आपण खुप वेळा खुप विषयावर लिहित असतो पण जे आपल्या जवळचे आहेत, त्यांच्या साठी कधी लिहितो का ? खुप वेळा आपण त्यांना गृहीत धरतो (take it for granted ). आपण विचार करतो, आपलेच आहेत, नाही लिहिल तरी काय फरक पडतो ??? पण कधीतरी त्यांचे आभार व्यक्त करण गरजेचे आहे, कारण ते नसतील तर आपले जीवन अपूर्ण आहे.
माझी फ्रेंड लिस्ट पहिली तर खुप मोठी आहे, (बघायला गेल तर प्रत्येकाची फ्रेंड लिस्ट ही मोठीच असते). १) काही फ्रेंड (हाय, हेल्लो) वाले असतात. २) काही नेहमीच्या contact मधले, (म्हणजे ऑरकुट, फेसबुक, chat ) वरचे असतात. ३) आणि काही (take it for granted ) वाले असतात. 3rd लिस्ट मधले 2nd लिस्ट मधे ही असतात. काही आयुष्यभर तुमच्यासोबत असतील, काही मधेच सोडून जातील. पण त्या व्यक्तीची कहिनाकाही खास भूमिका तुमच्या आयुष्यात असते.
अशाच काही व्यक्तिंबद्दल आज मी बोलणार आहे :-
सतीश : माझा शाळेत असल्यापासुनाचा मित्र. कोणालाही न घाबरता, लाइफ एन्जॉय करतो. (पण शाळेत असताना खुप शांत होता, आता कोणाला ऐकत नाही भाई)
विजय : कॉलेज मित्र. नेहमी विचार करून बोलणारा माणूस. पण अजुन ही struggle चालू आहे (विचारांशी).
प्रेमळ : कॉलेज मित्र. प्रत्येक गोष्ट बजेट मधे बसवाणारा माणूस. मित्रांचा मित्र. पण struggle आज ही चालू आहे.
वैभव : कॉलेज मित्र. खुप struggle केल आहे भाई ने. आज एकदम भारी लाइफ जगत आहे.
सुयोग : कॉलेज मित्र. नेहमी एक शिस्तबद्ध लाइफ जगणारा. जे आहे त्यात समाधानी.
मनोज : कॉलेज पासुनाचा मित्र. खुप कमी बोलतो. स्वताच्या तत्वांवर लाइफ जगणारा.
नारायण : कॉलेज मित्र. खुप कमी बोलतो हा भाई. शांतपणे आपली लाइफ जगणार हा.
शकील : ऑफिस मित्र. ह्याने खुप struggle केली आहे लाइफ मधे, आज सेटल आहे.
गणेश : ऑफिस मित्र. स्वभावाने खुप चांगला, (down to earth person).
दीप्ती : कॉलेज मधली पहिली मैत्रिण. आज सेटल आहेत बाई.
कामिनी : कॉलेज मैत्रिण. कॉलेज व्यतिरिक्त भेटण नव्हत. पण एक चांगली मैत्रिण.
क्रांति : कॉलेज मैत्रिण. आज ही तीच हसण आठवत. माहीत नाही आज ही कुठे आहे.
राशी : कधी बोललो नाही तरी ही आठवणीत आहे कुठे तरी.
स्नेहल : कॉलेज मैत्रिण. कॉलेज व्यतिरिक्त भेटण नव्हत. एक चांगली मैत्रिण.
स्मिता : कॉलेज मैत्रिण. ८ वर्ष जुनी मैत्री. हिचा struggle आज ही चालू आहे.. :-)
वंदना (senior) : कॉलेज मैत्रिण. तिचा हसरा चेहरा आज ही समोर आहे. खुप चांगली मैत्रिण. आज सेटल आहे.
मानसी : कॉलेज मैत्रिण. खुप चांगली मैत्रिण. आज सेटल होण्याच्या मार्गावर आहे.
ह्रिषिता (hrishita) : ऑरकुट फ्रेंड. कधी भेटलो नाही. पण ही आज (ohio university) मधे शिकत आहेत.( I miss her ) :-)
अनुराधा : ऑरकुट फ्रेंड. खुप चांगली मैत्रिण. पुण्याला एकदा तिला भेटलो होतो.
स्नेहल : ऑरकुट फ्रेंड. खुप चांगली मैत्रिण.
श्रद्धा : ऑरकुट फ्रेंड. friends हेच तीच लाइफ.
युगा : ऑरकुट फ्रेंड. डोळ्यात काही स्वप्न सजवली आहेत, पूर्ण व्हावी ही इच्छा.
प्रिया : जॉब वर असताना ओळख झाली होती. ५ वर्ष जुनी मैत्री, खरच एक खुप चांगली मैत्रिण.
जुली : जॉब वर असताना ओळख झाली होती. खुप छान गाते.
प्रांजलि : जॉब वर असताना ओळख झाली होती. एक चांगली मैत्रिण.
ह्यातले सर्वच जण काही माझ्या संपर्कात नाहीत. काही जणांचा उल्लेख करायला मी विसरलो ही असेन. But there is no substitute for friends. भविष्यात आपण कुठल्याना कुठल्या वळणावर परत भेटूच.
अभिजीत
No comments:
Post a Comment