स्वप्न.....किती कठीण आहे समजायला. तरीही प्रत्येकाच कहिनाकाही स्वप्न आहेच की. स्वप्न म्हणजे नक्की काय????? ते निर्माण कस होत????? त्याची व्याख्या काय??? संकल्पना काय??? स्वप्न हा शब्द कुठून आला??? प्रश्न खुप पण उत्तर एकही नाही.
माझ्यामते आपण आपले जीवन का जगत आहोत? ह्याचे उत्तर म्हणजे "स्वप्न". स्वप्न म्हणजे एक प्रवास. माझ्यामते स्वप्न अस असाव की ते आपल्याला आयुष्यभर पुरेल. स्वप्नाचा शेवट कधी असू नये. ते कधीही न संपणार असाव. प्रयत्नशील राहून फ़क्त एकेक पड़ाव पार करत रहाव आपण.
समजण्यासाठी थोड सोप्प करुया आपण. खुप जणांना MTV Roadies बद्दल माहित असेल. आत्ताच त्याचा ८ वा सीझन संपला. (आंचल रोडीज टायटल जिंकली). असो. मी मुळ मुद्द्याकडे येतो. रघु राम हा रोडीजचा निर्माणकर्ता (creator) आहे. गेली ८ वर्ष हा त्याचा प्रवास सुरु आहे (successfully). फ़क्त पड़ाव पार होत आहेत. पहिला सीझन, मग दूसरा, मग तीसरा,...............आठवा. पुन्हा तो ९ वा सीझन घेवुन येईलच की. मगाशी म्हंटल्या प्रमाणे स्वप्न अस असाव की ते आपल्याला आयुष्यभर पुरेल. स्वप्नाचा शेवट कधी असू नये.
काही लोक स्वप्नपूर्तीसाठी एवढी डेस्परेट असतात की, त्या प्रवासातली मजाच त्यांना अनुभवता येत नाही. व्हिक्टरी आनंदाने स्विकारता मग डिफीट का नाही स्विकारत हो. (डिफीट झक मारून स्विकारण वेगळ आणि आनंदान स्विकारण वेगळ). एक कोट मला तुम्हा सर्वांशी शेअर करावासा वाटतो.
Everybody wants 2 be a winner. Who wouldn't want 2 reach d finish line 1st? But sometimes winning is not just about finishing 1st : Ranvijay
आयुष्य एकदाच भेटत. फुल ऑन एन्जॉय करा.
चला, निरोप घेतो. परत भेटूच.
अभिजीत
No comments:
Post a Comment