रात्रीचे १२.३० वाजले होते. मोबाइल वर मेसेज आला. झोप खुप आली होती पण रिप्लाय देण भाग होत. मेसेज काही अशा प्रकारचा होता.
नैना : hi, dear...r u der????? plzzz ans...
meet me 2morrow @ Korum 6 pm sharp.....
waiting for ur reply...love u...miss u..
अभि : hey, sweetheart.....i m here.....
yes, definately i will b der 2morrow.....done.....
love u.....
नैना : ok..love u..
gn..tc..
अभि : ya...tc.....
दुसर्या दिवशी प्रोजेक्ट संबधी काही काम होती, ती पूर्ण केली. लंच जरा उशीराच झाल. संध्याकाळी ४ वाजता घरी आलो. काही pdf फाइल सेंड करायच्या होत्या, त्या केल्या आणि निघालो. बाइक काढली, साधारण ५.४५ ला मी ठरल्या ठिकाणी पोहचलो. नैना चा काही थांगपत्ता नव्हता. तिला कॉल केला तर तिचा नंबर नॉट रीचेबल होता. थोड्यावेळ वाट पहिली.
@ 6.00 pm : परत कॉल केला. ह्या वेळेस कॉल लागला. पण तिने काही उचलला नाही.
@ 6.17 pm : परत कॉल केला. पण तिने काही उचलला नाही.
@ 6.45 pm : परत कॉल केला. पण तिने काही उचलला नाही.
@ 7.03 pm : परत कॉल केला. ह्या वेळेस कॉल उचलला पण समोरून कोणतरी मुलगा बोलत होता.
त्याला विचारल तू कोण आहेस??? नैना कुठे आहे??? ह्यावर तो बोलला, मी तिचा मित्र जयेश. ती आज बिझी आहे. ती तुला नंतर कॉल करेल आणि त्याने फोन ठेवला. म्हंटल ठीक आहे. नंतर मी मित्रांना कॉल केला आणि poptates मध्ये ती संध्याकाळ सार्थकी लावली.
No comments:
Post a Comment