Thursday, August 5, 2010

एक आठवण

खुप दिवस काही लिखाण झाल नाही. विचार केला आज एक तरी पोस्ट टाकुया. आज एका प्रवासताला प्रसंग तुम्हाला सांगणार आहे. साधारण २ वर्षा पुर्वीचा प्रसंग आहे.


मी आणि वडिल महाड (माझे गाव) ला चाललो होतो त्या वेळेचा. ठाणे (खोपट) वरून  सकाळी ६.४५ ची ठाणे-महाबलेश्वर एस. टी. पकडली. रिज़र्वेशन आधीच केले होते. म्हणून काही प्रोब्लेम झाला नाही. पण मला हा प्रवास काही आवडत नाही, गावा ला जायचे म्हणजे मला खुप बोर होते. पण या वेळेस जाण भाग होत. प्रवास बोरिंग असल्यामुळे मी झोप काढायच ठरवल. साधारण रामवाडी ला मला जाग आली. बस स्टॉप ला आम्ही उतरलो, आणि चहा घेतला. थोड़े पाय मोकळे केले आणि बस मध्ये जाउन बसलो. अजुन अर्धा प्रवास बाकि होता. वेळ जात नव्हता, परत ठरवून झोपायचा निर्णय घेतला. कधी संपणार हा प्रवास हाच विचार करत झोपून गेलो. शेवटी मला जाग आली ती इंदापूर ला. गाडी फ़क्त १० मिनिटे थाम्बनार होती, म्हणून गाडीतच बसून राहिलो. प्रवास आता थोडाच राहिला आहे, हे स्वताला समजावत होतो. लोक एक सारखे गाडीत चढत होते, त्या ड्राईवर ला पण काही घाई नव्हती, कोणाची वाट पाहत होता, ते त्यालाच ठावुक. थोड्या वेळाने २ मुली बस मध्ये चढल्या आणि ह्या माणसाने गाडी चालू केली. बहुतेक हा त्या २ मुलींची च वाट पाहत होता...:) मनातल्या मनात शिव्या घातल्या आणि गप्प बसलो.


पण पुढे जे घडल ते खुप भारी होत. जी पहिली मुलगी आत आली, तिच्या बद्दल मी काय सांगू?? खुप सुंदर होती दिसायला आणि तेवढीच साधी ही. दोन क्षण पहातच राहिलो मी. एवढी सुंदर असून ही, त्याचा गर्व नाही तिला. तिने yellow कलर चा पंजाबी ड्रेस घातला होता आणि स्पेक्ट्स. एका हातात पुस्तके आणि दुसरया हातात बेग. ह्या सगळ्या गोष्टी सावरत ती बसण्या साठी जागा शोधत होती.  मी देवाची प्रार्थना करत होतो की ही माझ्या बाजुच्या सीटवर येवून बसावी. एखाद वेळेस देवाने माझे ऐकल असेल, कारण आमच्याच बाजुच्या रांगेतील सीटवर तिला जागा मिळाली. आमच्या दोघा मध्ये साधारण १ फुटाच अंतर होत. मनातल्या मनात मी खुप खुश होतो. जे पाहिजे ते घडल होत.


तिच्याशी बोलता येण काही शक्य नव्हत, कारण बाजूला वडील बसले होते. काय करू, काही कळत नव्हत. परत कधी ती मला भेटेल माहीत नव्हत. आमच्या दोघात जे काही होत, ते त्या एका क्षणासाठी होत. मी माझा मोबाइल काढला, मोबाइल स्क्रीन वर माझा नंबर टाइप केला आणि तिला दिसेल असा ठेवायचा प्रयत्न केला, पण सगळ व्यर्थ.  नंतर मी माझे सर्व प्रयत्न थाम्बवले. आता फ़क्त मी तिला पाहत होतो. बोरिंग करणारा हा प्रवास आता कधी संपू नये अस वाटत होत. लवकरच लोणेर फाटा आला (लोणेरच्या इंजीनीरिंग कॉलेज ची स्टुडेंट होती ती)  आणि ती बस मधून उतरली. मी फ़क्त तिला जाताना पाहत राहिलो.


प्रवास पुन्हा एकदा सुरु झाला. तो चेहरा पुन्हा पुन्हा दिसत होता. प्रवासाचा क्षीण कधीच निघून गेला होता, आता फ़क्त तिच्या आठवणी  होत्या. तेवढ्यात महाड आल आणि आम्ही उतरलो. आज तिचा चेहरा धूसर दिसत आहे, पण आठवणी मध्ये ती अजुन ही कुठे तरी आहे.


अभिजीत

No comments:

Post a Comment