Monday, January 10, 2011

कॉलेज आठवणी - भाग १

सकाळचे ६ वाजले होते. खडबडून जागा झालो. कॉलेजच पहिल लेक्चर अटेंड करायच होत. कसाबसा धावत पळत कॉलेजला आलो. ऐन जुलाईचा महिना होता. पाउस मूसळधार कोसळत होता. लेक्चरला बसलो पण १० मिनिटे उशीर झालाच होता. लेक्चर संपले आणी रिसेसला कैंटीन मध्ये आलो. खुप भूक लागली होती. पाहिल तर माझ्या ग्रुपने अगोदरच जागा पकडून ठेवली होती. माझा ग्रुप तसा ५ जणांचा. अभिजीत a.k.a. अभी (म्हणजे मी), योगराज a.k.a. योगी, विराज a.k.a. विरजा, सायली a.k.a. सई आणी ग्रीथा. (हिला काही टोपण नाव नव्हत.) कैंटीन मध्ये फुल ऑन धमाल चालू होती. आम्ही ५ जण असलो म्हणजे विचारू नका, फुल ऑन टाइमपास. कॉलेज सुटल्यावर भेटायच ठरल आणी मी रिसेस नंतरच्या लेक्चरला निघून गेलो.

१२ वाजता मी कॉलेज कैम्पस मध्ये आलो. हे सर्वजण होतेच. येणार्या फ्रेंडशिप डे ला आम्ही कॉलेज सुटल्यानंतर वाटर रेसोर्ट ला जाण्याचा प्लान बनवला. मी तसा सहसा प्लान मध्ये शामिल होत नसे कारण कॉलेज सुटल्यानंतर मी पार्ट टाइम नोकरी करत असे. पण मी सुट्टी घेण्याच ठरवल. १ वाजत आला तसा मी सर्वांचा निरोप घेतला आणी निघालो. गेट मधून बाहेर जाताना एक मुलगी मला पास ऑन झाली, मी मागे वलून पाहिल आणी तिनेही. जस्ट आम्ही एकमेकांना पाहिल आणि निघून गेलो.

दुसऱ्या दिवशी असच कैंटीन मध्ये टाईमपास करत बसलो होतो. थोड्या वेळाने काल जिला पाहिल होत, ती तिच्या ग्रुप सोबत कैंटीन मध्ये आली. आमच्या बाजुच्या टेबल वरती त्यांची फुल ऑन मजा मस्ती चालू होती. मी विरजा ला म्हंटल काय भारी दिसत आहे यार ती.....अगोदर कधी हिला पाहिल नाही रे??? कुठे होती ही??? आम्ही दोघे त्या ग्रुप मधल्या मुलींना बघत आहोत हे सई आणि ग्रीथा च्या लक्षात आल. ग्रीथा ने विरजा ला एक चापटी मारली. पण विरजा कसला ऐकतो तिला, त्याच मुलींना टापण चालूच होत. सई ने एक कटाक्ष टाकुन त्या मुलीकडे आणि नंतर माझ्याकडे पाहिल. तस मी स्वतःला आवरत घेतल आणि विरजा ला बोललो खुप झाल आता, नाही तर इथे कोणाचा तरी खून होइल. ह्या जोक वरती ग्रुप मधल वातावरण थोड हलक झाल. पण मला आणि योगी ला हे कळल नाही की ग्रीथाने विरजा ला चापटी का मारली???

त्या दिवसापासून विरजाला गप्प करण्यासाठी आम्हाला ग्रीथा हे नाव पुरेस होत. एकदिवस शनिवारी मी कॉलेज लायब्ररी मध्ये आलो होतो, एका प्रोजेक्ट संबधी मला काही नोट्स हव्या होत्या. नोट्स काढत होतो, तेवढ्यात कैंटीन मध्ये मी जिच्याकडे पाहत होतो ती माझ्या समोर येवून उभी राहिली. मी २ क्षण तिच्याकडे पाहताच राहिलो. दिसायला सुंदर. बोलके डोळे. डोळ्यावरचे आयब्रोज नीट कोरलेले. ओठावरची फेंट रंगाची लिपस्टिक. पंजाबी ड्रेस घातला होता तिने. पांढरया रंगाचा एम्ब्रॉयडरीवाला स्लीवलेस टॉप, बेबी पिंक रंगाचा पायजमा आणि त्याच रंगाची ओढणी. केस हलकेसे ब्राउन रंगाचे व्यवस्थित सेट केलेले. कानात सिल्वर रंगाचे झुमके. एका हातात पुस्तके, बघतो तर काय नेलपेंट पण बेबी पिंक रंगाची. हातातल घड्याळ पांढरया रंगाच. हातातल्या बांगड्या सुद्धा सिल्वर रंगाच्या आणि पायातली सेंडल सुद्धा त्याच रंगाची. स्वतःला कसबस सावरल आणि प्रश्नार्थक चेहर्याने तिच्याकडे पाहिल. तिने स्माइल केल आणि मी इथे बसु का अस विचारल. मी म्हंटल, ठीक आहे.

थोड्या वेळाने आम्ही कम्फर्टेबल झालो आणि बोलण सुरु झाल. तिने सांगण्यास सुरवात केली की तिने कधी एडमिशन घेतली, कुठल्या इयर ला आहे, कॉलेज व्यतिरिक्त काय करते. खुप बोलत होती राव ती. मी माझ नोट्स काढण बाजूला ठेवल आणि फ़क्त तीच ऐकत बसलो. खरतर ती काय बोलत आहे त्याकडे माझ लक्षच नव्ह्त. पण मधून मधून मी तीच ऐकत आहे हे दाखवण्यासाठी उगाचच समजल्याचे हावभाव तिला दाखवत होतो. अर्धा पाऊण तास बडबड करून झाल्यावर तिला कळल की आपण जास्तच बोलत आहोत. मग तिने मला बोलायला संधी दिली. मी विचार करत बसलो की कसली मुलगी आहे ही राव. थोड्या वेळाने तिच्या लेक्चरची वेळ झाली आणि ती निघाली. मी तिला लायब्ररी बाहेर सोडण्यास गेलो. जाताना तिने मला एक प्रश्न विचारला की, त्या दिवशी तू कैंटीन मध्ये माझ्याकडे का बघत होतास??? उत्तर ऐकण्यासाठी ती थांबली नाही, स्माइल करून निघून गेली. मी पुन्हा एकदा स्वतःला सावरल आणि नोट्स काढण्यासाठी लायब्ररी मध्ये आलो.

आयुष्यात एक नवा मोड़ आला होता. मी विरजा ला आणि योगी ला कॉल केला, संध्याकाळी आम्ही तिघे ८ च्या सुमारास आमच्या नाक्यावर आलो.

क्रमशः (उरवरित भाग पुढच्या पोस्ट मध्ये.)

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 

3 comments:

  1. kiti vel baghat hotas tya mulikade???????????? so much description... :)

    ReplyDelete
  2. ohhhh my my...what acute observation skill u have...r u a psychology student or science student by any chance? Please dont write such incomplete posts n create curiosity in readers yaar...u should write complete post...waiting for u r next post...

    ReplyDelete
  3. thnxs swapna.....
    I am not a psychology student or a science student...

    ReplyDelete