Monday, October 3, 2011

ccd मधली संध्याकाळ

हा आठवडा एवढा हेक्टिक होता, काय सांगू तुम्हाला??? फोन घेयची सुद्धा फुरसत नव्हती. तिच्या १० कॉल पाठी एका कॉल ला उत्तर देत होतो. त्यामुळे बाईसाहेब थोड्या रागावल्या होत्या. रविवार च ccd च प्रोमिस मी तिला केल होत म्हणून ती शांत होती. 



रविवारी संध्याकाळी ४ वाजता मी तिला बस स्टॉप वर पिक केल आणि आम्ही निघालो. आभाळ दाटून आल होत कुठल्याही क्षणी पावसाला सुरवात होणार होती. पाउस सुरु होण्याच्या आत माला ccd गाठायच होत म्हणून बाइक मी अजुन जोरात दामटवली. पण काही उपयोग झाला नाही आणि पाउस सुरु झाला. आडोशाला बाइक घेयची म्हन्टली तर मैडम ऐकायला तयार नाहीत, त्यांना पावसात भिजत बाइक राईड ची मजा घेयची होती. काय बोलणार मी, तिला नाही बोलू शकलो नाही. लड़िकपणे तिने हट्ट पुरवून करून घेतले आहेत माझ्याकडून आणि मी ही सहसा तिला कधी नाही बोलत नाही. असो. 



भिजत भिजत आम्ही एकदाचे ccd ला पोहचलो. नेहमीची जागा पकडली आणि आर्डर दिली. स्काय ब्लू रंगाच्या पंजाबी ड्रेस मध्ये खुप सुंदर दिसत होती राव. तिच्यावरून नजर हटवण कठीण होत. ccd मधला अंधुक प्रकाशातला अम्बियंस, बाहेर पडणारा रिमझिम पाउस, वाऱ्यासंग झुलणारी झाड, समुद्रात वाऱ्यावर डोलणार जहाज. सर्वच कस सुंदर, आल्हादायक, ह्रदय स्पंदवणार.



थोड्या वेळाने तिच्या सोबत चौपाटी वर आलो. मावळतिच्या सुर्याला पाहत काही वेळ एकत्र घालवला आणि निघालो. ती रविवारची ccd मधली संध्याकाळ आज ही मनात घर करून आहे.            

2 comments:

  1. हे क्षण असेच जपून ठेवा...

    सुंदर झाली आहे पोस्ट...

    ReplyDelete