काही आठवड्यापूर्वी मित्रांसोबत कोरम मॉलला बसलो होतो. कारण अस काही विशेष नाही. जेंव्हा जेंव्हा KFC ची आठवण येते, तेंव्हा तेंव्हा आपसुक पावले कोरम कड़े वळतात. त्या दिवशी मी आणि माझे ३ मित्र विजय, वैभव आणि योगेश ७.३० - ८ च्या सुमारास कोरमला आलो. वाटल होत तूफ़ान गर्दी असेल पण त्या मानाने गर्दी कमी होती. गेल्या गेल्याच आर्डर दिली, १. १ लार्ज चिकन झींग बर्गर २. २ चिकन स्नेकर ३. १ लार्ज चिकेन पोपकोर्न ४. १ केफेचिनो ५. २ फ्रेंच फ्राईज ६. १ अर्धा लिटर कोक, अर्थात दुसर्या आउटलेट मधून, कारण पैसे कमी पडले म्हणून :) विजयने आधीच जागा पकडली होती, वैभवच्या हातात ह्या सर्व गोष्टीनी भरलेला ट्रे दिला आणि वाट काढत आम्ही तय जागेवर आलो.
कोरमला येण्या अगोदर विजय आणि वैभवने माझ्या एरिया मध्ये हल्लीच्या काळात फेमस झालेल्या शेगाव कचोरी सेंटर मध्ये, कचोरी आणि एका टपरीवर कटिंग मारून झाला होता. अस असल तरी KFC चे सर्व आयटम आम्ही फस्त केले. असो. खुप झाली प्रस्तावना :)
शनिवार होता, ठाण्यातल्या सर्व सुंदर मुली शनिवार आणि रविवारी तुम्हाला कोरम मध्ये दिसतील. कोरमला जायच एक कारण हे ही असत. :) आम्ही KFC च्या कागदात व्रेप केलेले आयटम ओपन केले आणि खायला सुरवात केली. तेवढ्यात विजय बोलला, आपल्या बाजुच्या टेबल वरची मुलगी बघ, तस मी तिला आधीच पहिल होत. म्हणून टेबल पाशी येताना, ती माझ्या दृष्टीक्षेपात यावी अशीच खुर्ची पकडली :) एवढी सुंदर होती ती दिसायला राव, काय बोलू. एका ग्रुप सोबत आली होती.
तिने ग्रीन टी-शर्ट आणि जीन्सचा स्कर्ट घातला होता. हल्लीच्या काळातल्या डिजायनर सेंडल घातल्या होत्या. दिसायला सुंदर आणि तेवढीच एक्सप्रेसिव. नजर अशी की कोणी पण फ़िदा होवून जाइल. एका हातात डिजायनर बेंगल आणि दुसर्या मधे डिजायनर व्रिस्टवाच. उभा चेहरा, ब्राउन डोळे, तरतरित नाक, ओठांवर हलक्या रंगाची लिपस्टिक, केस स्ट्रेटनिंग केलेले का, आधी पासून तसेच होते, ते काही माहित नाही. असा काहीसा तिचा गेटअप होता. :)
ग्रुप सोबत बसली होती पण बोलण्यापेक्षा, ऐकण्याच काम जास्त करत होती. ग्रुप मधे हा हा ही हू चालल होत पण तिच्या ओठांवर फ़क्त स्माइल असायच, जणू काही ती दाखवण्याचा प्रयत्न करत होती की मी ही तुमच्याच ग्रुपचा एक भाग आहे.
मला खुप भूक लागली होती. माझ अर्ध लक्ष खाण्यात आणि अर्ध तिच्याकडे होत. तिचही तसच, अर्ध ग्रुप सोबत बोलण्यात आणि अर्ध माझ्याकडे. मी काही मोठा स्टड नाही की तिने माझ्याकडे बघाव पण त्याक्षणी ती बघत होती. तिची नजर आजही नाही विसरता येणार. अर्धा पाऊण तास ती तिथे होती. तो वेळ कसा निघून गेला हे कळल नाही.
माझ तर अस म्हणन आहे की, एखाद्या मुलीसोबत कुठे बसला असाल तर फालतुची बडबड करत तिला बोर करू नका. तिला बोलून द्या. तीच बोलण ऐकत रहा, तिला पाहत रहा. :) तिला एंटरटेन करण्यापेक्षा तो क्षण तिच्यासोबत जगा.
चला, निरोप घेतो. परत भेटूच.
अभिजीत

No comments:
Post a Comment