Friday, September 7, 2012

Hope.....

दिवसा उजेडीच आभाळ भरून आल
मनात विचारांच माजलेल काहूर थोड शांत झाल

क्षणार्धात पावसाला सुरवात झाली 
आणि ह्या  दुनियादारीत तिला आपलस करण्याचा विचार
जगण्याला नविन बळ देवून गेल.....

अभिजीत 

Friday, June 22, 2012

Quote!

Usually Beauty and Brain don't work together.....but if they do.....they stand out different from others!!!!!

अभिजीत

Thursday, May 24, 2012

CLICK!!!!!

काही दिवसां पूर्वी कोरमला गेलो होतो. नेहमी सारखच KFC चा प्लान होता. दोन मित्र येणार होते.
वेळ होता, मी तिसर्या मजल्यावर उभा होतो टाइमपास करत. तळमजल्यावर मर्सिडीज गाडीच एक्सझिबिशन होत. तिथे एक ग्रुप आला होता. 3 जणाचा, 2 मुले आणि 1 मुलगी. त्या मुलीने तिथे
मर्सिडीज सोबत एक फोटो काढला. तेंव्हा सहजच एक विचार मनात येउन गेला की त्या क्षणाला त्या मुलीला का फोटो काढावासा वाटला.

ती मर्सिडीज परत तिला कधी आयुष्यात बघायला मिळणार नव्हती. पण अस असत तर तिने फ़क्त गाडीचा फोटो काढला असता. कारण  एवढच होत की त्यावेळेस तिला त्या सुंदर क्षणाचा भागीदार बनायच होत. कारण तो क्षण परत येइल, नाही येइल, सांगता येत नाही.



माणसाच हे असच असत, त्याला प्रत्येक सुंदर क्षणांचा भागीदार व्हायच असत, पण ते नेहमीच पॉसिबल नाही. त्यांना आपण फ़क्त क्लिक करू शकतो कारण क्षण हे क्षणिकच असतात.


CCD मध्ये तिच्या सोबत घालवलेली संध्याकाळ !
पिकनिकला तिच्यासाठी गिटारवर गायलेले गाणे 
दुनियादारी पासून अलिप्त असलेले तिच्या ओठांवरचे हसु !
मित्रांसोबत केलेली पार्टी !
छोट्या बाळाच निरागस हसण !



असेच बरेच न मोजता येणारे क्षण. काळानरूप आठवणी पुसट होत जातात. धुंदल्या होत चाललेल्या पाउलवाटा परत नव्याने जगाव्याशा वाटतात.

तेंव्हा आपण हे क्लिक केलेले क्षण नजरे समोरून सरकवत एक आयुष्य जगतो.

आयुष्य खुप सुंदर आहे मित्रांनो. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. 

जस्ट स्माइल & क्लिक :)

चला मित्रांनो, निरोप घेतो परत भेटूच.

अभिजीत 

Friday, March 23, 2012

तिची नजर आजही नाही विसरता येणार.....

काही आठवड्यापूर्वी मित्रांसोबत कोरम मॉलला बसलो होतो. कारण अस काही विशेष नाही. जेंव्हा जेंव्हा KFC ची आठवण येते, तेंव्हा तेंव्हा आपसुक पावले कोरम कड़े वळतात. त्या दिवशी मी आणि माझे ३ मित्र विजय, वैभव आणि योगेश ७.३० - ८ च्या सुमारास कोरमला आलो. वाटल होत तूफ़ान गर्दी असेल पण त्या मानाने गर्दी कमी होती. गेल्या गेल्याच आर्डर दिली, १. १ लार्ज चिकन झींग बर्गर २. २ चिकन स्नेकर ३. १ लार्ज चिकेन पोपकोर्न ४. १ केफेचिनो ५. २ फ्रेंच फ्राईज ६. १ अर्धा लिटर कोक, अर्थात दुसर्या आउटलेट मधून, कारण पैसे कमी पडले म्हणून :) विजयने आधीच जागा पकडली होती, वैभवच्या हातात ह्या सर्व गोष्टीनी भरलेला ट्रे दिला आणि वाट काढत आम्ही तय जागेवर आलो.


कोरमला येण्या अगोदर विजय आणि वैभवने माझ्या एरिया मध्ये हल्लीच्या काळात फेमस झालेल्या शेगाव कचोरी सेंटर मध्ये, कचोरी आणि एका टपरीवर कटिंग मारून झाला होता. अस असल तरी KFC चे सर्व आयटम आम्ही फस्त केले. असो. खुप झाली प्रस्तावना :)


शनिवार होता, ठाण्यातल्या सर्व सुंदर मुली शनिवार आणि रविवारी तुम्हाला कोरम मध्ये दिसतील. कोरमला जायच एक कारण हे ही असत. :) आम्ही KFC च्या कागदात व्रेप केलेले आयटम ओपन केले आणि खायला सुरवात केली. तेवढ्यात विजय बोलला, आपल्या बाजुच्या टेबल वरची मुलगी बघ, तस मी तिला आधीच पहिल होत. म्हणून टेबल पाशी येताना, ती माझ्या दृष्टीक्षेपात यावी अशीच खुर्ची पकडली :) एवढी सुंदर होती ती दिसायला राव, काय बोलू. एका ग्रुप सोबत आली होती.


तिने ग्रीन टी-शर्ट आणि जीन्सचा स्कर्ट घातला होता. हल्लीच्या काळातल्या डिजायनर सेंडल घातल्या होत्या. दिसायला सुंदर आणि तेवढीच एक्सप्रेसिव. नजर अशी की कोणी पण फ़िदा होवून जाइल. एका हातात डिजायनर बेंगल आणि दुसर्या मधे डिजायनर व्रिस्टवाच. उभा चेहरा, ब्राउन डोळे, तरतरित नाक, ओठांवर हलक्या रंगाची लिपस्टिक, केस स्ट्रेटनिंग केलेले का, आधी पासून तसेच होते, ते काही माहित नाही. असा काहीसा तिचा गेटअप होता. :)

ग्रुप सोबत बसली होती पण बोलण्यापेक्षा, ऐकण्याच काम जास्त करत होती. ग्रुप मधे हा हा ही हू चालल होत पण तिच्या ओठांवर फ़क्त स्माइल असायच, जणू काही ती दाखवण्याचा प्रयत्न करत होती की मी ही तुमच्याच ग्रुपचा एक भाग आहे.

मला खुप भूक लागली होती. माझ अर्ध लक्ष खाण्यात आणि अर्ध तिच्याकडे होत. तिचही तसच, अर्ध ग्रुप सोबत  बोलण्यात आणि अर्ध माझ्याकडे. मी काही मोठा स्टड नाही की तिने माझ्याकडे बघाव पण त्याक्षणी ती बघत होती. तिची नजर आजही नाही विसरता येणार. अर्धा पाऊण तास ती तिथे होती. तो वेळ कसा निघून गेला हे कळल नाही.


माझ तर अस म्हणन आहे की, एखाद्या मुलीसोबत कुठे बसला असाल तर फालतुची बडबड करत तिला बोर करू नका. तिला बोलून द्या. तीच बोलण ऐकत रहा, तिला पाहत रहा. :) तिला एंटरटेन करण्यापेक्षा तो क्षण तिच्यासोबत जगा.


चला, निरोप घेतो. परत भेटूच. 


अभिजीत  

Thursday, March 8, 2012

बसटॉपवरची एक छोटीशी ओळख.....

माझा नेहमीचा प्रवास बसने असतो. बस आणि बसची वेळ ठरलेली असेल तर काही चेहरे तुमच्या ओळखिचे होतात. भले तुम्ही एकमेकांशी बोलत नाहीत पण ओळख असते. अशीच एक ओळख.

साधारण ४ - ५ महिन्यांपासून माझ बस पकड़ण्याच ठिकाण ठरलेल आहे. एक दिवशी मी बस स्टॉप वर आलो. माझी नेहमीची बस येयला वेळ होता. सहज इकडे तिकडे बघत असताना. एका मुलीने माझ लक्ष वेधून घेतल. पुढे कित्येक महीने आम्ही दोघांनी एकाच बसने प्रवास केला. अर्थात ती पुढे लेडिज सीटवर बसायची आणि मी एकदम शेवटच्या सीटवर बसायचो. पण आम्ही एकाच बसने प्रवास केला आहे एवढ मात्र खर :) असो, मजा, मस्ती खुप झाली. मी मेन मुद्दयावर येतो.



तीच वर्णन करायच तर. आज पर्यंत मी तिला नेहमी पंजाबी ड्रेस मध्येच पहिल आहे, कधीतरी वीकेंडला कैजुअल्स मध्ये. पण पंजाबी ड्रेस मध्ये लय भारी दिसते राव. पहिल्यांदा जेंव्हा पाहील होत, तेंव्हा बसची वाट बघत उभी होती. आकाशी रंगाचा स्लीवलेस टॉप, सफ़ेद रंगाचा पायजमा आणि त्याच रंगाची ओढणी. केस मोकळे सोडलेले. हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक. करंगळीमध्ये कुठल्यातरी खड्याची अंगठी. डाव्या मनगटावर सफ़ेद रंगाच घड्याळ. रंग गोरा, डोळे एकदम पाणीदार. ओहो, किती सांगू तुम्हाला. असो, स्वभावाने एकदम शांत असावी कारण हसताना कधी पाहील नाही तिला. एकदातरी तिच्या ओठावर हसू बघायच आहे मला.

तशी आमची नजरभेट तर रोजचीच. मी तिच्याकडे बघतो, ती माझ्याकडे. बहुतेक नजरेतून मनातली भावना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न. उमजतय सर्वकाही पण तिच्याकडे जावून हे बोलण्याची हिम्मत होइल तर शपथ :) असो.

ना तुला बोलवे, ना मला बोलवे
नयन हे बोलती एकमेकांसवे  

हल्ली माझी बसची वेळ बदलली आहे. तेंव्हा आमची भेट (नजरभेट) होत नाही आता :) कधीकधी आम्ही एकमेकांसमोर येतो. एकमेकांकडे पाहतो, तेंव्हा अस वाटत की, ती जणू काही नजरेतुनच सांगत आहे की, "कुठे होता एवढे दिवस, दिसला नाहीस".

ही होती, एका बसटॉपवरची एक छोटीशी ओळख.

वरील चित्र गूगल वरून साभार.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 

Monday, February 6, 2012

ती इथेच आहे कुठेतरी जवळपास.....

रोज वाटत मला
ती इथेच आहे कुठेतरी जवळपास
शोधत राहतो तिला वेड्यासारखा
धूसर होत चाललेल्या आठवणींसोबत 

हा खेळ रोजचाच तसा
नेहमी लपायच तिने, राज्य फ़क्त माझ्यावर
मला ही येतो कंटाळा कधी कधी 
नेहमीच्या तिच्या ह्या हट्टावर 

पण खर सांगायच तर 
सवय झाली आता रोजची
कितीही मनाला समजवल
तरीही वाटत ती इथेच आहे कुठेतरी.

अभिजीत 

Sunday, January 15, 2012

Quote!!!!!

माझ्या नजरेतल तिच्याबद्दलच प्रेम जर ती नाही समजू शकली तर ह्रुदयातल्या भावना व्यक्त केल्या काय किंव्हा नाही केल्या काय.....काय फरक पडतो?????

अभिजीत

Monday, January 9, 2012

ती दूर असल्याची जाणिव सुद्धा.....

रोज तिचा चेहरा नजरेसमोर
जसा ओळखीचा तसा अनोळखी सुद्धा
वाटत सर्व उमजतही तिला
पण दुसर्याच क्षणी ती दूर असल्याची जाणिव सुद्धा.

माझ लक्ष नसताना माझ्याकडे चोरून बघण
मी पाहताच क्षणी दुसरीकडे बघण
नजरेतून नजरेला उमजतय सर्वकाही
पण दुसर्याच क्षणी ती दूर असल्याची जाणिव सुद्धा.

आजतरी वाटत ती येइल सर्व दुनियादारी सोडून
पण दुसर्याच क्षणी ती दूर असल्याची जाणिव सुद्धा.

अभिजीत