Wednesday, January 5, 2011

एक भयाण रात्र.....

काल रात्री १२ वाजता घराबाहेर पडलो. बाइक काढली आणि राउंड मारायला गेलो. थोडा पुढे गेलो तर लक्षात आल की पेट्रोल संपत आल होत. म्हंटल पेट्रोल पंप वर जावून पेट्रोल भरुया पण पेट्रोल पंप साधारण ३ किलोमीटर लांब होत. वाटल बाइक चालेल तो पर्यंत पण कसल काय अर्ध्या वाटेत बाइक बंद पडली. आता पेट्रोल पंप पर्यंत मला बाइक रेटत न्यावी लागणार होती. शिव्या घालत बाइक वरून उतरलो. आता पर्यंत मी स्वतःच्याच तंद्रित होतो. बाइक वरून उतरल्यावर माझ्या लक्षात आल की त्या रस्त्यावर कोणी चिटपाखरू ही नव्हत. माझा नेहमीचा पाया खालचा रस्ता पण आज काही तरी वेगळ वाटत होत.

पेट्रोल पंप कडे जायला २ रस्ते होते. मी शोर्टकट निवडला कारण मला बाइक घेवुन जायच होत. आजुबाजुला कोणी दिसतय का ते पाहत होतो. कोणाची मदत भेटली असती तर बर झाल असत. पण कोणीच नाही त्या रस्त्यावर. मला स्वतःचाच राग येत होता. घरून निघताना का नाही मी चेक केल की बाइक मध्ये किती पेट्रोल आहे ते??? रस्ता पाया खालचाच होता म्हणून मला माहीत होत की मी १० मिनिटात पेट्रोल पंप वर पोहचेन. घरी येयला उशीर होईल हे सांगण्यासाठी मी मोबाईलच्या खिशात हात टाकला. बघतो तर काय मी मोबाईल घरीच विसरलो होतो. आता घरी गेल्यावर माझ काही खर नव्हत. अगोदरच रात्रीचा पाऊण वाजला होता. घरी जायला उशीर नको व्हायला म्हणून मी जलद गतीने चालण्यास सुरवात केली. पण बाइक घेवुन एवढ्या जलद गतीने चालण मला जमत नव्हत. कसाबसा मी बाइक रेटत होतो.

थोड्या वेळाने मला पाठून कोणी तरी चालत येत असल्याची चाहुल लागली. मी पाठी पाहिल तर माझ्यापासून १० फुट अंतरावर  एक बाई माझ्या दिशेने चालत येत होती. मी त्या रस्त्यावर एकटाच नाही आहे हे पाहून मला बर वाटल. पण क्षणार्धात ह्रुदयात भीतीने एकदम धस्स झाल. कोण आहे ही बाई??? एवढ्या रात्री ती काय करत आहे इथे??? असंख्य प्रश्नांनी डोक्यात काहूर माजवल. आता पाठी वलून पाहण्याचही धाडस होत नव्हत. तिरक्या डोळयाने मी तिचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होतो. आता आजुबाजुची भयाण शांतता माझ्यावर हावी झाली होती. मला काही झाल तरी लवकरात लवकर पेट्रोल पंप वर पोहचायच होत. थंडीतही मला दरदरून घाम फुटला होता. हा रस्ता संपत का नाही आहे म्हणून मी घड्याळा कडे पाहिल आणि जागच्या जागीच स्तब्ध झालो. घड्याळात रात्रीचा १.३० वाजला होता, म्हणजे गेला पाऊण तास मी ह्याच रस्त्यावर चालत होतो. सगळ गणित चुकत होत. अस का होत आहे हे समजायला ही काही मार्ग नव्हता. खर तर मी १० मिनिटात पेट्रोल पंप वर पोहचायला  पाहिजे होतो. काही तरी भयानक होणार आहे याची मला चाहुल लागली होती.

एक तर रात्रीचा १.३० वाजला होता. थंडी आता जाणवायला लागली होती. त्या रस्त्यावर एक वेगळीच शांतता पसरली होती. रस्त्यावर जरी अंधुक प्रकाश असला तरी आजुबाजुला भयाण अंधार होता. मी पूर्णपणे घाबरलो होतो. माझ्या चेहर्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. पुढच्या क्षणाला काय होइल याचा बिलकुल अंदाज नव्हता. तेवढ्यात मला वाटल की माझ्या पाठून कोणीतरी धावत येत आहे. मी पाहतो तर काय??? जी थोड्या वेळापूर्वी पाहिली होती तीच बाई. ती अचानकपणे अशी धावत येताना पाहून माझी बोबडिच वळली. एक तर तिचा पांढरा फट चेहरा, बुबूळ नसलेले डोळे, मोकळे सोडलेले केस पहातच मी बाइक तशीच तिथे टाकली आणि धावत सुटलो. साधारण मी १० मिनिटे धावत होतो तरीही ती माझा पाठलाग सोडायला तयार  नव्हती. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आल की पाठी कोणी नाही आहे. मी एकटाच पळत आहे.

पाठी कोणीही नाही आहे हे पाहून जिवात जीव आला. मगाशी जे झाल तो माझा भास होता का ते खर होत??? खरच कोणी बाई माझा पाठलाग करत होती??? आणि हे जर खर असेल तर आता ती कुठे आहे??? भीतीने मी पूर्णपणे रडकुंडीला आलो होतो. आता मला काही झाल तरी घरी जायच होत. घरचे आतापर्यंत मला शोधायला बाहेर निघाले असतील याची मला कल्पना होती. आता मी स्वतःला थोड सावरल. मगाशी जिथे मी बाइक टाकली होती त्या जागेवर आलो. बाइक उचलून रस्त्याच्या कडेला लावली. आता मी बाइक तिथेच ठेवणार होतो आणि ज्या दिशेने आलो त्याच दिशेने धावत सुटणार होतो. घड्याळात पाहिल तर रात्रीचे २ वाजले होते.

पण निघताना माझ्या हे लक्षात नाही आल की, जिथे मी बाइक उभी केली होती, तिथे त्याच बाइक वरती ती बाई बसली होती. मी माझ्या घराच्या दिशेने धावायला सुरवात केली. थोड्या वेळातच मला कळल की ती बाई परत माझ्या पाठी धावत येत आहे.  हे पाहून मला वाटल की ती आता मला सोडणार नाही. मी माझ्या आयुष्याच्या काही शेवटच्या घटका मोजत आहे. मला जीवंत  राहायच होत म्हणून मी माझ्यातली सर्व शक्ति एकवटली आणी वेड्यासारखा पळत सुटलो. साधारण १ तास मी पळत होतो.

आता मला माझ घर दिसायला लागल होत. माझ्या जिवात जीव आला. शेवटच ३० फुटांच अंतर मला कसही करून पार करायच होत. ती काही केल्या माझा पाठलाग सोडायला तयार नव्हती. मी परत जिवाच्या आकांताने धावलो. मी घरात पाऊल टाकणार तेवढ्यात तिने मला धरल आणी फरफटत घेवुन जाऊ लागली. मी हतबलपणे तिच्या विद्रूप चेहर्याकडे पाहत होतो. तिच्या चेहर्यावरचा तो आनंद मला मारण्याचा काही औरच होता. मी मला वाचवण्याचे सगळे प्रयास थांबवले.

मरणाला सामोर जाताना प्रत्येकाला भीती वाटते. तशी मलाही वाटत होती. पण तिचा चेहरा जेवढा भयानक होता, तेवढ भयानक मरण असेल अस मला वाटल नाही. ती मला जिन्यांवरून फरफटत गच्चीवर घेवुन जात होती. शेवटच कोणालातरी हाक मारावी मदतीसाठी अस वाटत होत पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते. माझी तडफड पाहून तिच्या चेहर्यावर एक वेगळच स्मित हास्य उमटल होत. तिने मला गच्चीच्या कठड्यावर उभ केल. त्या वेळेस माझ्या डोळयात कुठली भीती नव्हती. चेहर्यावर कुठले भाव नव्हते. हे पाहून तिला माझा जास्त राग आला आणी तिने मला खाली ढकलून दिले.

खाली पडताना अचानक माझे डोळे उघडले आणी मी झोपेतून जागा झालो. हे एक स्वप्न होत हे जेंव्हा मला कळल, तेंव्हा माझा जीव भांड्यात पडला. घड्याळात पाहिल तर पहाटेचे ५ वाजले होते. पहाटे पडलेली स्वप्न तशी खरी होतात की. :) दुसऱ्या दिवशी सकाळी थोड काम होत म्हणून घराबाहेर पडलो. काल रात्री ज्या रस्त्यावर धावत होतो, त्या रस्त्यावर गेलो. बघतो तर काय??? काल ज्या ठिकाणी मी माझी बाइक पार्क केली होती, ती आज त्याच ठिकाणी उभी होती.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

4 comments:

  1. wah wah...ata mulinchi swapne sodun...paandhrya chehryachya bai chi yeyayla lagli...chan...hehehe..nice horror dream..

    ReplyDelete
  2. Mast Mast Mast..khupach chhan aahe...............

    ReplyDelete