Monday, December 5, 2011

आयुष्य.....

आपण नेहमी बोलत असतो की मला लाइफ एन्जॉय करायची आहे. मला हे करायच आहे ते करायच आहे पण नक्की काय करायच आहे??? तेच माहित नसत. थोडा जरी फावला वेळ मिळाला तरी काय करू आणि काय नको अस होवून जात कारण खर तर माहितच नसत काय करायच आहे ते.

आठवडाभर काम केल्यावर हक्काची एक सुट्टी मिळते. ती तर सार्थकी लागलीच पाहिजे. पण तिथेही वाट्याला disappointment च येते कारण नेहमीच आपली एंजोयमेंट कोणा ना कोणावर अवलंबून असते. दारू प्यायची आहे मित्र हवेत. मूव्ही ला जायच आहे मित्र मैत्रिणी हवेत. नाक्यावर बसून टाईमपास करायचा आहे मित्र मैत्रिणी हवेत. अर्थात एंजोयमेंटसाठी मित्र मैत्रिणी हवेच. आयुष्य ह्यांच्याविना बेरंग आहे.

पण मला वाटत की रोजच हे सर्व आपल्या सोबत नसणार. मग काय एन्जॉय करण सोडून देयच? एकटेपणा कवटाळत रडत बसायच??? रडत बसण रोज काही शक्य नाही. कधी तरी निघा एकटेच घराबाहेर. रोजची पायाखालची वाट पकड़ा, चालत रहा. सुरवातीला वाटेल काय करतोय मी एकटा??? प्रश्न पडूदेत उत्तर शोधायला जाऊ नका. थोड्यावेळाने प्रश्न सुद्धा उत्तर शोधायला जाणार नाहीत. फ्री होवून जगण ह्यालाच तर म्हणतात.

एंजोयमेंट पण मनापासून करत असल तर ठीक आहे हो. कारण आपल्याला सवय असते एंजोयमेंट पण मनाला मुरड घालत करण्याची. तशी आपल्या आयुष्यात रिस्ट्रिक्शन खुप असतात. सर्वात मोठ तर पैशाच रिस्ट्रिक्शन, वेळेच रिस्ट्रिक्शन, मनाच रिस्ट्रिक्शन, समाजाच रिस्ट्रिक्शन.....बाप रे बाप किती हे रिस्ट्रिक्शन.

शेवटी हे ही खर आहे की एंजोयमेंट बेलगाम नसावी, तिला पण काही तरी रिस्ट्रिक्शन असाव. पण किती हे ज्याच त्याने ठरवाव. आपण नोर्मल आयुष्य जगताना पण त्यात दुनियाभरचे रिस्ट्रिक्शन आणून ठेवतो आणि स्वतःच स्वताच्या दुनियादारित अड़कुन पडतो. एक आयुष्य जगतो पण तेहि दुनियादारी करत.

ज्या मुलीला मनापासून भेटावस वाटत, जिच्या सोबत काही क्षण घालवावेसे वाटतात. तिला भेटतानाही दुनियादारी. तिच्या सोबत अख्ख आयुष्य काढायच असत पण आपल्याला भेटायला येताना तिला तिची मैत्रिण सोबत लागते. दुनियादारी अजुन काय??? असो. कोणावर आपला काही जोर नाही.

हे एवढ सगळ बोलण्याचा अर्थ एवढाच की केवढी ही दुनियादारी. थांबवा ती. नाक्यावर बसून वायफळ गप्पा मारत असाल तर खुशाल मारा, एन्जॉय करा. प्रेयसी सोबत असाल तर तो क्षण तुमच्या आयुष्यातला तिच्या सोबतचा शेवटचा क्षण आहे अस समजुन फुल ऑन एन्जॉय करा. जे स्वप्न तुम्ही जिवापाड जपलेल आहे ते पूर्ण करण्यासाठी तहान, भूक, झोप विसरून काम करा. प्रत्येक क्षण मनापासून फुल ऑन जगण हेच आयुष्य आहे.

हे जे मी लिहिल आहे तस मलाही आयुष्य नाही जगता येत दुनियादारी सोडून. पण जेंव्हा मी विचार करतो आयुष्य कस असाव तेंव्हा मला वाटत ते असच असाव.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत