Monday, November 22, 2010

प्रेम.....बघता क्षणीच!

प्रेम. आयुष्यात प्रत्येकाला एकदा का होईना प्रेम होतच. हे खुप ठिकाणी ऐकल आहे आपण. कमीत कमी एकदा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा प्रेम होवू शकत. हे माझ मत आहे. (खुपजण माझ्या ह्या मताशी सहमत नाही होणार पण काहीजण  नक्कीच सहमत होतील) असो.

माझ्या मते प्रेम हे नेहमी love at first sight च असत. बघायला गेल तर खुप सिंपल आहे. एखादी मुलगी आपल्याला बघताच क्षणी आवडते. तिचा चेहरा, तिचे डोळे, तिची स्माईल आपल्याला वेड करून जाते. आपल्याला तिचा स्वभाव, तिचे विचार ही माहीत नसतात. तरीही आपल्याला ती आवडते. (इथे काहीजण बोलतील की हे फ़क्त attraction आहे) तर मी अस म्हणेन की प्रेमाची पाहिली पायरी हे attraction च आहे. एकमेकांचे स्वभाव जाणून घेयला अख्ख आयुष्य पडलय हो.

खुप वेळा मैत्रीतून प्रेम तयार होत. एखादी मुलगी फ़क्त आपली मैत्रिण असते. आपण काही वेळ तिच्या सोबत घालवतो. तिचे विचार आपल्याला आवडतात, स्वभाव जुळतात आणि आपण प्रेमात पडतो. माझ्या मते एकमेकांना समजुन घेवुन नंतर प्रेम कसे करायचे?? (या वर तुम्ही बोलाल की नुसत प्रेम महत्वाच नाही, एकमेकां सोबत आयुष्य घालवायच आहे त्यासाठी स्वभाव, विचार जुळण गरजेच आहे.) तुम्ही जे बोलत आहात ते बरोबर आहे. पण माझ्या मते, प्रेमात पडल्यावर बघा स्वभाव च काय आहे ते. स्वभाव जुळतात म्हणून प्रेमात कसे पडायचे??? सगळ्या गोष्टी adjust करता येतात हो पण प्रेम नाही adjust करता येत.

आपल्याला प्रेम व्हायच असेल तर ते बघता क्षणीच होत. दूसरा कुठला way नाही प्रेम होण्यासाठी. म्हणून खुप विचार, दुनियादारी करून काही फायदा नाही. शांत रहा. आपल स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि महत्वाच म्हणजे आयुष्य एन्जॉय करा.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

.

Thursday, November 18, 2010

केवढा हा त्रास.....

कधी कधी लिहिण्यासाठी विषय सापडत नाही, कधी कधी एखादा विचार डोक्यात येतो आणि आपण लिहिण्यासाठी बसतो. तुमच्या रोजच्या आयुष्यात अशा खुप काही गोष्टी घडतात की ज्याचा तुम्हाला त्रास होतो. मग सहाजिकच आपण तत्वन्यानी बनतो, काही तत्व निर्माण करतो स्वताची की जेणेकरून होणारा त्रास कमी व्हावा. आपल्याला होणारया त्रासातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करावे लागतील ते आपण करावेत. पण बघायला गेल तर आयुष्यात येणारे हे प्रोब्लेम्स खुप मजेशीर असतात. शेवटी काय हो प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोण. (खुप झाली प्रस्तावना, आता जरा पाहुया काय प्रोब्लेम असतात ते) 

१. आपण  कामाला निघतो. कड़क इस्त्री केलेला शर्ट घालून ट्रेन मध्ये चढतो. उतरे पर्यंत त्या शर्ट चे जे काही हाल झालेले असतात ते आपल्यालाच पहावत नाही आणि ज्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी हे प्रयत्न केलेले असतात, ते एका क्षणात विफळ होतात. केवढा हा त्रास.

२. आपण कॉलेज ला जायला निघतो. नविन कपडे घातलेले असतात आणि पक्षी त्यावर आपले सकाळचे विधि उरकतात. काय अवस्था होत असेल आपली.

३. आपण बार मध्ये ड्रिंक्स घेत असतो आणि समोरच आपल्या ओळखिची एक व्यक्ति बसलेली असते.
(ती व्यक्ति बहुतेक वेळा आपल्या वडिलांच्या ओळखिचीच असते)

४. टपरीवर आपण सिगरेट मारत असतो आणि तेंव्हाच कोणतरी रिक्षातून आपल्याकडे बघत निघून जात.

५. जी मुलगी आपल्याला आवडत असते, तिला नेमक दुसर कोणतरी आवडत असत.

६. graduation, post-graduation करून ही, आयुष्य सेटल होई पर्यंत अर्ध आयुष्य निघून गेलेल असत.

७. ज्या मुलीशी आपल वाकड असत, ती अशी ना तशी आपल्या समोर येतेच.

८. वर्षभर काम करूनही appraisal चांगल मिळत नाही.

९. लग्न करताना प्रेम महत्वाच नाही, पैसा महत्वाचा आहे. भूतलावर बहुतेक सर्व लोकांनी हे मान्य केलेल आहे. (मग हुंडा मागणे हा गुन्हा का आहे???)

१०. ज्या मुलीवर आपल प्रेम असत, त्याच मुलीच्या मैत्रिणीच आपल्यावर प्रेम असत.

११. खिशात १००० रुपये असताना, खरेदी करताना आपल्याला २००० ची  जीन्स आवडते. (पण १००० रुपयात आपल्याला जीन्स आणि शर्ट दोन्ही खरेदी करायच असत हो)

१२. एखाद्या मुलीला तुम्ही आवडत असाल तरीही तुम्हीच तिला propose करावा असा तिचा अट्टाहास का???

१३. जी मुलगी तुम्हाला आवडते, ती दुसऱ्या कोणाची तरी प्रेयसी असते.

१४. ज्या दिवशी आपल्याला लवकर घरी जायच असत, त्याच दिवशी आपण उशिरा घरी येतो.

१५. मोबाइल वर काही महत्वाच बोलत असताना, मोबाइल स्विच ऑफ होणे, मोबाइल च नेटवर्क गायब होणे, मोबाइल मध्ये disturbance येणे, अशा गोष्टी घडतात.

खुप प्रोब्लेम सांगितले हो. अजुन ही बरेच असतील, आठवत नाहीत मला आता. हे एवढे प्रोब्लेम लिहून काढण्याचा सुद्धा केवढा हा त्रास.

चला निरोप घेतो, परत भेटूच.

अभिजीत  

Tuesday, November 16, 2010

मला तिला भेटायच आहे.....

मागचा महिना आणि दिवाळी चा पहिला आठवडा, मस्त मजा मस्ती चालू होती. एरव्ही पण असतेच हो पण दिवाळी म्हंटल की जरा जास्तच. आणि मित्र म्हंटले की मजा मस्ती आलीच हो. दिवाळी चा पहिला दिवस म्हणजे खुपच भारी दिवस. 

ह्यावेळे ही असच, सकाळी लवकर (म्हणजे ८ वाजता) आंघोळ उरकली आणि मित्रांना भेटायला राम मारुती रोड वर आलो. (मी ठाण्याला राहतो, आमच्या इथल खुप प्रसिद्ध ठिकाण) दिवाळी च्या पहिल्या दिवशी ठाण्यात राम मारुती रोड, तलावपाळी, कोपिनेश्वर मंदिर ह्या ठिकाणी तरुण वर्गाची जरा जास्तच गर्दी असते. मी ही त्याच गर्दीचा एक हिस्सा आहे. 
(विषयांतर होत आहे मी मूळ मुद्द्याकडे येतो)

मी राम मारुती रोड वर आलो. तिथे कुठल्यातरी एका संस्थेतर्फे एक band group आला होता. कुठली तरी नविन जुनी गाणी ते गात होते. गर्दी ही चांगली जमली होती. (कधी संपणार हो ही प्रस्तावना, मूळ मुद्द्या कडे येयच राहून जातय) 
(एकंदरीत तुमच्या डोळ्या समोर चित्र उभ राहिल असेल की, सकाळी ८-९ वाजताच थंड वातावरण, तरुण तरुणीनी भरलेला राम मारुती रोड, त्या band group च्या गाण्यांनी सजलेला आसमंत)

आम्ही नंतर कोपिनेश्वर मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला कारण आमचा एक मित्र आम्हाला तिथेच भेटणार होता. पण मुलीं वरून नजर काही हटत नव्हती. खुप सुंदर दिसत होत्या. (ज्या मुलीला नेहमी जीन्स आणि टीशर्ट मध्ये पाहिलेल असत, तिला साडी मध्ये पाहण्याची मजा काही औरच असते) मुली साडी परिधान करुनच खुप सुंदर दिसतात, माझ्या ह्या वाक्याशी सर्वजणच सहमत असतील. (खुप झाल, परत विषयाकडे याव)

मंदिरात जाण्यास आम्ही निघालो. वाटेवरच कूल कैंप नावाच आइसक्रीम पार्लर येत. आम्ही काही तिथे ब्रेक घेतला नाही. पण तिथे एका मुलीने माझ लक्ष वेधून घेतल. तिची सुंदरता मी शब्दात नाही व्यक्त करू शकणार. खुप सुंदर आहे दिसायला ती. तीच नाव मी इथे नाही घेणार. (ह्याच मुलीला मी एक आठवडया पूर्वी गोखले रोड वर तिच्या आई सोबत पाहिल होत) कूल कैंप ला ती मैत्रिणीं सोबत उभी होती.

तिथून आम्ही पुढे निघालो, ते थेट मंदिरातच आलो. अगोदरच उशीर झाला होता. आमचा मित्र वाट पाहून वेडा झाला होता. त्याला आलेला राग त्याच्या बोलण्यातुन प्रगट होत होता. थोड्यावेळाने काही जण मंदिरात दर्शनासाठी गेले आणि आम्ही  बाहेरच थांबलो. काही ओळखीचे चहरे दिसले, त्यांना भेटलो. कॉलेज च्या आठवणी ताज्या केल्या. निघण्या आधी फोटो बीटो काढले.बाहेर थांबायच कारण म्हणजे मुली पाहणे एवढच. (खुपच विषयांतर होत आहे, मंदिराचा हा प्रसंग घालण, हे काही एवढ महत्वाच नव्हत पण म्हंटल असू दे)

नंतर आम्ही जो मोर्चा वळवला तो पेटपूजे कडे. साईं कृपा मध्ये पेटपूजा करून झाली. नंतर आम्ही थेट आलो ते सिगरेट च्या टपरी वर. तिथे ठरल की गोलमाल ३ बघुया, म्हणून दोघे जण बाईक ने जावून टिकिट मिळतील की नाही ते पाहून आले. शो काही एवढे हाउसफुल नव्हते म्हणून दुसऱ्या दिवशी येवून टिकिट काढण्याचे ठरले. गेली २ वर्षे आम्ही दिवाळीत  मूव्ही पाहत आलेलो आहोत. चांगला असो वा बकवास, पहायचा नक्की. अनुभव काही चांगला नाही कारण मागच्या वर्षी 'blue' पहिला आणि त्याच्या आदल्या वर्षी 'om shanti om' पहिला. तुम्हाला सांगायला नको, काय आमची अवस्था झाली असेल ती. असो दुसऱ्या दिवशी आम्ही eternity ला आलो. टिकिट काढायच होत ना हो.

mall च्या campus मध्ये उभा होतो. मित्र बोलला, रिक्षातून जी उतरत आहे तिला बघ. बघतो तर काय. काल जिला आइसक्रीम पार्लर बाहेर पाहिल होत, तीच होती. २ आठवडयात ३ वेळा ती माझ्या समोर आली होती. एकदा गोखले रोड वर, दुसर्यांदा कूल कैंप आइसक्रीम पार्लर बाहेर आणि तिसर्यांदा eternity mall मध्ये. घरी गेल्यावर मी तीच फेसबुक प्रोफाइल शोधून काढल. (नाव माहीत असल्यामुळे ते सहजच सापडल) पण तिला काही मी friend request पाठवली नाही. साधारण १ महीन्या पूर्वी एका मित्राशी मी ह्या मुली बद्दल बोललो होतो. माझी काही अपूर्ण राहिलेली काम पूर्ण झाली की मला तिला भेटायच आहे. बघू, कस काय जमतय ते.

गोलमाल ३ विषयी सांगायच राहून गेल की हो. संध्याकाळच्या शो च टिकिट काढल. मूव्ही म्हणाल तर फुल ऑन टाइमपास  आहे. डोक बाजूला ठेवा आणि मूव्ही एन्जॉय करा. (मी काही इथे गोलमाल ३ ची advertisement  नाही करत आहे)

चला निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 

Wednesday, November 10, 2010

सर्वसामान्य माणूस

मागचा १ महिना काही लिखाण झाल नाही. वाटायच लिहावस पण काही विषय मिळत नव्हता. आणि आज ही असा काही महत्वाचा विषय नाही. आयुष्यात महत्वाच अस काही घडतच नाही आहे. तस बघितल तर सर्व सामान्यांच्या आयुष्यात काय महत्वाच घडत अस??? शेतात राबणारया शेतकरया पासून ते औद्योगिक शहरात काम करणारया नोकरदार वर्गापर्यंत. काय आहे आपल आयुष्य???

शेतकरी शेतात राबराब राबतो, मेहनत करतो, पिक काढतो पण किती किंमत भेटते त्याला त्या पिकाची??? (श्रीमंत शेतकर्यां बद्दल मी इथे बोलत नाही आहे.) आपल्याकडे गरीब शेतकर्यांची संख्या जास्त आहे हो. त्यांना एक चांगल आयुष्य जगण्याचा अधिकार नाही आहे का?? मी आजकल खुप लोकांकडून ऐकतो की गावाकडच आयुष्य खुप सुंदर. गावाकडच निसर्ग सौंदर्य अप्रतिम. कामातून निवृत्त झालो की गावाला जावून राहणार, वगैरे. पण तिथे जावून कोणी आपल्याला त्यांच्या सारख खडतर आयुष्य जगण्यास सांगितल तर आपण जावू का???

औद्योगिक शहरात काम करणारा नोकरदार वर्ग. गावतल्या लोकांना खुप अप्रूप असत शहराच. पण शहरातले लोक काय आयुष्य जगत आहेत हो??? आपण किती तास काम करायचे, हे इथे कोणी पाळत नाही. सकाळी कामावर जाण्याची वेळ फिक्स, पण घरी येण्याची??? (काही सरकरी कार्यालय सोडली तर सगळयांची परिस्थिति हीच आहे.) आम्ही कमवण्यासाठी जगतो का जगण्यासाठी कमावतो??? हाच प्रश्न आहे. महिना आखेर एक फिक्स रक्कम घरात येते. त्या तुटपुंज्या रकमेतून, किती गोष्टी आपल्याला करायच्या असतात. बिल्स भरण्यापासून ते राहत्या घराचे हफ्ते भरे पर्यंत. तुमची मजा मस्ती तर राहिलीच बाजूला. मग का हा एवढा खटाटोप??? तुम्ही बोलाल की आज आमचे पगार वाढले आहेत. आम्ही जास्त खर्च करू शकतो. पण खर्च करण्यासाठी असा कितीसा वेळ तुमच्याकडे असतो??? असे किती जण आहेत की जे work satisfaction म्हणून काम करतात?? सोमवार ते शुक्रवार घासायची आणि वीकेंड ला ढोसायची. (दारू पिणे हा ही enjoyment चा भाग आहे शेवटी, खुप लोक सहमत होतील माझ्या ह्या वाक्याशी.) शेवटी काय हो, कमवण्यासाठी जगत आहोत आपण. खरच आयुष्य एन्जॉय करण विसरलो आहोत आपण.

आपल्याला अशा जगण्याची एवढी सवय झाली आहे की, आयुष्य हे असच असत. हा आपला समज झाला आहे. शेवटी  सर्व सामान्य माणस ही पदवी आपल्याला बहाल केली गेली आहे. ह्या चाकोरी बाहेर या. आयुष्य एन्जॉय करा.

अभिजीत 

Saturday, September 18, 2010

काही क्षण.....

२ आठवडया पूर्वी बँकेत गेलो होतो, थोड काम होत. बँकेची स्लिप भरली आणि रांगेत उभा राहिलो. महिन्याचा पहिलाच आठवडा होता, बँकेत खुप गर्दी होती. सगळी pensioners माणस रांगेत उभी होती. गर्दी पाहून विचार केला की जावू दे नंतर येवू कधीतरी. पण आई ने सांगितलेल काम होत म्हणून गप्प उभा राहिलो रांगेत. साधारण माझा ११ वा किंवा १२ वा नंबर होता. काउंटर वर बसलेली बाई एवढ्या सावकाश काम करत होती, वाटल आज हयानां कंप्यूटर दिले आहेत तरी ही एवढा वेळ लागतो, मग काय फायदा, त्या पेक्षा जुन्या पद्धतीनेच काम करा ना, कशाला हवेत computers. जावून दे हा काही माझा मुददा नाही बोलायचा. रांग एकदम सावकाश पुढे सरकत होती. स्वतःशीच बोलत होतो, काय कराव आता?? वेळ पण काही जात नाही. मग उगाचच इकडे तिकडे पाहू लागलो. तेंव्हा माझ सहजच लक्ष गेल.

माझ्या पुढे १,२ माणस सोडून, एक मुलगी आणी तिच्या पुढे एक मुलगा उभा होता. तो अशा direction मध्ये उभा होता की त्या मुलीला पाहू शकेल. आणि मित्रांनो ह्या मुलाने काउंटर वर त्याचा नंबर येई पर्यंत एकदाही काउंटर कडे वलून बघितल नाही. त्या मुलीला कस इम्प्रेस कराव ह्याच प्रयत्नात तो लागला होता. त्याच्या एखाद दुसरया कमेन्ट वर ती मुलगी हसायची आणि त्याला positive response देयची. म्हणून तो ही खुश होता. तिच्याकडे direct बघता येण शक्य नव्हत म्हणून जस होइल तस तो तिच्या डोळ्यात पहाण्याचा प्रयत्न करत होता. त्याची ही धडपड एखादवेलेस तिला ही समजत होती. म्हणून ती ही smile करून त्याला प्रत्युत्तर देत होती. त्या मुलीची आई, तिथेच एका बाकड्यावर बसली होती. ती ही अधून मधून आपल्या मुली कडे पाहत होती. मधेच मुलगी ही मागे वलून पहायची की आई काय करत आहे. पण त्या मुलाला कोणाचीच काही पडली नव्हती. त्याने आपले प्रयत्न चालूच ठेवले. हे सगळ पाहत असताना, मला एक सुंदर आवाज कानावर आला.

एक मुलगी आणि कोणतरी तिची मैडम माझ्याच रांगेत पाठी उभ्या होत्या. ती मुलगी (तिच्या मैडमशी) बोलत होती की, आज एवढी गर्दी कशी काय??? मी मागे एकदा जेंव्हा आली होती, तर लगेचच माझा नंबर लागला होता. आज खुपच गर्दी आहे. मी एक काम करते, आपण दोघी एकाच रांगेत उभ राहण्यापेक्षा, मी बाजुच्या रांगेत उभी राहते. अस म्हणून ती माझ्या बाजूच्याच रांगेत आली. बाजुच्या रांगेत ती माझ्या थोड पुढे उभी होती. आता पर्यंत तर फ़क्त मी तिचा आवाज ऐकत होतो. पण मागे वलून पाहण्याच साहस काही माझ्याने होत नव्हत. पण आता ती माझ्या पुढेच उभी होती त्यामुले तिला पाहता येण खुप सोप झाल होत.

मी जेंव्हा तिला पाहिल, तर पहातच राहिलो. खुप सुंदर होती दिसायला. शब्दात वर्णन नाही करू शकणार मी. अस समजा की त्या बँकेत कोणी एक सुंदर मुलगी आहे तर ती हीच आहे. मनात विचार येउन गेला की ही माझी प्रेयसी झाली तर. पण ओळख कशी करणार हो मी तिच्याशी???  मागे तिच्या मैडम उभ्या होत्या. बोलायच झाल तरी बोलणार कस?? मी तिच्याकडे पाहत आहे, हे तिला कळल. म्हणून तिने ही एकदा माझ्याकडे पाहिल. तिने बघून न बघितल्यासारख केल. मी ही असच केल. पण थोड्या वेळाने कधी मी तिच्याकडे पाहत होतो तर कधी ती माझ्याकडे. त्या वेळच्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. खुप भारी फीलिंग असत हे, अनुभवण्यात मजा आहे, सांगण्यात नाही.

या सगळ्यात, वेळ कसा निघून गेला कळल नाही. माझा नंबर आला काउंटर वर. मी त्या मैडम ला स्लिप दिली, asusual बराच वेळ घेतला तिने. बैंक मधल काम संपवून मी बाहेर पडलो. माझ एका xerox च्या दुकानात पण काम होत. ते संपवून मी येत असताना, ती मला पुन्हा दिसली. या वेळेस ती एकटी होती. मी तिच्याकडे पाहिल पण तीच काही लक्ष नव्हत. खुप घाईत होती ती. मी तिला पास ऑन झालो आणि घरी येण्याचा मार्ग पकडला.

आज जेंव्हा मी विचार करतो, तेंव्हा मला अस वाटत, समजा त्या वेळेस मी बैंक मधली गर्दी पाहून तिथून निघालो असतो तर या सर्व क्षणांना मला मुकाव लागल असत. चला मित्रांनो निरोप घेण्याची वेळ आली, परत लवकर भेटूच.

अभिजीत

Tuesday, August 24, 2010

जन्म, मृत्यु आणि प्रवास

आपल्या जीवनाचे तीन मुख्य अविभाज्य घटक, जन्म, मृत्यु आणि प्रवास. आपल जीवन हे या तीन घटकां मध्येच आहे. मी जेंव्हा विचार करतो, तेंव्हा मला अस वाटत की आपल जीवन हे एका बोगद्या (tunnel) सारख आहे. जिथे एका बाजूने आत येयच आणि दुसरया बाजूने बाहेर पडायच. आणि ह्या दोन टोकांमधल अंतर म्हणजे एक प्रवास.

आता आपण थोड सविस्तर बोलूया. थोडा वेळ समजा, हा बोगदा म्हणजे आपल जीवन. एका बाजूने आत येयच म्हणजे, जन्माला येण. आणि दुसरया बाजूने बाहेर पडायच म्हणजे, मृत्युला सामोर जाण. जन्म आणि मृत्यु या दोहोंमधल अंतर म्हणजे आपल्या जीवनाचा प्रवास. आणि ह्या प्रवास मधे कुठे थाम्बण (stop), हा पर्याय नाही. (there are no signals in tunnel, so you can't stop).

जीवन हे असच आहे, एका नदी सारख. नदी जशी डोंगर खोर्यात उगम पावते, पुढे आपल्या मार्गात येणारा प्रत्येक प्रदेश सुपिक बनवते आणि शेवटी सागरात विलीन होते. तसच आपल जीवन आहे. जन्म, प्रवास आणि मृत्यु. नदीच पाणी हे नेहमी वाहत असत,  तसच जीवनाच्या ह्या प्रवास मधे कुठे थाम्बण (stop) हा पर्याय नसतो.

मला एवढच कळत की, आपण कोणी अंतर्यामी नाही. जन्माला कसे आलो माहीत नाही. मृत्यु कधी होणार माहीत नाही. आपली स्वप्नं पूर्ण होणार की नाही माहीत नाही. स्वप्नं पूर्ण होण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आपल्या कडून होणार आहेत की नाही हे ही आपल्याला माहीत नाही. (पण मला अस वाटत की, स्वप्न पूर्ण करण हे कधी नसतच, स्वप्न हे आयुष्यभर जगण हेच असत). इथे कुठल्याच गोष्टीची शाश्वती नाही. मग अशी कुठली गोष्ट आहे, जी आपल्याला प्रेरीत करत आहे. आपण आशावादी आहोत आणि पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहीत नाही. हेच उत्तर आहे यावर. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण कटपुतली आहोत आणि सर्व काही pre-planned आहे. म्हणून जास्त विचार करू नका, तुमच्या स्वप्नासाठीच तुम्ही इथे आला आहात असा विचार करून शांतपणे आपल काम करत रहा आणि लाइफ full-on जगा.

चला आता मी निरोप घेतो तुमचा, परत लवकर भेटूच.

अभिजीत

Thursday, August 19, 2010

Friends.....there is no substitute for them.....

आपण खुप वेळा खुप विषयावर लिहित असतो पण जे आपल्या जवळचे आहेत, त्यांच्या साठी कधी लिहितो का ? खुप वेळा आपण त्यांना गृहीत धरतो (take it for granted ). आपण विचार करतो, आपलेच आहेत, नाही लिहिल तरी काय फरक पडतो ??? पण कधीतरी त्यांचे आभार व्यक्त करण गरजेचे आहे, कारण ते नसतील तर आपले जीवन अपूर्ण आहे.

माझी फ्रेंड लिस्ट पहिली तर खुप मोठी आहे, (बघायला गेल तर प्रत्येकाची फ्रेंड लिस्ट ही मोठीच असते). १) काही फ्रेंड (हाय, हेल्लो) वाले असतात. २) काही नेहमीच्या contact मधले, (म्हणजे ऑरकुट, फेसबुक, chat ) वरचे असतात. ३) आणि काही (take it for granted ) वाले असतात. 3rd लिस्ट मधले 2nd लिस्ट मधे ही असतात. काही आयुष्यभर तुमच्यासोबत असतील, काही मधेच सोडून जातील.  पण त्या व्यक्तीची कहिनाकाही खास भूमिका तुमच्या आयुष्यात असते.

अशाच काही व्यक्तिंबद्दल आज मी बोलणार आहे :-
सतीश : माझा शाळेत असल्यापासुनाचा मित्र. कोणालाही न घाबरता, लाइफ एन्जॉय करतो. (पण शाळेत असताना खुप शांत होता, आता कोणाला ऐकत नाही भाई)
विजय : कॉलेज मित्र.  नेहमी विचार करून बोलणारा माणूस. पण अजुन ही struggle चालू आहे (विचारांशी).
प्रेमळ : कॉलेज मित्र. प्रत्येक गोष्ट बजेट मधे बसवाणारा माणूस. मित्रांचा मित्र. पण struggle आज ही चालू आहे.
वैभव : कॉलेज मित्र. खुप struggle केल आहे भाई ने. आज एकदम भारी लाइफ जगत आहे.
सुयोग : कॉलेज मित्र. नेहमी एक शिस्तबद्ध लाइफ जगणारा. जे आहे त्यात समाधानी.
मनोज : कॉलेज पासुनाचा मित्र. खुप कमी बोलतो. स्वताच्या तत्वांवर लाइफ जगणारा.
नारायण : कॉलेज मित्र. खुप कमी बोलतो हा भाई. शांतपणे आपली लाइफ जगणार हा.
शकील : ऑफिस मित्र. ह्याने  खुप struggle केली आहे लाइफ मधे, आज सेटल आहे.
गणेश : ऑफिस मित्र. स्वभावाने खुप चांगला, (down to earth person).
दीप्ती : कॉलेज मधली पहिली मैत्रिण. आज सेटल आहेत बाई.
कामिनी : कॉलेज मैत्रिण. कॉलेज व्यतिरिक्त भेटण नव्हत. पण एक चांगली मैत्रिण.
क्रांति : कॉलेज मैत्रिण. आज ही तीच हसण आठवत. माहीत नाही आज ही कुठे आहे.
राशी : कधी बोललो नाही तरी ही आठवणीत आहे कुठे तरी.
स्नेहल : कॉलेज मैत्रिण. कॉलेज व्यतिरिक्त भेटण नव्हत. एक चांगली मैत्रिण.
स्मिता : कॉलेज मैत्रिण. ८ वर्ष जुनी मैत्री.  हिचा struggle आज ही चालू आहे.. :-)
वंदना (senior) : कॉलेज मैत्रिण. तिचा हसरा चेहरा आज ही समोर आहे. खुप चांगली मैत्रिण. आज सेटल आहे.
मानसी : कॉलेज मैत्रिण.  खुप चांगली मैत्रिण. आज सेटल होण्याच्या मार्गावर आहे.
ह्रिषिता (hrishita) : ऑरकुट फ्रेंड. कधी भेटलो नाही. पण ही आज (ohio university) मधे शिकत आहेत.( I miss her ) :-)
अनुराधा : ऑरकुट फ्रेंड. खुप चांगली मैत्रिण. पुण्याला एकदा तिला भेटलो होतो.
स्नेहल : ऑरकुट फ्रेंड. खुप चांगली मैत्रिण.
श्रद्धा : ऑरकुट फ्रेंड. friends हेच तीच लाइफ.
युगा : ऑरकुट फ्रेंड. डोळ्यात काही स्वप्न सजवली आहेत, पूर्ण व्हावी ही इच्छा.
प्रिया : जॉब वर असताना ओळख झाली होती. ५ वर्ष जुनी मैत्री, खरच एक खुप चांगली मैत्रिण.
जुली :  जॉब वर असताना ओळख झाली होती. खुप छान गाते.
प्रांजलि : जॉब वर असताना ओळख झाली होती. एक चांगली मैत्रिण.

ह्यातले सर्वच जण काही माझ्या संपर्कात नाहीत. काही जणांचा उल्लेख करायला मी विसरलो ही असेन. But there is no substitute for friends. भविष्यात आपण कुठल्याना कुठल्या वळणावर परत भेटूच.

अभिजीत