आयुष्यात किती अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या चेहर्यावर स्मित हास्य उमटवटात????? ज्या आपल्याला सांगतात की, "आयुष्य खुप सुंदर आहे." माझ्या मते पुष्कळ आहेत. स्वप्नपूर्तीसाठी केलेले प्रयत्न, एखाद्या छोट्या बाळाच निरागस हसण, प्रेमात पडण, हिवाळ्यातली एखादी थंड पहाट, पावसात चिंब भिजलेली रात्र, ग्रीष्मातली सांयकाळ, अस्ताला चाललेला सूर्य, मित्रांसोबत शुद्ध हरपे पर्यंत ढोसलेल्या पार्ट्या, पावसात एखाद्या टपरीवर वाफाळलेल्या चहासोबत मारलेले सिगरेटचे झुरके, एखाद्या निर्जन रस्त्यावर अनुभवलेली नीरव शांतता, समुद्र किनारी तिचा हात हातात घेवुन अस्ताला चाललेल्या सुर्याला साक्षी ठेवून आयुष्यभर एकत्र राहण्याच्या खाल्लेल्या शपथा, भर पावसात एकाच छत्रीखाली तिच्या सोबत शक्य तेवढ्या धीम्या गतीने चालतानाचा अनुभव, सतत अपयश येवुनही "Never Say Die" ह्या एटीट्युड ने जगण.....किती सांगू????? यादी खूप मोठी आहे.
हे सर्व अनुभवण हेच आयुष्य आहे. आयुष्य खुप सुंदर आहे मित्रांनो. फ़क्त काळजी करत, दुनियादारी करत, रडत, टेन्शन घेत आयुष्य घालवू नका.
Mario Puzo ह्या लेखकाने त्याच्या The Godfather ह्या पुस्तकात एक छान वाक्य लिहिल आहे.
"He smelled the garden, the yellow shield of light smote his eyes, and he whispered, "Life is so beautiful."
...
Yet, he thought, if I can die saying, "Life is so beautiful," then nothing else is important."
...
Yet, he thought, if I can die saying, "Life is so beautiful," then nothing else is important."
-Mario Puzo (The Godfather)
आयुष्य ह्या पेक्षा वेगळ काय असू शकत?????
चला, निरोप घेतो. परत भेटूच.
अभिजीत
No comments:
Post a Comment