थोड्यावेळ गाडीत झोप काढायच ठरवल पण झोप काही येत नव्हती. साधारण १० च्या सुमारास मी लोणावळा स्टेशन वर उतरलो. वडिलांचा एक मित्र अगोदरच स्टेशन वर आला होता. त्याच्या बाइक वरून आम्ही पाहिले अन्नपूर्णा होटेल मध्ये गेलो. स्टेशन पासून चालत १० मिनिटांच्या अंतरावर हे होटेल आहे. (नाश्ता करण्यासाठी हे चांगल होटेल आहे.) आम्ही नाश्ता उरकला आणि निघालो. ठरलेल्या ठिकाणी पोहचलो. माझ २-३ तासांच काम होत. ते उरकल आणि आम्ही निघालो.
काम अपेक्षेपेक्षा लवकर झाल होत. एक होटेल मध्ये दुपारच जेवण उरकल आणि वेळ होता म्हणून त्या माणसाच्या घरी गेलो. सिंहगड युनिव्हर्सिटीच्या पायथ्याशी त्याच घर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरून तुम्ही जात असाल तर डाव्या हाताला तुम्हाला डोंगरात उभारलेली सिंहगड युनिव्हर्सिटी दिसते. संध्याकाळी एक्सप्रेस मार्गावरून खुप विलोभनीय दृश्य दिसत. डोंगरापलिकडे अस्ताला चाललेला सूर्य. युनिव्हर्सिटीवर पडणारी मावळत्या सुर्याची किरणे. डोंगरांना कापत निघालेला मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे. क्षितिजावर चढ़णारी संध्याकाळची नशा. थंड वारयाची लाट. सर्वच कस सुंदर. शब्दात मांडता न येण्याजोग. जस जस सिंहगड युनिव्हर्सिटीच्या पायथ्याशी येत होतो. तस तस आठवणी दृष्टी पटलावर येत होत्या. वाटत होत निघाव गाड़ी घेवुन मुंबई पुणे हायवे वर, थांबाव त्या ठिकाणी, पाहत रहाव त्या अस्ताला जाणार्या सुर्याला. त्या मोहक दृश्याला. तेवढ्यात आम्ही त्याच्या घरी आलो. थोडा वेळ थांबलो आणि निघालो कारण परतीचा प्रवास करायचा होता. तसे २ तास माझ्या हातात होते पण त्याला दुसर काही काम होत म्हणून मी शेवटचे २ तास स्टेशन वर थांबायच ठरवल.
स्टेशन वर आलो. स्टेशन वरचे सर्व पंखे बंद होते. सर्व इंडिकेटर बंद होते. गरमा बऱ्यापैकी जाणवत होता. बसण्यासाठी जागा शोधत होतो. थोडा पुढे आलो. तिथे एक खुर्च्यांची रांग होती. तिथे एक मुलगी बसली होती. आमच्या दोघांमध्ये एक खुर्चीच अंतर ठेवून मी बसलो. तिने कुठलातरी भारी परफ्यूम लावला होता. त्यामुळे त्या उकाड्यातही एक फ्रेशनेस जाणवत होता. ती काही शांत बसली नव्हती. मोबाईल चेक करत होती. बैग उघडत होती. कुठलीतरी क्रीम काढून ओठांना लावत होती. एक सेकंदा पुरता वाटुन गेल किती काम असतात मुलींना. नेहमी बिझी असतात त्या :-) थोड्या वेळाने तिच्या प्रियकाराचा फ़ोन आला असावा कारण बोलत बोलत ती निघून गेली. एखाद वेळेस स्टेशन बाहेर तो तिची वाट पाहत असावा. ती गेल्यावर सहज आजुबाजुला नजर फिरवली. तर कोणी स्टेशन वर रांग लावून उभे होते. कोणी शांत बसून होते. कोणी त्या उकाड्यातही झोपा काढत होते. तेंव्हा मला एवढ कळल की माणसाला खरच झोप आली असेल तर ए.सी., पंखा, गादी ह्या गोष्टींची गरज नाही पडत. एक लाकडी बाकडा सुद्धा पुरतो. सकाळी ए.सी. कोच मधल्या पुशबेक सीटवर सुद्धा मला झोप येत नव्हती. असो.
थोड्या वेळाने २ मुली आणि १ मुलगा खुप सार लगेज घेवुन स्टेशन वर आले. त्यातले १ मुलगा आणि १ मुलगी (बहुतेक ते कपल असावेत) कुठेतरी गेले. उरलेली एक मुलगी सामानावर लक्ष ठेवण्यासाठी तिथेच थांबली. तिलाही काही काम नव्हत. मलाही काही काम नव्हत. मी कधी तिच्याकडे पाहत होतो तर कधी ती माझ्याकडे. वेळ घालावण हच एक उद्देश होता तिचा आणि माझा :-) वेळ जाता जाता जात नव्हता. शेवटचा एक तास राहिला होता. अजूनही पुढे २ तास प्रवास करून मी घरी पोहचणार होतो. किती कंटाळा आला होता काय सांगू तुम्हाला. पण एक खुप चांगली गोष्ट घडली. एक सुंदर मुलगी स्टेशनवरच्या त्या रांगेत येवून उभी राहिली. ती रांग जनरल डब्यासाठी होती. लोणावळ्याला २ जनरल डब्बे उघडले जातात मुंबईसाठी. गाडी आल्यावर लोकांना रांगेने सोडल जात डब्यात. असो. पण तिला पाहिल्यावर कंटाळा कुठल्याकुठे निघून गेला. दिसायला खुप भारी होती राव. लाल रंगाचा टॉप, ब्लैक जीन्स, मनगटावर एक स्टायलिश घड्याळ, डोळ्यांवर एक मोठा गोगल, केस घट्ट बांधलेले, कानात इअर फ़ोन, हातात मोबाईल असा काहीसा तिचा गेटअप होता. त्या वेळेस त्या स्टेशन वर तीच एक सुंदर मुलगी होती. तिच्यावरून नजर हटण कठीण होत. तिलाही कळल की मी तिच्याकडे पाहत आहे. कधी ती माझ्याकडे पाहत होती तर कधी मी तिच्याकडे. पण गाडी येण्याची वेळ झाली आणि मी ए.सी. चा डब्बा जिथे येणार होता तिथे जावून उभा राहिलो.
थोड्यावेळातच गाडी आली. ए.सी. मध्ये विंडो सीट भेटली होती. सकाळी मी ह्याच गाडीने आलो होतो आणि ह्याच गाडीने घरी चाललो होतो. सकाळच्या प्रवासाची ती खतरनाक सुरवात, चाळीशी पार केलेला तो ग्रुप, एक्सप्रेस हायवे च्या त्या आठवणी, लोणावळा स्टेशन वरची ती मुलगी, अशा खुप आठवणी मनात साठवुन मी परतीच्या प्रवासाला लागलो.
चला, निरोप घेतो. परत भेटूच.
अभिजीत
No comments:
Post a Comment