आज ३१ डिसेंबर २०१०, वर्षाचा शेवटचा दिवस. तुम्ही आज पर्यंत माझ्या ब्लॉग ला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुम्हा सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना येणारे वर्ष समाधानाचे, समृद्धिचे, आनंदाचे जावो.
ह्या वर्षाचा शेवटचा ब्लॉग मी पब्लिश केला आहे. ही एक कविता आहे. "उरले काही तास शेवटचे....."
चला, निरोप घेतो. परत भेटूच.
अभिजीत
Friday, December 31, 2010
Thursday, December 30, 2010
रेस्टोरेंटमधली पहिली भेट.....
अजुन अशीच एक आठवणीतली मैत्री. आठवणीतली एक मैत्री हा ब्लॉग जेंव्हा मी लिहित होतो तेंव्हा अशा बर्याच व्यक्ति माझ्या डोळयासमोर आल्या. त्यातलीच ही एक व्यक्ति.
दोन अडीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळेस मी खुप मुलींना ऑरकुट वरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या होत्या. प्रतिसाद ही चांगला भेटला. त्याप्रमाणे पुष्कळशा मुली अकाउंटला add ही झाल्या. काहीजणी चांगल्या मैत्रिणी बनल्या. काहीजणी कालांतराने निघून गेल्या. काही चांगल्या मैत्रिणी पैकी ही एक. आम्ही दोघे एकाच शाळेतले, म्हणून तिने माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली होती. कालांतराने फ्रेंडशिप वाढत गेली. मोबाईल नंबर एक्सचेंज झाले. जी-टॉक वरती तिने तिचा फोटो ही दाखवला. पण फोटो दाखवताना केवढे नखरे केले असतील तिने, काय सांगू तुम्हाला. स्वतः चा फोटो दाखवताना कशाला एवढे नखरे करायचे हे कळत नाही मला. असो. तो ज्याचा त्याचा प्रश्न.
कालांतराने आम्ही भेटण्याच ठरवल. त्याप्रमाणे गोखले रोड वरती असलेल्या अमृता रेस्टोरेंट मध्ये आम्ही भेटलो. काय आर्डर केल असेल हे तुम्हाला कळलच असेल. अमृताची स्पेशालिटी पाव-भाजी आहे की हो. मग तेच मागवल. साधारण एक दिड तास आम्ही तिथे होतो. गप्पा मारल्या, मजा केली. पहिल्यांदाच भेटलो होतो पण बोलताना एकदम कम्फर्टेबल होती ती. तिच्या सोबत वेळ कसा गेला कळल नाही.
ह्या मैडम ने आपल्या आई ला सांगितल होत की, ती मला ह्या ह्या ठिकाणी ह्या ह्या वेळेला भेटणार आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटल. कारण माझ्या अनुभवानुसार मुली अस काही सांगत नाहीत घरात. असो. आज ही आम्ही एकमेकांच्या contact मध्ये आहोत. सध्या तिने C.A. ची फायनल वर्षाची परीक्षा दिली आहे. खुप मेहनती आहे. down to earth person. C.A. होण हे तीच स्वप्न आहे, ते पूर्ण होवो ही इच्छा.

Tuesday, December 28, 2010
८ वर्ष जुनी मैत्री.....
काल एका मैत्रिणीकडे सत्य नारायणाच्या पूजेसाठी गेलो होतो. पोहचायला तसा उशीरच झाला होता. पण एकंदरीत सर्व कार्यक्रम तसा चांगला पार पडला. घरी येयला रात्रीचा १ वाजला. माझी झोपायची वेळ साधारण हीच आहे. पण झोप काही येत नव्हती. तिच्या सोबत घालवलेले काही क्षण, कॉलेज चे ते दिवस आठवले आणि मन आठवणी मध्ये रमत गेल.
८ वर्षापूर्वी कॉलेज नवरंग ला आमची ओळख झाली होती. तेंव्हा पासून आम्ही ओळखतो एकमेकांना. ग्रेजुएशनची शेवटची ३ वर्ष ती कोल्हापुरला होती. पण आज ही ते नवरंग चे दिवस आठवले की हसायला येत. खुप धमाल केली होती. सुरवातीचे काही दिवस आम्ही खुप कमी बोलायचो. कालांतराने फ्रेंडशिप वाढत गेली. पण फ्रेंडशिप समजण्याच, वाढवण्याच, निभवण्याच ते वय ही नव्हत. साधारण १ वर्षा नंतर ती कोल्हापुरला निघून गेली.
इकडे मी माझ्या लाइफ मध्ये बिझी झालो आणि ती तिकडे तिच्या लाइफ मध्ये. खुप कमीवेळा भेटलो आहोत आम्ही आजपर्यंत. शेवटी काय हो मी कधी कोणाला फोर्स नाही करत भेटण्यासाठी. मला एवढच वाटत की, समोरच्या व्यक्तीला मनापासून वाटत असेल तरच त्या व्यक्तीने मला भेटाव. असो. कालांतराने तीच ग्रेजुएशन पूर्ण झाल. ती मुंबईला परत आली. फिरण्याची खुप आवड या मैडम ना. ठाणे, पुणे, कोल्हापुर सारख्या फिरतीवर असतात. आता गेली २ वर्ष मुंबईतच आहेत. तेंव्हा आता आमच भेटण होत.
ग्रेजुएशन पूर्ण झाल्यावर तिने तीच पोस्ट ग्रेजुएशन पुण्यातून केल. आता पर्यंत आमच्याकडे मोबाईल आले होते. आता संपर्कात राहण जरा जास्त सोयीस्कर झाल होत. पुणे ते ठाणे तासनतास गप्पा मारल्या आहेत आम्ही, कधी सीरियस तर कधी एखाद्या गंमतीदार टॉपिकवर. कधी भांडलो आहोत तर कधी एकमेकांना समजुन घेतल आहे. जे काही क्षण एकत्र घालवले ते स्मरणात राहिले. गेली ८ वर्ष ना ती कधी माझ्या वाढदिवसाच्या पार्टीला आली ना कधी मी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलो. पण जेंव्हा जेंव्हा आम्ही भेटलो तेंव्हा तेंव्हा फुल ऑन एन्जॉय केल. मग ते एखाद्या होटेल मधल डिनर असो वा एखाद्या mall मध्ये बसून मारलेल्या वायफळ गप्पा असोत.
आज जेंव्हा मी तिच्याकडे पाहतो तेंव्हा मला खुप बर वाटत. कारण आयुष्य कस जगायच आहे हे तिला समजतय. गरज पडली तर ठामपणे ती निर्णय घेवु शकते. हल्ली आम्ही सहसा मोबाईल वर बोलत नाही. कधी भेटलो तर बोलण होत. पण तीच आणि माझ बोलण म्हणजे खुप मजाक मस्ती आणि खुप कमीवेळा सीरियस.

Monday, December 27, 2010
आज वो मंझर भी कुछ धुंदला सा है.....
उसका चेहरा कुछ धुंदला सा है
उसकी यादे भी कुछ धुंदली सी है
पता नही किस मोड़ पे वो मिली थी मुझे
आज वो मंझर भी कुछ धुंदला सा है.
अभिजीत
उसकी यादे भी कुछ धुंदली सी है
पता नही किस मोड़ पे वो मिली थी मुझे
आज वो मंझर भी कुछ धुंदला सा है.
अभिजीत
रात का नशा अभी ढला नही.....
रात का नशा अभी ढला नही
प्यार का खुमार अभी छाया नही
रोज आती तो है वो सपनों में
पर प्यार का इजहार अभी हुआ नही.
अभिजीत
प्यार का खुमार अभी छाया नही
रोज आती तो है वो सपनों में
पर प्यार का इजहार अभी हुआ नही.
अभिजीत
Friday, December 24, 2010
आठवणीतली एक मैत्री.....
उद्या २५ डिसेंबर नाताळ. २ वर्षापूर्वी ह्याच दिवशी एका मुलीला मी तलावपाळी ला भेटलो होतो. भेट काही जाणून बुजुन घडवून आणली नव्हती. अचानकपणे आम्ही एकमेकां समोर आलो होतो. पहिल्यांदाच समोरा समोर बोलणही झाल. मी हिला २ वर्षापूर्वी भेटलो हे खर पण ह्याची सुरवात साधारण त्याच्याही ६ महीने अगोदर झाली होती.
त्या वेळेस ऑरकुट खुप प्रसिद्ध होत. खुप जणांची फ्रेंडशिप जमवून देण्यात ऑरकुट चा हातखंडा होता. मी ही एकदा माझ ऑरकुट प्रोफाइल चेक करत होतो. तेंव्हा एका मुलीच प्रोफाइल मला चांगल वाटल. मी तिला add request पाठवली. तिने ही जास्त आढेवेढे न घेता request एक्सेप्ट केली. वरचेवर एकमेकांना स्क्रैप पाठवण चालू झाल. फ्रेंडशिप वाढू लागली. काही दिवसांनी g-talk ला आम्ही एकमेकांना add केल. आणि बऱ्या पैकी बोलण चालू झाल. तासनतास बोलत बसलो आहोत आम्ही chat वर. विषय कसे सापडायचे माहीत नाही. पण बोलायला बसलो तर विषयांची कमी नसायची. तिचा नेहमी एकच विषय असायचा बोलताना आणि तो म्हणजे फ्रेंडशिप. तिच्यासाठी फ्रेंडशिप म्हणजे सर्वकाही. करीअर, फॅमिली, स्वतःच्या आयुष्या पेक्षा ही जास्त महत्त्व फ्रेंडशिप ला. मला थोड आश्चर्य ही वाटायच आणि थोडा राग ही येयचा. अस वाटायच की तिला स्वतःच अस्तित्व अस काही नाही. मित्र मैत्रिणी बोलतील तेच तीच लाईफ. कोणीही तिचा फायदा घेवु शकत. कोणीही तिला हर्ट करू शकत. तरीही या मैडम शांतच राहणार. खुप समजवायचो. काही गोष्टी तिला समजल्या, काही अनुभवाने समजल्या. शेवटी काय हो काळ सगळयांना शिकवतोच की. २ वर्षा पूर्वीची ती आणि आजची ती.....ह्या मध्ये खुप फरक आहे.
एकदिवशी आम्ही chat वर बोलत असताना, मोबाईल चा विषय निघाला. तो पर्यंत आम्ही आमचे मोबाईल नंबर पण एक्सचेंज केले नव्हते. त्यावर शेवटी आमच अस ठरल की ज्या दिवशी आम्ही अचानक पणे एकमेकां समोर येवू त्या दिवशी आपण मोबाईल नंबर एक्सचेंज करू. आता आमच ठरवून भेटण होणारच नव्हत. कसे भेटणार होतो याची काहीच कल्पना नव्हती.
त्या नंतर बरेच दिवस आमच बोलण असच चालू होत. मोबाईल नंबर, भेटण हा विषयच नसायचा. खुप विषयांवर आम्ही बोललो. काही विषयांवर आमची भांडण झाली. पण फ्रेंडशिप नेहमीच टिकली. माझ्या मते फ्रेंडशिप हे निभवण नसत, तर ते एक जगण असत. एकमेकांकडून काहीही एक्स्पेक्ट न करता ते रिलेशन एन्जॉय करण.
नंतर मी तिला एक दोन ठिकाणी पाहिल ही होत. पण समजायच नाही की ती नक्की हीच आहे का?? त्या वेळेला ह्या मैडम ना पण समजायच की आपल्याकडे कोणतरी बघतय पण हिच्या चेहर्यावर काही हावभाव नसायचे. मग मी ही कसा जाणार हो डायरेक्ट विचारायला. नंतर chat ला भेटल्यावर तिला विचारायचो, की तूच होती का ती. तर मैडम हो बोलायच्या. आणि मी का नाही आलो बोलायला अस बोलून माझ्याशीच वाद घालायच्या. काय बोलणार मी. तिला विचारायचो, तू का नाही आलीस. तर मुलींची ठरलेली टिपिकल उत्तर देयची. कठीण असत हो हे सर्व. पण कधी राग नाही आला मला तिचा. असेच करत काही महीने निघून गेले.
शेवटी २५ डिसेंबर २००८, ह्या दिवशी मी संध्याकाळी तलावपाळी वर मित्रांसोबत आलो. मैत्रिणीं सोबत ही बसली होती. मी तिच्याकडे पाहिल पण तीच काही लक्ष नव्हत. शेवटी मनाशी ठरवल आज काही झाल तरी बोलायच. गेलो तिच्या समोर, बोललो तिच्याशी. ठरवलेल्या प्रमाणे मोबाईल नंबर ही एक्सचेंज केले. जे chat वरती आम्ही ठरवल होत, ते आज पूर्ण झाल होत. आज ही आम्ही कधी राम मारुती रोडवर, कधी तलावपाळी वर भेटतो बोलतो पण काहीही न ठरवता. आणि आज ही दिवसातून एक तरी sms असतो तिचा.

Thursday, December 23, 2010
नावात काय ठेवलय?????
हल्ली ब्लॉगिंग जोरात चालू आहे. २-३ दिवसा आड़ का होईना एखादी पोस्ट टाकतच आहे. आज असाच विचार करत बसलो होतो तेंव्हा एक सुविचार आठवला. "नावात काय ठेवलय".
विचार करा. या पृथ्वी तलावर मनुष्य प्राण्याच नामः करण झाल नसत तर काय झाल असत?? जग भरातल्या मनुष्य प्राण्याला कस संबोधल असत??? किती गोंधळ उडाला असता. पेन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, लाईट बिल, टेलीफोन बिल या वर काय नाव असती??? लोकांनी एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारली असती??? जन्मलेल्या मुलांच बारस झाल असत का??? लव लेटर वर काय नाव लिहिली असती??? दोन व्यक्ति फोनवर बोलत असताना त्यांना एकमेकांची नाव माहीत असती का??? फ़क्त आवाजावरून समजाव लागल असत की माणूस आहे का स्त्री. wrong number ही पद्धत अस्तित्वात राहिली असती का??? बायकोने आपल्या पतीच नाव उखाण्यात घेतल असत का??? घरा बाहेर नावाची पाटी असती का??? स्कूल आयडी वर काय नाव असत??? लिविंग सर्टिफिकेट बनल असत का??? कॉलेज ला एडमिशन झाली असती का??? बायोडेटा बनला असता का??? बायोडेटा नाहीतर नोकरी भेटली असती का???
बापरे किती त्रास झाला असता??? पण मनुष्य प्राणी खुप हुशार हो. त्याने यातून ही मार्ग काढलाच असता. माझ्या मते यावर सोल्यूशन खुप सोप असत. माणसांनी नंबर ने एकमेकांना हाक मारली असती. प्रत्येकाला १० आकडी नंबर भेटले असते. तेच त्याच नाव असत. पेन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, लाईट बिल, टेलीफोन बिल, स्कूल आयडी, कॉलेज आयडी, बायोडेटा, एम्प्लोयी आयडी, ड्रायव्हिंग लायसंस ह्यांच्या नाव ह्या रखान्यात नावाच्या जागी नंबर असते.
प्रत्येकाने एकमेकांना नंबर ने हाक मारली असती. एकमेकांन मधल संभाषण सुद्धा काही अशा प्रकाराच असत.
१२३४५६७८९० : ०९८७६५४३२१ क्लास ला येणार आहेस का???
०९८७६५४३२१ : १२३४५६७८९०.....आज नाही जमणार रे.
हे सर्व पाहून एवढच वाटत.....खरच नावात काही ठेवलय??? :)

Subscribe to:
Posts (Atom)