Tuesday, November 16, 2010

मला तिला भेटायच आहे.....

मागचा महिना आणि दिवाळी चा पहिला आठवडा, मस्त मजा मस्ती चालू होती. एरव्ही पण असतेच हो पण दिवाळी म्हंटल की जरा जास्तच. आणि मित्र म्हंटले की मजा मस्ती आलीच हो. दिवाळी चा पहिला दिवस म्हणजे खुपच भारी दिवस. 

ह्यावेळे ही असच, सकाळी लवकर (म्हणजे ८ वाजता) आंघोळ उरकली आणि मित्रांना भेटायला राम मारुती रोड वर आलो. (मी ठाण्याला राहतो, आमच्या इथल खुप प्रसिद्ध ठिकाण) दिवाळी च्या पहिल्या दिवशी ठाण्यात राम मारुती रोड, तलावपाळी, कोपिनेश्वर मंदिर ह्या ठिकाणी तरुण वर्गाची जरा जास्तच गर्दी असते. मी ही त्याच गर्दीचा एक हिस्सा आहे. 
(विषयांतर होत आहे मी मूळ मुद्द्याकडे येतो)

मी राम मारुती रोड वर आलो. तिथे कुठल्यातरी एका संस्थेतर्फे एक band group आला होता. कुठली तरी नविन जुनी गाणी ते गात होते. गर्दी ही चांगली जमली होती. (कधी संपणार हो ही प्रस्तावना, मूळ मुद्द्या कडे येयच राहून जातय) 
(एकंदरीत तुमच्या डोळ्या समोर चित्र उभ राहिल असेल की, सकाळी ८-९ वाजताच थंड वातावरण, तरुण तरुणीनी भरलेला राम मारुती रोड, त्या band group च्या गाण्यांनी सजलेला आसमंत)

आम्ही नंतर कोपिनेश्वर मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला कारण आमचा एक मित्र आम्हाला तिथेच भेटणार होता. पण मुलीं वरून नजर काही हटत नव्हती. खुप सुंदर दिसत होत्या. (ज्या मुलीला नेहमी जीन्स आणि टीशर्ट मध्ये पाहिलेल असत, तिला साडी मध्ये पाहण्याची मजा काही औरच असते) मुली साडी परिधान करुनच खुप सुंदर दिसतात, माझ्या ह्या वाक्याशी सर्वजणच सहमत असतील. (खुप झाल, परत विषयाकडे याव)

मंदिरात जाण्यास आम्ही निघालो. वाटेवरच कूल कैंप नावाच आइसक्रीम पार्लर येत. आम्ही काही तिथे ब्रेक घेतला नाही. पण तिथे एका मुलीने माझ लक्ष वेधून घेतल. तिची सुंदरता मी शब्दात नाही व्यक्त करू शकणार. खुप सुंदर आहे दिसायला ती. तीच नाव मी इथे नाही घेणार. (ह्याच मुलीला मी एक आठवडया पूर्वी गोखले रोड वर तिच्या आई सोबत पाहिल होत) कूल कैंप ला ती मैत्रिणीं सोबत उभी होती.

तिथून आम्ही पुढे निघालो, ते थेट मंदिरातच आलो. अगोदरच उशीर झाला होता. आमचा मित्र वाट पाहून वेडा झाला होता. त्याला आलेला राग त्याच्या बोलण्यातुन प्रगट होत होता. थोड्यावेळाने काही जण मंदिरात दर्शनासाठी गेले आणि आम्ही  बाहेरच थांबलो. काही ओळखीचे चहरे दिसले, त्यांना भेटलो. कॉलेज च्या आठवणी ताज्या केल्या. निघण्या आधी फोटो बीटो काढले.बाहेर थांबायच कारण म्हणजे मुली पाहणे एवढच. (खुपच विषयांतर होत आहे, मंदिराचा हा प्रसंग घालण, हे काही एवढ महत्वाच नव्हत पण म्हंटल असू दे)

नंतर आम्ही जो मोर्चा वळवला तो पेटपूजे कडे. साईं कृपा मध्ये पेटपूजा करून झाली. नंतर आम्ही थेट आलो ते सिगरेट च्या टपरी वर. तिथे ठरल की गोलमाल ३ बघुया, म्हणून दोघे जण बाईक ने जावून टिकिट मिळतील की नाही ते पाहून आले. शो काही एवढे हाउसफुल नव्हते म्हणून दुसऱ्या दिवशी येवून टिकिट काढण्याचे ठरले. गेली २ वर्षे आम्ही दिवाळीत  मूव्ही पाहत आलेलो आहोत. चांगला असो वा बकवास, पहायचा नक्की. अनुभव काही चांगला नाही कारण मागच्या वर्षी 'blue' पहिला आणि त्याच्या आदल्या वर्षी 'om shanti om' पहिला. तुम्हाला सांगायला नको, काय आमची अवस्था झाली असेल ती. असो दुसऱ्या दिवशी आम्ही eternity ला आलो. टिकिट काढायच होत ना हो.

mall च्या campus मध्ये उभा होतो. मित्र बोलला, रिक्षातून जी उतरत आहे तिला बघ. बघतो तर काय. काल जिला आइसक्रीम पार्लर बाहेर पाहिल होत, तीच होती. २ आठवडयात ३ वेळा ती माझ्या समोर आली होती. एकदा गोखले रोड वर, दुसर्यांदा कूल कैंप आइसक्रीम पार्लर बाहेर आणि तिसर्यांदा eternity mall मध्ये. घरी गेल्यावर मी तीच फेसबुक प्रोफाइल शोधून काढल. (नाव माहीत असल्यामुळे ते सहजच सापडल) पण तिला काही मी friend request पाठवली नाही. साधारण १ महीन्या पूर्वी एका मित्राशी मी ह्या मुली बद्दल बोललो होतो. माझी काही अपूर्ण राहिलेली काम पूर्ण झाली की मला तिला भेटायच आहे. बघू, कस काय जमतय ते.

गोलमाल ३ विषयी सांगायच राहून गेल की हो. संध्याकाळच्या शो च टिकिट काढल. मूव्ही म्हणाल तर फुल ऑन टाइमपास  आहे. डोक बाजूला ठेवा आणि मूव्ही एन्जॉय करा. (मी काही इथे गोलमाल ३ ची advertisement  नाही करत आहे)

चला निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 

No comments:

Post a Comment