Tuesday, December 28, 2010

८ वर्ष जुनी मैत्री.....

काल एका मैत्रिणीकडे सत्य नारायणाच्या पूजेसाठी गेलो होतो. पोहचायला तसा उशीरच झाला होता. पण एकंदरीत सर्व कार्यक्रम तसा चांगला पार पडला. घरी येयला रात्रीचा १ वाजला. माझी झोपायची वेळ साधारण हीच आहे. पण झोप काही येत नव्हती. तिच्या सोबत घालवलेले काही क्षण, कॉलेज चे ते दिवस आठवले आणि मन आठवणी मध्ये रमत गेल.

८ वर्षापूर्वी कॉलेज नवरंग ला आमची ओळख झाली होती. तेंव्हा पासून आम्ही ओळखतो एकमेकांना. ग्रेजुएशनची शेवटची ३ वर्ष ती कोल्हापुरला होती. पण आज ही ते नवरंग चे दिवस आठवले की हसायला येत. खुप धमाल केली होती. सुरवातीचे काही दिवस आम्ही खुप कमी बोलायचो. कालांतराने फ्रेंडशिप वाढत गेली. पण फ्रेंडशिप समजण्याच, वाढवण्याच, निभवण्याच ते वय ही नव्हत. साधारण १ वर्षा नंतर ती कोल्हापुरला निघून गेली.

इकडे मी माझ्या लाइफ मध्ये बिझी झालो आणि ती तिकडे तिच्या लाइफ मध्ये. खुप कमीवेळा भेटलो आहोत आम्ही आजपर्यंत. शेवटी काय हो मी कधी कोणाला फोर्स नाही करत भेटण्यासाठी. मला एवढच वाटत की, समोरच्या व्यक्तीला मनापासून वाटत असेल तरच त्या व्यक्तीने मला भेटाव. असो. कालांतराने तीच ग्रेजुएशन पूर्ण झाल. ती मुंबईला परत आली. फिरण्याची खुप आवड या मैडम ना. ठाणे, पुणे, कोल्हापुर सारख्या फिरतीवर असतात. आता गेली २ वर्ष मुंबईतच आहेत. तेंव्हा आता आमच भेटण होत.

ग्रेजुएशन पूर्ण झाल्यावर तिने तीच पोस्ट ग्रेजुएशन पुण्यातून केल. आता पर्यंत आमच्याकडे मोबाईल आले होते. आता संपर्कात राहण जरा जास्त सोयीस्कर झाल होत. पुणे ते ठाणे तासनतास गप्पा मारल्या आहेत आम्ही, कधी सीरियस तर कधी एखाद्या गंमतीदार टॉपिकवर. कधी भांडलो आहोत तर कधी एकमेकांना समजुन घेतल आहे. जे काही क्षण एकत्र घालवले ते स्मरणात राहिले. गेली ८ वर्ष ना ती कधी माझ्या वाढदिवसाच्या पार्टीला आली ना कधी मी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलो. पण जेंव्हा जेंव्हा आम्ही भेटलो तेंव्हा तेंव्हा फुल ऑन एन्जॉय केल. मग ते एखाद्या होटेल मधल डिनर असो वा एखाद्या mall मध्ये बसून मारलेल्या वायफळ गप्पा असोत.

आज जेंव्हा मी तिच्याकडे पाहतो तेंव्हा मला खुप बर वाटत. कारण आयुष्य कस जगायच आहे हे तिला समजतय. गरज पडली तर ठामपणे ती निर्णय घेवु शकते. हल्ली आम्ही सहसा मोबाईल वर बोलत नाही. कधी भेटलो तर बोलण होत. पण तीच आणि माझ बोलण म्हणजे खुप मजाक मस्ती आणि खुप कमीवेळा सीरियस.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

2 comments: