उद्या २५ डिसेंबर नाताळ. २ वर्षापूर्वी ह्याच दिवशी एका मुलीला मी तलावपाळी ला भेटलो होतो. भेट काही जाणून बुजुन घडवून आणली नव्हती. अचानकपणे आम्ही एकमेकां समोर आलो होतो. पहिल्यांदाच समोरा समोर बोलणही झाल. मी हिला २ वर्षापूर्वी भेटलो हे खर पण ह्याची सुरवात साधारण त्याच्याही ६ महीने अगोदर झाली होती.
त्या वेळेस ऑरकुट खुप प्रसिद्ध होत. खुप जणांची फ्रेंडशिप जमवून देण्यात ऑरकुट चा हातखंडा होता. मी ही एकदा माझ ऑरकुट प्रोफाइल चेक करत होतो. तेंव्हा एका मुलीच प्रोफाइल मला चांगल वाटल. मी तिला add request पाठवली. तिने ही जास्त आढेवेढे न घेता request एक्सेप्ट केली. वरचेवर एकमेकांना स्क्रैप पाठवण चालू झाल. फ्रेंडशिप वाढू लागली. काही दिवसांनी g-talk ला आम्ही एकमेकांना add केल. आणि बऱ्या पैकी बोलण चालू झाल. तासनतास बोलत बसलो आहोत आम्ही chat वर. विषय कसे सापडायचे माहीत नाही. पण बोलायला बसलो तर विषयांची कमी नसायची. तिचा नेहमी एकच विषय असायचा बोलताना आणि तो म्हणजे फ्रेंडशिप. तिच्यासाठी फ्रेंडशिप म्हणजे सर्वकाही. करीअर, फॅमिली, स्वतःच्या आयुष्या पेक्षा ही जास्त महत्त्व फ्रेंडशिप ला. मला थोड आश्चर्य ही वाटायच आणि थोडा राग ही येयचा. अस वाटायच की तिला स्वतःच अस्तित्व अस काही नाही. मित्र मैत्रिणी बोलतील तेच तीच लाईफ. कोणीही तिचा फायदा घेवु शकत. कोणीही तिला हर्ट करू शकत. तरीही या मैडम शांतच राहणार. खुप समजवायचो. काही गोष्टी तिला समजल्या, काही अनुभवाने समजल्या. शेवटी काय हो काळ सगळयांना शिकवतोच की. २ वर्षा पूर्वीची ती आणि आजची ती.....ह्या मध्ये खुप फरक आहे.
एकदिवशी आम्ही chat वर बोलत असताना, मोबाईल चा विषय निघाला. तो पर्यंत आम्ही आमचे मोबाईल नंबर पण एक्सचेंज केले नव्हते. त्यावर शेवटी आमच अस ठरल की ज्या दिवशी आम्ही अचानक पणे एकमेकां समोर येवू त्या दिवशी आपण मोबाईल नंबर एक्सचेंज करू. आता आमच ठरवून भेटण होणारच नव्हत. कसे भेटणार होतो याची काहीच कल्पना नव्हती.
त्या नंतर बरेच दिवस आमच बोलण असच चालू होत. मोबाईल नंबर, भेटण हा विषयच नसायचा. खुप विषयांवर आम्ही बोललो. काही विषयांवर आमची भांडण झाली. पण फ्रेंडशिप नेहमीच टिकली. माझ्या मते फ्रेंडशिप हे निभवण नसत, तर ते एक जगण असत. एकमेकांकडून काहीही एक्स्पेक्ट न करता ते रिलेशन एन्जॉय करण.
नंतर मी तिला एक दोन ठिकाणी पाहिल ही होत. पण समजायच नाही की ती नक्की हीच आहे का?? त्या वेळेला ह्या मैडम ना पण समजायच की आपल्याकडे कोणतरी बघतय पण हिच्या चेहर्यावर काही हावभाव नसायचे. मग मी ही कसा जाणार हो डायरेक्ट विचारायला. नंतर chat ला भेटल्यावर तिला विचारायचो, की तूच होती का ती. तर मैडम हो बोलायच्या. आणि मी का नाही आलो बोलायला अस बोलून माझ्याशीच वाद घालायच्या. काय बोलणार मी. तिला विचारायचो, तू का नाही आलीस. तर मुलींची ठरलेली टिपिकल उत्तर देयची. कठीण असत हो हे सर्व. पण कधी राग नाही आला मला तिचा. असेच करत काही महीने निघून गेले.
शेवटी २५ डिसेंबर २००८, ह्या दिवशी मी संध्याकाळी तलावपाळी वर मित्रांसोबत आलो. मैत्रिणीं सोबत ही बसली होती. मी तिच्याकडे पाहिल पण तीच काही लक्ष नव्हत. शेवटी मनाशी ठरवल आज काही झाल तरी बोलायच. गेलो तिच्या समोर, बोललो तिच्याशी. ठरवलेल्या प्रमाणे मोबाईल नंबर ही एक्सचेंज केले. जे chat वरती आम्ही ठरवल होत, ते आज पूर्ण झाल होत. आज ही आम्ही कधी राम मारुती रोडवर, कधी तलावपाळी वर भेटतो बोलतो पण काहीही न ठरवता. आणि आज ही दिवसातून एक तरी sms असतो तिचा.
चला, निरोप घेतो. परत भेटूच.
अभिजीत
tuzi aani mazya frndshp chi story aahe hi i knw...nice 1 really good...cheers 2 our frndshp...keep in touch...tc
ReplyDeletethnxs madam.....
ReplyDelete