मी आणि ग्रीथा सई च्या घरी गेलो. पाहतो तर काय??? दाराला कुलुप नव्हत म्हणजे मैडम घरातच होत्या. एवढा राग आला होता, म्हंटल काय फलातुगिरी आहे??? एक कॉल नाही अटेंड करू शकत का ही मुलगी. मी कधी कोणावर एवढा रागवत नाही पण त्या वेळेस माझा कंट्रोल नाही राहिला स्वतः वर आणि मी सई वरती खुप रागावलो. मैडम ला काही रडू आवरल नाही आणि त्या सुरु झाल्या. रागाच्या भरात मी ग्रीथा ला बोललो की तू रहा हिच्या सोबत मी चाललो, मला उशीर होत आहे आधीच आणि मी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी काय होणार आहे याची मला काहीच कल्पना नव्हती.
नेहमी प्रमाणे आम्ही लेक्चर्स अटेंड करून कैंटीन मध्ये बसलो होतो. आज कोणीच काही बोलत नव्ह्त. सगळे एकदम गप्प. मला वाटल काय झाल???? मी विचारल सुद्धा. पण तरीही कोणीही काहीही सांगायला तयार नाही. मी सई ला विचारल, तर सई मैडम पण गप्प. तिला विचारल, काय झाल होत काल??? तरीही ह्या मैडम गप्प. ती शांतता माझ्या डोक्यात जात होती म्हणून मी तिथून निघालो. पुढचे काही दिवस वातावरण असच होत. पण नंतर सगळ पूर्ववत झाल. राशीच आणि माझ आता वारंवार भेटण होत असे. मी कॉलेज सुटल्या नंतर एखादा तास राशी सोबत असायचो. योगी आणि विरजा रात्री मला नाक्यावर भेटायचे. एकंदरीत लाइफ एकदम कूल चालली होती. राशीला मी फ्रेंडशिप डे च्या दिवशी प्रपोज करण्याच ठरवल.
एकदिवशी कैंटीन मध्ये बसलेलो असताना मी सर्वांना ही गोष्ट सांगितली. विरजा नेहमी अशी गोष्ट सांगितल्यावर पार्टी मागणारा पण भाई आज शांत होता. मी न राहवून सर्वाना विचारल, काय झाल आहे तुम्हाला??? तुम्हाला काही प्रोब्लेम आहे माझ्यापासून??? माझ्या आनंदात तुम्हाला सहभागी नाही होयच आहे का??? मी अजाणतेपणी कोणाला दुखावल आहे का??? तेंव्हा योगी बोलला की नाही रे, अस काही नाही. आम्हाला तुझी काळजी वाटते एवढच रे. मी पुन्हा विचारल, राशी चांगली मुलगी नाही का??? तेव्हा योगी बोलला, अस नाही रे, राशी खुप चांगली मुलगी आहे. पण तू खरच प्रेम करतो का तिच्यावर??? सेटल होणार आहेस का तिच्या सोबत??? अस तर नाही ना की थोड्या दिवस फिरणार आणि मग सोडून देणार. त्यांचे प्रश्न बरोबर होते. पण माझ्याकडे उत्तर नव्हत. पण त्यांनी मला विचार करण्यास भाग पाडल एवढ नक्की.
नंतरचे काही दिवस मी सतत राशी ला भेटत होतो. दोन तीनदा मुंबई दर्शन सुद्धा करून झाल होत.
ती आणि मी खुप कम्फर्टेबल होतो एकमेकांसोबत. शेवटी फ्रेंडशिप चा दिवस उजाडला. आज मी ग्रुप सोबत वाटर रेसोर्ट ला जाणार होतो आणि राशी ला मी आज विचारणार होतो. कॉलेज ने रिसेस नंतर आम्हाला फ्रेंडशिप डे साजरा करण्यास वेळ दिला. पहिले तर आमचा ग्रुप मध्येच सेलिब्रेट झाला फ्रेंडशिप डे. मी सई ला फ्रेंडशिप रिबिन बांधत होतो. तेंव्हा सई ने मला विचारल की, अभी तू माझ्या सोबत राहशील ना??? आपली फ्रेंडशिप कधी तुटणार तर नाही ना??? सई च्या डोळयात पाणी होत. मी सई ला पहिले कधी अस पाहिल नव्हत. मी आज ना उद्या निघून जाईन अस तिला वाटत होत. मी सई ला बोललो, मी कुठे ही नाही जाणार तुझ्या सोबतच असेन नेहमी. सई चे हे रूप पाहून मी भारावून गेलो होतो. कॉलेज सुटल्यावर भेटू अस बोलून मी राशी ला भेटायला कैंटीन मध्ये गेलो.
कैंटीन मध्ये जात असताना माझ्या डोक्यात असंख्य विचार येत होते. दिड महिन्यापूर्वी मी राशी ला ओळख़त सुद्धा नव्हतो आणि आज मी तिला प्रपोज करणार होतो. योगी ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर शोधत होतो. सई चा तो चेहरा डोळया समोर येत होता. राशी अशी मुलगी होती की जिच्यासोबत मी माझ पूर्ण आयुष्य काढू शकत होतो. काहीच कळत नव्ह्त काय चालू आहे??? आता प्रश्न एवढाच होता की, मी राशी वर प्रेम करतो का??? कारण राशी माझ्यावर प्रेम करते हे मला माहीत होत. शेवटी आज मला एक निर्णय घेण भाग होत. खुप कॉम्प्लीकेटेड असत हो हे प्रेम. जेवढा विचार करणार तेवढे सीरियस होणार तुम्ही. बेस्ट सोल्यूशन.....विचारच करू नका. तेच मी केल आणि राशी समोर जावून उभा राहिलो.
राशी चा त्या दिवशीचा तो रेड आणि ब्लैक कॉम्बिनेशन असलेला पंजाबी ड्रेस तिच्यावर खुप उठून दिसत होता. काय बोलायच काहीच कळत नव्हत. शांत उभा राहिलो. राशी बोलली की बोल काय बोलायच आहे ते. फ़क्त ३ शब्द बोलायचे होते. पण शब्द तोंडातून बाहेर येण्यास काही तयार नव्हते. मला समजुन चुकल होत की माझ राशी वर प्रेम नाही. काल पर्यंत मी माझ्या निर्णयावर ठाम होतो की मी राशीला प्रपोज करणार. पण आज सई ने बोललेल, "अभी तू माझ्या सोबत राहशील ना???" हे वाक्य आपल काम करून गेल होत. सई च्या आवाजातला तो आपलेपणा हृदयाला कुठेतरी भिडला होता.
क्रमशः.....
चला, निरोप घेतो. परत भेटूच.
अभिजीत
hmmmm...what a begining of love story...Sai u r great...
ReplyDeleteAbhijeet, how u cant understand what u r friend was feeling about you?