Tuesday, April 5, 2011

लोणावळा : भाग १ - एक प्रयत्न आयुष्याकड़े पाहण्याचा

सुमारे एक दिड महीन्यानंतर ह्या ब्लॉगवर पोस्ट टाकत आहे. ह्या दरम्यान बाकीच्या माझ्या २ ब्लॉग वर मी अधून मधून पोस्ट टाकत होतोच. तुम्ही आता पर्यंत माझ्या तिन्ही ब्लॉगला दिलेला प्रतिसाद पाहून खुप बर वाटल. मी ठाण्यात राहतो. जेंव्हा माझ्या ब्लॉगला भारता बाहेरून विझिट दिल्या जातात त्या वेळेच्या भावना मला शब्दात नाही व्यक्त करता येणार. मला ओळखणारे माझे ब्लॉग वाचत आहेतच. जे माझ्यासाठी अनोळखी आहेत तरीही वारंवार माझ्या ब्लॉगला ज्यांच्या विझिट आहेत. अशा सर्व व्यक्तींचे मनापासून आभार. मी लेखक नाही. मी एक सामान्य व्यक्ति तरीही एक प्रयत्न आयुष्याकड़े पाहण्याचा.

गेल्या आठवड्यात लोणावळ्याला गेलो होतो. काम होत थोड. जाण्या-येण्याच रेल्वेच ए.सी.च बुकिंग अगोदरच केल होत. प्रवास सर्वात जास्त सुखकर कसा होइल ह्या कड़े माझ नेहमी लक्ष असत. असो. सकाळची ट्रेन होती. मी माझ्या आरक्षित असलेल्या सीटवर जावून बसलो. प्रवासाची सुरवात एकदम खतरनाक झाली. माझी सीट अगोदरच कोणीतरी पुशबेक करून ठेवली होती. म्हणून मी बटन प्रेस करून सीट पूर्ववत केली. पण त्यावेळेस  माझ्या लक्षात नाही आली की माझ्या पाठी जे गृहस्थ बसले होते त्यांनी माझ्या सीटला अटेच असलेल्या स्टैंड वर चहाचा कप ठेवला होता. बटन प्रेस करताच सीट पुढे ढकलली गेली आणि त्यांचा चहाचा कप खाली पडला. फ्लोअरवर सर्वत्र चहा होता वाटल आता काहीतरी भांडण होइल. पण त्यांना ही कळल की चुकी माझी नव्हती. भांडण काही झाल नाही आणि प्रवास सुरु झाला. कल्याण गेल आणि टी.सी. आला. एक व्यक्तिच आणि टी.सी. च वाजल. त्या व्यक्तीला बसण्यासाठी जागा हावी होती. त्यावरून त्या दोघां मध्ये काही तरी वाजल होत. त्या व्यक्तीचा एक ग्रुप होता. त्यामध्ये ३ पुरुष मंडळी आणि २ बायका होत्या. असे एकून ते ५-६ जण होते.

त्या २ बायका अशा काही बसण्यासाठी जागा शोधत होत्या की काही विचारू नका. शेवटी नेरळला काही लोक उतरले आणि त्या सर्वांना जागा भेटली. बसण्यासाठी सीट मिळण हा आयुष्यातला सर्वात मोठा आनंद असू शकतो हे त्या दिवशी मला कळल. जागा भेटता क्षणी त्यांनी लैपटॉप चालू केला आणि फोटो पाहू लागले. बेकग्राउंडला जुन्या गोलमाल मधल "आने वाला पल" हे गाण लावल. थोडक्यात काय तर एक माहोल बनवला जो त्यांना भूतकाळातल्या गोड आठवणीं मध्ये घेवुन जाइल. ते सर्वजण फोटो पाहत होते. एकमेकांवर कमेंट पास करत होते. काही उगाचच शो-शायनिंग करत होते. आपल स्थान ह्या ग्रुप मध्ये किती प्रभावी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. कोणी फिलोसोफी झाड़त होत. कोणी फॅमिली बद्दल बोलत होत. कोणी सेंटर ऑफ़ अट्रेक्शन बनण्याचा प्रयत्न करत होत. तरीही सर्वजण एकमेकांना पाठिंबा देत होते. एकमेकांचे नखरे मनापासून सहन करत होते. पुढचे पिकनिकचे प्लान ठरवत होते. त्यातील सर्वजणांनी चाळीसी पार केली असेल. एक व्यक्ति म्हणून प्रत्येकजण वेगळा असला तरी एक ग्रुप म्हणून ते एकत्र होते. माझ्या मते ग्रुप हा असाच असावा.

उर्वरित भाग पुढच्या पोस्ट मध्ये. 

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

क्रमशः

अभिजीत

No comments:

Post a Comment