हल्ली फेसबुक मुळे ऑरकुटच प्रस्थ फार कमी झाल आहे. बहुतेक सर्वचजण ऑरकुट सोडून फेसबुक वर असतात. बर्यापैकी प्रायव्हसी जपली जात आहे म्हणून खुप कमी कालावधीत फेसबुक सर्वांच लाडक झाल आहे. इथेही कोट्स अपडेट केले जातात, म्हणजे इमोशनल कोट्स, लव कोट्स, फ्रेंडशिप कोट्स रोजच्या रोज अपडेट केले जातात. तुम्ही जर खरच मनापासून मानत असाल हे कोट्स आणि त्यांचा अर्थ तर खुप चांगल आहे हो. पण लोकांना फ़क्त दाखवण्यासाठी करत असाल तर थांबवा रे. कारण तुम्ही मानतच नसाल तर कशाला लिहिता रे. समजा एखादा कोट तुम्हाला खरच आवडला, त्यातला अर्थ तुम्हाला पटला, तुम्हाला तो सर्वांसोबत शेअर करावसा वाटला तरच करा हो. नाही तर कशाला ही दुनियादारी करता...थांबवा की.
खुप वेळा अर्थ नसलेल्या ओळी फेसबुक वर पब्लिश केल्या जातात. विषय कुठलाही असू शकतो म्हणजे जॉब, मैत्री, प्रेम, आयुष्य, रूटीन लाइफ. पण तुम्ही ती ओळ वाचली तरी तुम्हाला कळेल काय फालतुगिरी आहे. आणि ह्यावर कहर म्हणजे त्या ओळी वर १५-२० कमेंट्स दिल्या जातात. थांबवा की हे सर्व. मला कधी कधी प्रश्न पडतो की ह्या सर्वातुन नक्की काय साध्य करायच असत लोकांना. काही चांगली वाक्य पब्लिश करा रे. त्यावर कमेंट्स देयला आम्हाला ही आवडेल की हो. असो.
गेल्या काही दिवसात मी एवढे फ्रेंडशिप कोट्स, लव कोट्स, इमोशनल कोट्स वाचले असतील की काही विचारू नका. मी काही व्यक्तींनी लिहिलेल्या अशा कोट्स वर कमेंट्स सुद्धा दिल्या की खुप भारी लिहिल आहेस. आवडल वगैरे. त्यावर त्यांचा रिप्लाय असा होता की, नाही रे, अस काही नाही. इट्स जस्ट अ कोट. म्हंटल व्वा, काय रिप्लाय आहे. ओके बोलून सोडून दिल. अशा व्यक्तिंशी तुम्ही अर्ग्युमेंट तरी काय करणार??? सेंटर ऑफ़ अट्रेक्शन बनायच असत बाकि काही नाही.
साधे फोटो अपलोड केले जातात. फोटो कसा ही असो, सुंदर आहे, छान आहे बोलून आपण मोकळे होतो. किती डिप्लोमेट राहणार आहात. एखादी मुलगी आवडते तुम्हाला तर बोला की तिला सरळ.....तू आवडतेस म्हणून. दरवेळेस घुमुन फिरुनच सांगायची काय गरज आहे??? असो.
माझ एवढच सांगण आहे की जे काही कराल ते मनापासून करा. दुनियादारी पासून स्वतःला दूर ठेवा. सर्वात महत्वाच म्हणजे आयुष्य एन्जॉय करा.
चला, निरोप घेतो. परत भेटूच.
अभिजीत
No comments:
Post a Comment