माझा नेहमीचा प्रवास बसने असतो. बस आणि बसची वेळ ठरलेली असेल तर काही चेहरे तुमच्या ओळखिचे होतात. भले तुम्ही एकमेकांशी बोलत नाहीत पण ओळख असते. अशीच एक ओळख.
साधारण ४ - ५ महिन्यांपासून माझ बस पकड़ण्याच ठिकाण ठरलेल आहे. एक दिवशी मी बस स्टॉप वर आलो. माझी नेहमीची बस येयला वेळ होता. सहज इकडे तिकडे बघत असताना. एका मुलीने माझ लक्ष वेधून घेतल. पुढे कित्येक महीने आम्ही दोघांनी एकाच बसने प्रवास केला. अर्थात ती पुढे लेडिज सीटवर बसायची आणि मी एकदम शेवटच्या सीटवर बसायचो. पण आम्ही एकाच बसने प्रवास केला आहे एवढ मात्र खर :) असो, मजा, मस्ती खुप झाली. मी मेन मुद्दयावर येतो.
तीच वर्णन करायच तर. आज पर्यंत मी तिला नेहमी पंजाबी ड्रेस मध्येच पहिल आहे, कधीतरी वीकेंडला कैजुअल्स मध्ये. पण पंजाबी ड्रेस मध्ये लय भारी दिसते राव. पहिल्यांदा जेंव्हा पाहील होत, तेंव्हा बसची वाट बघत उभी होती. आकाशी रंगाचा स्लीवलेस टॉप, सफ़ेद रंगाचा पायजमा आणि त्याच रंगाची ओढणी. केस मोकळे सोडलेले. हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक. करंगळीमध्ये कुठल्यातरी खड्याची अंगठी. डाव्या मनगटावर सफ़ेद रंगाच घड्याळ. रंग गोरा, डोळे एकदम पाणीदार. ओहो, किती सांगू तुम्हाला. असो, स्वभावाने एकदम शांत असावी कारण हसताना कधी पाहील नाही तिला. एकदातरी तिच्या ओठावर हसू बघायच आहे मला.
तशी आमची नजरभेट तर रोजचीच. मी तिच्याकडे बघतो, ती माझ्याकडे. बहुतेक नजरेतून मनातली भावना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न. उमजतय सर्वकाही पण तिच्याकडे जावून हे बोलण्याची हिम्मत होइल तर शपथ :) असो.
हल्ली माझी बसची वेळ बदलली आहे. तेंव्हा आमची भेट (नजरभेट) होत नाही आता :) कधीकधी आम्ही एकमेकांसमोर येतो. एकमेकांकडे पाहतो, तेंव्हा अस वाटत की, ती जणू काही नजरेतुनच सांगत आहे की, "कुठे होता एवढे दिवस, दिसला नाहीस".
साधारण ४ - ५ महिन्यांपासून माझ बस पकड़ण्याच ठिकाण ठरलेल आहे. एक दिवशी मी बस स्टॉप वर आलो. माझी नेहमीची बस येयला वेळ होता. सहज इकडे तिकडे बघत असताना. एका मुलीने माझ लक्ष वेधून घेतल. पुढे कित्येक महीने आम्ही दोघांनी एकाच बसने प्रवास केला. अर्थात ती पुढे लेडिज सीटवर बसायची आणि मी एकदम शेवटच्या सीटवर बसायचो. पण आम्ही एकाच बसने प्रवास केला आहे एवढ मात्र खर :) असो, मजा, मस्ती खुप झाली. मी मेन मुद्दयावर येतो.
ना तुला बोलवे, ना मला बोलवे
नयन हे बोलती एकमेकांसवे
हल्ली माझी बसची वेळ बदलली आहे. तेंव्हा आमची भेट (नजरभेट) होत नाही आता :) कधीकधी आम्ही एकमेकांसमोर येतो. एकमेकांकडे पाहतो, तेंव्हा अस वाटत की, ती जणू काही नजरेतुनच सांगत आहे की, "कुठे होता एवढे दिवस, दिसला नाहीस".
ही होती, एका बसटॉपवरची एक छोटीशी ओळख.
वरील चित्र गूगल वरून साभार.
चला, निरोप घेतो. परत भेटूच.
अभिजीत
No comments:
Post a Comment