Monday, January 3, 2011

ती मला कधी भेटेल का?????

नविन वर्ष सुरु झाल. गेले दोन तीन दिवस फुल ऑन एन्जॉय चालू आहे. कधी पार्टी तर कधी मूव्ही. तेंव्हा लिहिण्यास काही वेळ भेटला नाही. पुण्याहून पाहुणेही आले होते घरी. आणि पुणे म्हंटल की खुप साऱ्या आठवणी डोळयासमोर येतात. त्यातलीच एक हृदयाच्या खुप जवळ असलेली आठवण.

ऑरकुट वरची माझी एक मैत्रिण पुण्याला रहायला होती दोन तीन वर्षापूर्वी. बघायला गेल तर आम्ही एकमेकांसाठी तसे अनोळखीच. मी मुंबईचा, ती पुण्याची. पण कालांतराने आमची मैत्री वाढत गेली. काही चांगल होयच असेल तर होतच की हो. स्क्रैप थ्रू आम्ही बोलायचो. पण एक वेगळीच मजा होती. वन वे ट्राफिक नव्हत. :) मला जेवढ आवडायच तिच्याशी बोलायला, तेवढच तिला ही आवडायच. मी जेवढा इंटरेस्ट घेयाचो तिच्याशी बोलण्यात तेवढाच ती ही घेयची. कुठे ना कुठे आम्ही जवळ येत होतो. तशी ती खरी गुजरात (अहमदाबादची), पण पुण्याला ती शिकत होती. एक वेगळीच ओढ़ मला तिच्याबद्दल वाटू लागली होती. कधी कधी मैत्री आणि प्रेम ह्यातली रेषा अधिकच पुसट होत जाते.

एक दिवशी मी ऑरकुट लोगिन केल तिचा स्क्रैप आला आहे का हे पाहण्यासाठी. पण त्यादिवशी तिचा एकही स्क्रैप नव्हता. मी माझी फ्रेंड लिस्ट चेक केली तर ती फ्रेंड लिस्ट मध्येही नव्हती. तिने तीच ऑरकुट अकाउंट डिलीट केल होत. काय माझी स्थिति झाली असेल त्यावेळेस हे तुम्ही समजू शकता. पण मला खरा राग आला होता तो एका गोष्टीचा की तिने मला सांगितल नाही अकाउंट डिलीट करताना. मी मनाला समजावल की, तिला गरज नाही माझी तर मलाही नाही गरज तिची.

नंतर मी माझ्या लाइफ मध्ये बिझी होवून गेलो. कधी कधी विचार येयचा की का केल तिने अस??? पण उत्तर सापडायच नाही. ती आयुष्यातून निघून गेली होती पण आठवणीतून जायला काही तयार नव्हती. मला काही झाल तरी ती अशी का निघून गेली याच उत्तर हव होत. मला होणारा त्रास एखाद वेळेस देवालाही कळला असेल. दहा पंधरा दिवसां नंतर मी एकदा माझे इ-मेल चेक करत होतो. तेव्हा मी तिचा मेल पहिला. दहा पंधरा दिवसां अगोदराचा तो मेल होता. म्हणजे ज्या दिवशी तिने तीच अकाउंट डिलीट केल होत, त्याच दिवशी तिने मला मेल केला होता, हे सांगण्यासाठी की ती हे अकाउंट का डिलीट करत आहे. हे पाहिल्यावर मला स्वतःचाच खुप राग आला होता. मी का नाही माझे इ-मेल चेक केले अगोदर. का एवढा वेळ लावला तिच्या इ-मेल ला रिप्लाय देयला??? ती ही माझ्या रिप्लायची वाट पाहत बसली असेल ना. ती पोस्ट ग्रेजुएशनसाठी ohio, USA ला जाणार होती. ohio university मध्ये तीच एडमिशन झाल होत. तिथे ऑरकुट चालत नाही म्हणून तिने तीच अकाउंट डिलीट केल होत.

ह्या गोष्टीला ३-४ वर्ष उलटून गेली असतील. ते ऑरकुट अकाउंट, तो इ-मेल अकाउंट कालांतराने मी डिलीट करून टाकला. आज माझ्याकडे तिच्याशी संपर्क साधण्याच एक ही साधन नाही. तिने मला कधी शोधण्याचा प्रयत्न केला असेल की नाही हे मला माहीत नाही. आज मला हे ही माहीत नाही की ती कुठे आहे??? हे ही माहीत नाही की ती हा ब्लॉग कधी वाचेल की नाही??? ती मला कधी भेटेल की नाही??? पण आठवणी मध्ये ती कुठेनाकुठे नेहमीच असेल.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

No comments:

Post a Comment