कधी कधी लिहिण्यासाठी विषय सापडत नाही, कधी कधी एखादा विचार डोक्यात येतो आणि आपण लिहिण्यासाठी बसतो. तुमच्या रोजच्या आयुष्यात अशा खुप काही गोष्टी घडतात की ज्याचा तुम्हाला त्रास होतो. मग सहाजिकच आपण तत्वन्यानी बनतो, काही तत्व निर्माण करतो स्वताची की जेणेकरून होणारा त्रास कमी व्हावा. आपल्याला होणारया त्रासातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करावे लागतील ते आपण करावेत. पण बघायला गेल तर आयुष्यात येणारे हे प्रोब्लेम्स खुप मजेशीर असतात. शेवटी काय हो प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोण. (खुप झाली प्रस्तावना, आता जरा पाहुया काय प्रोब्लेम असतात ते)
१. आपण कामाला निघतो. कड़क इस्त्री केलेला शर्ट घालून ट्रेन मध्ये चढतो. उतरे पर्यंत त्या शर्ट चे जे काही हाल झालेले असतात ते आपल्यालाच पहावत नाही आणि ज्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी हे प्रयत्न केलेले असतात, ते एका क्षणात विफळ होतात. केवढा हा त्रास.
२. आपण कॉलेज ला जायला निघतो. नविन कपडे घातलेले असतात आणि पक्षी त्यावर आपले सकाळचे विधि उरकतात. काय अवस्था होत असेल आपली.
३. आपण बार मध्ये ड्रिंक्स घेत असतो आणि समोरच आपल्या ओळखिची एक व्यक्ति बसलेली असते.
(ती व्यक्ति बहुतेक वेळा आपल्या वडिलांच्या ओळखिचीच असते)
४. टपरीवर आपण सिगरेट मारत असतो आणि तेंव्हाच कोणतरी रिक्षातून आपल्याकडे बघत निघून जात.
५. जी मुलगी आपल्याला आवडत असते, तिला नेमक दुसर कोणतरी आवडत असत.
६. graduation, post-graduation करून ही, आयुष्य सेटल होई पर्यंत अर्ध आयुष्य निघून गेलेल असत.
७. ज्या मुलीशी आपल वाकड असत, ती अशी ना तशी आपल्या समोर येतेच.
८. वर्षभर काम करूनही appraisal चांगल मिळत नाही.
९. लग्न करताना प्रेम महत्वाच नाही, पैसा महत्वाचा आहे. भूतलावर बहुतेक सर्व लोकांनी हे मान्य केलेल आहे. (मग हुंडा मागणे हा गुन्हा का आहे???)
१०. ज्या मुलीवर आपल प्रेम असत, त्याच मुलीच्या मैत्रिणीच आपल्यावर प्रेम असत.
११. खिशात १००० रुपये असताना, खरेदी करताना आपल्याला २००० ची जीन्स आवडते. (पण १००० रुपयात आपल्याला जीन्स आणि शर्ट दोन्ही खरेदी करायच असत हो)
१२. एखाद्या मुलीला तुम्ही आवडत असाल तरीही तुम्हीच तिला propose करावा असा तिचा अट्टाहास का???
१३. जी मुलगी तुम्हाला आवडते, ती दुसऱ्या कोणाची तरी प्रेयसी असते.
१४. ज्या दिवशी आपल्याला लवकर घरी जायच असत, त्याच दिवशी आपण उशिरा घरी येतो.
१५. मोबाइल वर काही महत्वाच बोलत असताना, मोबाइल स्विच ऑफ होणे, मोबाइल च नेटवर्क गायब होणे, मोबाइल मध्ये disturbance येणे, अशा गोष्टी घडतात.
खुप प्रोब्लेम सांगितले हो. अजुन ही बरेच असतील, आठवत नाहीत मला आता. हे एवढे प्रोब्लेम लिहून काढण्याचा सुद्धा केवढा हा त्रास.
चला निरोप घेतो, परत भेटूच.
अभिजीत
No comments:
Post a Comment