच कल्पना नव्हती.
त्या नंतर बरेच दिवस आमच बोलण असच चालू होत. मोबाईल नंबर, भेटण हा विषयच नसायचा. खुप विषयांवर आम्ही बोललो. काही विषयांवर आमची भांडण झाली. पण फ्रेंडशिप नेहमीच टिकली. माझ्या मते फ्रेंडशिप हे निभवण नसत, तर ते एक जगण असत. एकमेकांकडून काहीही एक्स्पेक्ट न करता ते रिलेशन एन्जॉय करण.

नंतर मी तिला एक दोन ठिकाणी पाहिल ही होत. पण समजायच नाही की ती नक्की हीच आहे का?? त्या वेळेला ह्या मैडम ना पण समजायच की आपल्याकडे कोणतरी बघतय पण हिच्या चेहर्यावर काही हावभाव नसायचे. मग मी ही कसा जाणार हो डायरेक्ट विचारायला. नंतर chat ला भेटल्यावर तिला विचारायचो, की तूच होती का ती. तर मैडम हो बोलायच्या. आणि मी का नाही आलो बोलायला अस बोलून माझ्याशीच वाद घालायच्या. काय बोलणार मी. तिला विचारायचो, तू का नाही आलीस. तर मुलींची ठरलेली टिपिकल उत्तर देयची. कठीण असत हो हे सर्व. पण कधी राग नाही आला मला तिचा. असेच करत काही महीने निघून गेले.

शेवटी २५ डिसेंबर २००८, ह्या दिवशी मी संध्याकाळी तलावपाळी वर मित्रांसोबत आलो. मैत्रिणीं सोबत ही बसली होती. मी तिच्याकडे पाहिल पण तीच काही लक्ष नव्हत. शेवटी मनाशी ठरवल आज काही झाल तरी बोलायच. गेलो तिच्या समोर, बोललो तिच्याशी. ठरवलेल्या प्रमाणे मोबाईल नंबर ही एक्सचेंज केले. जे chat वरती आम्ही ठरवल होत, ते आज पूर्ण झाल होत. आज ही आम्ही कधी राम मारुती रोडवर, कधी तलावपाळी वर भेटतो बोलतो पण काहीही न ठरवता. आणि आज ही दिवसातून एक तरी sms असतो तिचा.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Thursday, December 23, 2010

नावात काय ठेवलय?????

हल्ली ब्लॉगिंग जोरात चालू आहे. २-३ दिवसा आड़ का होईना एखादी पोस्ट टाकतच आहे. आज असाच विचार करत बसलो होतो तेंव्हा एक सुविचार आठवला. "नावात काय ठेवलय".

विचार करा. या पृथ्वी तलावर मनुष्य प्राण्याच नामः करण झाल नसत तर काय झाल असत?? जग भरातल्या मनुष्य प्राण्याला कस संबोधल असत??? किती गोंधळ उडाला असता. पेन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, लाईट बिल, टेलीफोन बिल या वर काय नाव असती??? लोकांनी एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारली असती??? जन्मलेल्या मुलांच बारस झाल असत का??? लव लेटर वर काय नाव लिहिली असती??? दोन व्यक्ति फोनवर बोलत असताना त्यांना एकमेकांची नाव माहीत असती का??? फ़क्त आवाजावरून समजाव लागल असत की माणूस आहे का स्त्री. wrong number ही पद्धत अस्तित्वात राहिली असती का??? बायकोने आपल्या पतीच नाव उखाण्यात घेतल असत का??? घरा बाहेर नावाची पाटी असती का??? स्कूल आयडी वर काय नाव असत??? लिविंग सर्टिफिकेट बनल असत का??? कॉलेज ला एडमिशन झाली असती का??? बायोडेटा बनला असता का??? बायोडेटा नाहीतर नोकरी भेटली असती का???

बापरे किती त्रास झाला असता??? पण मनुष्य प्राणी खुप हुशार हो. त्याने यातून ही मार्ग काढलाच असता. माझ्या मते यावर सोल्यूशन खुप सोप असत. माणसांनी नंबर ने एकमेकांना हाक मारली असती. प्रत्येकाला १० आकडी नंबर भेटले असते. तेच त्याच नाव असत. पेन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, लाईट बिल, टेलीफोन बिल, स्कूल आयडी, कॉलेज आयडी, बायोडेटा, एम्प्लोयी आयडी, ड्रायव्हिंग लायसंस ह्यांच्या नाव ह्या रखान्यात नावाच्या जागी नंबर असते.

प्रत्येकाने एकमेकांना नंबर ने हाक मारली असती. एकमेकांन मधल संभाषण सुद्धा काही अशा प्रकाराच असत.

१२३४५६७८९० : ०९८७६५४३२१ क्लास ला येणार आहेस का???
०९८७६५४३२१ : १२३४५६७८९०.....आज नाही जमणार रे.

हे सर्व पाहून एवढच वाटत.....खरच नावात काही ठेवलय??? :)

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत 

Wednesday, December 22, 2010

परफेक्ट कॉम्बिनेशन.....

साधारण मागच्या महिन्यातली गोष्ट आहे. लग्नाला गेलो होतो. वडिलांच्या मित्राच्या मुलीच लग्न होत. लग्न तस जवळचच होत म्हणून जाव लागल. दुपारी १२ च्या सुमारास हॉल वर आलो. फॅमिलीसाठी दुसऱ्या रांगेतली जागा पकडली. पाहिल तर वेटर पाण्याचे ग्लास घेवुन फिरत होते. त्यांच्याकडून पाणी घेतल आणि शांतपणे खुर्चीवर बसलो. काकांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी बऱ्यापैकी खर्च केला आहे हे हॉलकडे पाहुनच कळल.

मंगलाष्टके सुरु होणार होती. मी इकडे तिकडे कोणी ओळखीच आहे का ते पाहत होत. सहजच माझ लक्ष आमच्या पाठच्या रांगेतील एका मुलीकडे गेल. आई बरोबर आली होती ती. खुप सुंदर होती दिसायला अस नाही. पण माझ लक्ष तिने वेधून घेतल एवढ नक्की. साधी सिंपल पण मनाला कुठेतरी भिडणारी. आई बरोबर होती म्हणून जास्त पाहता नाही आल मला तिच्याकडे.
तेवढ्यात मंगलाष्टके सुरु झाली. आता तिच्याकडे पाहता येण शक्य नव्हत. तिच्याकडे पाहत वधुवरांवर अक्षता टाकण कठीण काम होत. म्हणून मंगलाष्टके संपेपर्यंत शांत बसलो.

वधुवरांवर अक्षता टाकत असताना सहजच माझ लक्ष स्टेज वर उभ्या असलेल्या मुलींकडे गेल. त्यातली एक मुलगी एवढी  सुंदर होती की पहातच राहिलो मी. गुलाबी रंगाची नक्षीकाम केलेली low -waist  साडी तिने घातली होती. किती मेकअप केला होता तिने माहीत नाही. पण लय भारी दिसत होती. स्टेज वरती लग्न उरकल्या नंतर तिने स्वतःच फोटोशूट सुरु केल. फोटोग्राफर काकांकडून तिने वेगवेगळया पोज मध्ये फोटो काढून घेतले. आणि कोण तिला नाही म्हणेल हो. स्वतःच्या बहिणीच ही फोटोशूट तिने करून घेतल. तिची अदा, तिचे चेहर्यावरचे हाव भाव, तिच्या पोजेस पाहून मला दोन मिनिटे हसायला आल. (हसायला आल म्हणजे ती काही हसण्यासारख करत होती म्हणुन नव्हे तर तिला स्वतः मध्ये गुंतलेल पाहून) पण तिच्या वरून नजर काही हटत नव्हती. तिला ही थोड्या वेळाने कळल की आपल्याकडे कोणतरी पाहत आहे. तिने एक ओझरती नजर माझ्यावर टाकली आणि काही झालच नाही असा भाव चेहर्यावर आणून फोटोशूट मध्ये मग्न झाली. (मुलींची ही अदा तर वेड़ लावणारी असते हो) पण मी ही कसला सोडतोय. तीच फोटोशूट पूर्ण होई पर्यंत मी तिथेच बसून होतो. थोड्या वेळा पूर्वी ज्या मुलीला आई सोबत पाहिल होत तिला मी कुठेतरी विसरलो होतो.

थोड्या वेळाने एक मित्र भेटला. त्याच्याशी गप्पा मारत बसलो. नंतर आम्ही दोघे आणि त्याचा एक मित्र असे तीन जण लंच साठी गेलो. जेवत असताना ह्या बाई तिथे आल्या कोणाला तरी शोधत. मित्राला बोललो भारी दिसते राव ही. त्यावर मित्र बोलला.....केवढा मेकअप केला आहे म्हणून सुंदर दिसत आहे. त्याच ही बरोबर होत म्हणा. पण काही असो. सुंदर होती एवढ खर. जेवण संपवल आणि बाहेर आलो सिगरेट मारायला. मित्र बराच वेळ त्याच्या ex -girlfriend विषयी सांगत होता. बाहेरच काम उरकल्यावर मी परत हॉल मध्ये आलो.

नंतर वडील, मी, काका आणि वडिलांचे काही मित्र गप्पा मारत बसलो होतो. ज्यांच्या मुलीच लग्न होत ते काका ही आमच्या सोबत बसले होते. थोड्या वेळाने मी त्या गुलाबी साडी वालीला आमच्याकडे येताना पाहिल. तीच नाव काही मला शेवट पर्यंत काढता आल नाही. पुन्हा एकदा आमची नजर भेट झाली. ती जवळ आली आणि तिने काकांना स्टेज वर येण्यास सांगितल. पण तिचा आवाज काही मला आवडला नाही. थोडा गावंढळ, थोडा घोगरा असा काही तरी तिचा आवाज होता. नंतर कळल की ती मुंबई ची नव्हती. तेंव्हा अस वाटल की जेवढी सुंदर आहे दिसायला तेवढा आवाज ही सुंदर असता तर.

नंतर सहजच एक विचार मनात येउन गेला की आपल्याला किती गोष्टी परफेक्ट लागतात. मुलगी दिसायला सुंदर असली तर तिचा आवाज ही सुंदर असावा, आवाज सुंदर असला तर स्वभाव ही चांगला असावा. ही अपेक्षांची यादी कधी संपणार नाही. शेवटी compromise कराव लागतच. सुंदरते साठी स्वभाव आणि स्वभावासाठी सुंदरता. खुप कमी वेळा आयुष्यात परफेक्ट कॉम्बिनेशन मिळत. जस आहे तस एक्सेप्ट करायला आपण शिकलो तर आयुष्य खुप सुंदर आहे.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत 

Wednesday, December 8, 2010

कोण करत हो एवढ?????

साधारण २ - ३ वर्षापूर्वीचा प्रसंग. माझ ऑरकुट प्रोफाइल चेक करत होतो. एका मुलीच प्रोफाइल खुप चांगल वाटल. तिला मी add request पाठवली. २-३ दिवसानी तिने ती request accept केली. आणि आमच scrap through बोलण चालू झाल. थोड्याच दिवसात g -talk ला आम्ही एकमेकांना add केल. २ -३ आठवडयात ह्या सर्व घडामोडी झाल्या. काही दिवसानी आम्ही मोबाइल नंबर एक्सचेंज केले. ह्या सर्व गोष्टी खुप फ़टाफ़ट घडल्या. काही चांगल घड़ायच असल की, घडतच की हो.

ती दिसायला कशी आहे हे मला माहीत नव्हत कारण ऑरकुट प्रोफाइल वर तिने कुठल्यातरी नटीचा फोटो लावला होता. पण आवाज सुंदर होता तिचा. फ़ोन वर तिच्या सोबत बोलताना वेळ कसा जायचा समजायच नाही. बोलण चालू झाल की आम्हाला वेळेच भान नसायच. एकंदरीत ती आणि मी आमच्या ह्या फ्रेंडशिप रिलेशन मध्ये comfortable होतो. पुढे जावून आम्ही भेटायच  ठरवल. त्याप्रमाणे  आम्ही वेळ, वार, ठिकाण ठरवल. मला आज ही आठवत जानेवारी चा शेवटचा आठवडा होता, आणि रविवारी सकाळी मी तिला भेटलो होतो.

भेटतानाचा प्रसंग खुप मजेशीर होता. मला माहीत नव्हत ती कशी दिसते, ती बाजुला येवून जरी उभी राहिली असती तरी मला समजल नसत की ती हीच आहे. आदल्या दिवशी रात्री आमच फ़ोन वर बोलण झाल, तेंव्हा ती बोलली होती की, ती ह्या ह्या ड्रेस कोड मध्ये येणार आहे.  मी ही तिला माझ्या शर्ट चा कलर सांगितला होता. प्लस तिला, मी कसा दिसतो हे ही माहीत होत, कारण ऑरकुट प्रोफाइल वर मी स्वताचाच फोटो लावला होता. जी काही पंचाईत होणार होती, ती माझीच होणार होती. असो, रविवार ची सकाळ उजाडली. मी ठरल्या प्रमाणे त्या जागेवर आलो. तिला कॉल केला, ती बोलली की मी रिक्षात आहे, १० मिनीटात येते. त्या जागेवरून जाणार्या प्रत्येक मुली कडे मी पाहत होतो आणि विचार करत होतो की ती कशी असेल ??? नाही म्हंटल तरी थोड टेंशन आल होत. अखेरीस अभिजीत म्हणून तिने हाक मारली. आम्ही एकमेकांना पाहिल, स्माईल केल. मी पहिल्यांदा तिला पाहत होतो. एवढे दिवस आम्ही फ़क्त फ़ोन वर बोलत होतो, आणि आज ती माझ्या समोर होती. जो प्रवास एका friends request पासून सुरु झाला होता, तो प्रवास आज तिला भेटल्यावर पूर्ण झाला होता.

मुंबई बाहेर तिच्या शहरात मी आलो होतो तिला भेटायला. आम्ही नंतर एका mall मध्ये गेलो, तिथे तिने मला एक wrist watch गिफ्ट केल. तिला माहीत होत की मला wrist watch आवडतात आणि माझ्याकडे wrist watch च कलेक्शन आहे हे.
कोण करत हो एवढ??? आणि ते ही २ महिन्यांच्या फ्रेंडशिपसाठी.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Tuesday, December 7, 2010

आयुष्य परफेक्ट बनवायच आहे.....

मागचा आठवडा घरी पाहुणे आले होते, म्हणून निवांत बसून लिहिण्यास काही वेळ मिळाला नाही. तसा मी घरी बसून काही काम करतो अस ही नाही. पण लिहिताना आजुबाजुला कोणी असलेल मला आवडत नाही. आज म्हंटल जरा वेळ आहे, तर लिहूया.

perfection or perfect or perfectionist  हे शब्द खुप वेळा मी ऐकले आहेत. तुम्ही ही ऐकले असतीलच. पण perfect म्हणजे नक्की काय??  मला तर याचा अर्थ एवढच कळतो की, जे संपूर्ण आहे, ज्यातून काही त्रुटी काढता येणार नाहीत, जे परिपूर्ण आहे. असो, मला काय म्हणायच आहे हे तुम्हाला कळल असेल.

आज प्रत्येकाला परफेक्ट रहायच आहे. प्रत्येकाला आपल आयुष्य एकदम परफेक्ट बनवायच आहे. छोट्या छोट्या गोष्टी ही एकदम परफेक्ट असल्या पाहिजेत हा आपला अट्टाहास आहे. विचार केला तर काय फालतुगिरी आहे. कशासाठी एवढ परफेक्ट रहायच आहे??? विचार केला तरी उत्तर सापडणार नाही आणि सापडल तरी ते उथळ असेल.

आता आपण जरा पाहुया की आपल्याला काय काय परफेक्ट हव आहे :-

* आपल घर, घरातल्या वस्तु ह्या गोष्टीं बद्दल आपण खुप possessive असतो. ह्या वस्तु एकदम परफेक्ट असाव्यात हा आपला अट्टहास असतो. घरातली एक जरी वस्तु त्या जागेवर नसेल तर आपल मन बेचैन होत आणि जो पर्यंत आपण ती वस्तु त्या जागेवर ठेवत नाही तो पर्यंत आपल्याला चैन पडत नाही. परफेक्ट ठेवायच आहे ना घर आपल्याला. घर स्वच्छ, सुंदर, चांगल नीटनेटक ठेवा पण त्याचा अतिरेक करू नका.

* आपल रिलेशन. एखादी मुलगी आपल्याला आवडते. आपली प्रेयसी बनते. नंतर आपण एक्स्पेक्ट करतो की ती अशी असली पाहिजे, तशी असली पाहिजे. तिने हे केल पाहिजे. ती सर्व गोष्टींमध्ये परफेक्ट असली पाहिजे, हा अट्टहास का??? एकमेकांना
judge करण, एक्स्पेक्ट करण हे कशासाठी??? जो पर्यंत तुम्ही एकत्र आहात तो पर्यंत ते रिलेशन एन्जॉय करा. प्रेम आहे म्हणून एकत्र रहा, adjustment म्हणून नाही.

* आपले मित्र मैत्रिणी. मैत्री मध्ये पण आपण खुप गोष्टी एक्स्पेक्ट करतो. फ्रेंडशिप अशी असली पाहिजे, तशी असली पाहिजे याचे तर्क वितर्क लावतो. सगळ काही परफेक्ट हव आहे ना आपल्याला.


* आपल dressing परफेक्ट असल पाहिजे हा आपला अट्टहास. हल्ली आपण brand contious झालो आहोत. branded shirts, branded jeans, branded shoes, branded watch, branded sack, branded goggles. सर्वकाही branded. ह्या सर्व गोष्टी आपल्याला परफेक्ट बनवतात अस आपल्याला वाटत. ह्या सर्व गोष्टीं साठी आपण पाहिजे तेवढा पैसा खर्च करतो. (अर्थात ज्याच्या कडे आहेत तोच खर्च करू शकतो) पण प्रत्येकाला हे अस आयुष्य जगण खुप आवडत. 

अर्थात चांगल आयुष्य जगायला कोणाला नाही आवडत. पण ह्याच गोष्टी वापरल्याने मी परफेक्ट होणार आहे अस आपल्याला का वाटत??? हे एक प्रकाराच obsession आहे. मी म्हणेन, branded रहा, नाही तर राहू नका. पण जे काही कराल त्यात comfortable रहा. presentable रहा. स्वताला आवडत म्हणून करा, कोणा दुसर्यांसाठी करू नका. 


अशा अजुन खुप काही गोष्टी असतील, ज्या आपल्याला परफेक्ट हव्या आहेत. माझा बोलण्याचा मुददा एवढाच आहे की,  आयुष्य हे एन्जॉय करण्यासाठी आहे. त्याला perfection च्या चौकटीत अडकवू नका.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत