Monday, January 9, 2012

ती दूर असल्याची जाणिव सुद्धा.....

रोज तिचा चेहरा नजरेसमोर
जसा ओळखीचा तसा अनोळखी सुद्धा
वाटत सर्व उमजतही तिला
पण दुसर्याच क्षणी ती दूर असल्याची जाणिव सुद्धा.

माझ लक्ष नसताना माझ्याकडे चोरून बघण
मी पाहताच क्षणी दुसरीकडे बघण
नजरेतून नजरेला उमजतय सर्वकाही
पण दुसर्याच क्षणी ती दूर असल्याची जाणिव सुद्धा.

आजतरी वाटत ती येइल सर्व दुनियादारी सोडून
पण दुसर्याच क्षणी ती दूर असल्याची जाणिव सुद्धा.

अभिजीत 

Monday, December 5, 2011

आयुष्य.....

आपण नेहमी बोलत असतो की मला लाइफ एन्जॉय करायची आहे. मला हे करायच आहे ते करायच आहे पण नक्की काय करायच आहे??? तेच माहित नसत. थोडा जरी फावला वेळ मिळाला तरी काय करू आणि काय नको अस होवून जात कारण खर तर माहितच नसत काय करायच आहे ते.

आठवडाभर काम केल्यावर हक्काची एक सुट्टी मिळते. ती तर सार्थकी लागलीच पाहिजे. पण तिथेही वाट्याला disappointment च येते कारण नेहमीच आपली एंजोयमेंट कोणा ना कोणावर अवलंबून असते. दारू प्यायची आहे मित्र हवेत. मूव्ही ला जायच आहे मित्र मैत्रिणी हवेत. नाक्यावर बसून टाईमपास करायचा आहे मित्र मैत्रिणी हवेत. अर्थात एंजोयमेंटसाठी मित्र मैत्रिणी हवेच. आयुष्य ह्यांच्याविना बेरंग आहे.

पण मला वाटत की रोजच हे सर्व आपल्या सोबत नसणार. मग काय एन्जॉय करण सोडून देयच? एकटेपणा कवटाळत रडत बसायच??? रडत बसण रोज काही शक्य नाही. कधी तरी निघा एकटेच घराबाहेर. रोजची पायाखालची वाट पकड़ा, चालत रहा. सुरवातीला वाटेल काय करतोय मी एकटा??? प्रश्न पडूदेत उत्तर शोधायला जाऊ नका. थोड्यावेळाने प्रश्न सुद्धा उत्तर शोधायला जाणार नाहीत. फ्री होवून जगण ह्यालाच तर म्हणतात.

एंजोयमेंट पण मनापासून करत असल तर ठीक आहे हो. कारण आपल्याला सवय असते एंजोयमेंट पण मनाला मुरड घालत करण्याची. तशी आपल्या आयुष्यात रिस्ट्रिक्शन खुप असतात. सर्वात मोठ तर पैशाच रिस्ट्रिक्शन, वेळेच रिस्ट्रिक्शन, मनाच रिस्ट्रिक्शन, समाजाच रिस्ट्रिक्शन.....बाप रे बाप किती हे रिस्ट्रिक्शन.

शेवटी हे ही खर आहे की एंजोयमेंट बेलगाम नसावी, तिला पण काही तरी रिस्ट्रिक्शन असाव. पण किती हे ज्याच त्याने ठरवाव. आपण नोर्मल आयुष्य जगताना पण त्यात दुनियाभरचे रिस्ट्रिक्शन आणून ठेवतो आणि स्वतःच स्वताच्या दुनियादारित अड़कुन पडतो. एक आयुष्य जगतो पण तेहि दुनियादारी करत.

ज्या मुलीला मनापासून भेटावस वाटत, जिच्या सोबत काही क्षण घालवावेसे वाटतात. तिला भेटतानाही दुनियादारी. तिच्या सोबत अख्ख आयुष्य काढायच असत पण आपल्याला भेटायला येताना तिला तिची मैत्रिण सोबत लागते. दुनियादारी अजुन काय??? असो. कोणावर आपला काही जोर नाही.

हे एवढ सगळ बोलण्याचा अर्थ एवढाच की केवढी ही दुनियादारी. थांबवा ती. नाक्यावर बसून वायफळ गप्पा मारत असाल तर खुशाल मारा, एन्जॉय करा. प्रेयसी सोबत असाल तर तो क्षण तुमच्या आयुष्यातला तिच्या सोबतचा शेवटचा क्षण आहे अस समजुन फुल ऑन एन्जॉय करा. जे स्वप्न तुम्ही जिवापाड जपलेल आहे ते पूर्ण करण्यासाठी तहान, भूक, झोप विसरून काम करा. प्रत्येक क्षण मनापासून फुल ऑन जगण हेच आयुष्य आहे.

हे जे मी लिहिल आहे तस मलाही आयुष्य नाही जगता येत दुनियादारी सोडून. पण जेंव्हा मी विचार करतो आयुष्य कस असाव तेंव्हा मला वाटत ते असच असाव.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

  

Sunday, November 20, 2011

स्वप्न!!!!!

हल्ली लिखाण करण कमी झालय. रोज वाटत आज एक तरी पोस्ट लिहावी. असंख्य विचार एकाच वेळेला मनातून भरधाव वेगाने पुढे निघून जातात. विचारांवर विचार करायलाही वेळ मिळत नाही. दिवस संपतो आणि मी परत दुसर्या दिवशीच्या रूटीन कामांमध्ये व्यस्त होवून जातो.

खुप काही वाचायच आहे. खुप काही लिहायच आहे. पण..... हा पण काही माझा पिच्छा सोडत नाही आहे. सकाळी बस ने कामावर जात असताना नेहमीच हा विचार असतो की आजतरी ही दुनियादारी सोडून मी स्वतः साठी वेळ देवू शकेन का? अर्थात प्रश्न अनुत्तरितच राहतो.

स्वप्न पूर्ण होइल की नाही हा खुप पुढचा प्रश्न आहे. पण स्वप्नपूर्तीच्या मार्गावर अडचणी वर मात करत पुढे चालत राहण गरजेच आहे. कारण स्वप्नपूर्तीची मजा तेंव्हाच आहे जेंव्हा त्याला तुमच्या मेहनतीची साथ आहे.

मित्रांनो आयुष्य एकदाच भेटत. फुल ऑन जगा. स्वतःच स्वप्न पूर्ण करा.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Sunday, October 30, 2011

किस का जोर चले इस दिल के आगे.....

आजकाल चित्त थारयावर नाही. जिथे तिथे चोहिकडे तीच दिसत असते. मग मन ही आपल ह्रदय नेइल तिकडे धावत असत. क्या करे "किस का जोर चले इस दिल के आगे" अशी काही स्थिती झाली आहे माझी. मनातल्या भावना सांगता ही येत नाहीत आणि गप्प ही बसता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी ही वेळ येतेच. ती तुम्हाला भेटेल की नाही ही खुप पुढची गोष्ट आहे पण तिला प्रपोज करण्या पर्यंतचा प्रवास हा निश्चितच अविस्मरणीय असतो. शेवटी काय हो एक म्हण आहे की,

"सुरवात ही पुष्कळदा घाबरवणारी असते, शेवट ही पुष्कळदा दुःखदायक असतो 
पण ह्या दोहों मधला प्रवास हा नक्कीच महत्वाचा असतो."

इथे तुम्ही "सुरवात ही पुष्कळदा घाबरवणारी असते" ह्यापेक्षा सुरवात ही पुष्कळदा "हृदयाचा ठोका चुकवणारी असते" असा ह्या ओळीचा अर्थ घ्या. 

अशा वेळी बघायला गेल तर आपण एकदम हतबल असतो. आपण काही शाहरुख़ खान नाही की एक स्माइल दिली की मुलगी वेडी होइल. म्हणतात ना की जगात काही अशा परीक्षा आहेत की ज्यांचा रिझल्ट १-२ टक्के लागतो तसच काही ह्या प्रेमाच्या परिक्षेच आहे. खुपजण परीक्षेला बसतात हो पण उत्तीर्ण एखादाच होतो. असो. शेवटी काय हो प्रपोज करण महत्वाच आहे, बाकी काही नाही. पास होण, फेल होण चालूच असत आयुष्यात. 

ह्या प्रवासात अडचणी पण खुप असतात. आता प्रेम तर झालेल असत पण अप्रोच कस करायच इथून सुरवात. एक तर ती अशा अविर्भावात असते की तिला काही ह्यातल माहितच नाही. (पण बघायला गेल तर ते तिला अगोदरच समजलेल असत) असो. पोरींचे नखरे अजुन काय हो!!!!! शेवट पर्यंत मनाचा ठाव लागत नाही एवढ मात्र खर.

ह्या काळात तिला भेटण कठीण असत. मनातल व्यक्त करण्यासाठी पण दिवसें दिवस वाट पहावी लागते. वरचे वर कॉल, दररोज न चुकता एखादातरी एसेमेस, तिच्या एका हाकेवर मदतीला तयार राहण हे सर्व कराव लागत. कधी कधी वाटत "Is it going to be worth?" शेवटी काय हो माणस आहोत आपण. थोड़े फार का होइना मतलबी असतोच की.

हा प्रवास आता तर सुरु झाला आहे. बघुया काय होते ते. शेवट काय आहे मला नाही माहिती. पण ह्या प्रवासातली मजा काही औरच आहे.

मित्रांनो आयुष्य खुप सुंदर आहे. फुल ऑन एन्जॉय करा. आपल स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करा. 

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 


Wednesday, October 26, 2011

शुभ दिपावली


वरील चित्र अंतरजालावरून साभार....

अभिजीत

Thursday, October 6, 2011

सर्वांना दसरयाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!


सर्वांना दसरयाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!

(वरील चित्र अंतरजालावरून साभार)

अभिजीत 

Monday, October 3, 2011

ccd मधली संध्याकाळ

हा आठवडा एवढा हेक्टिक होता, काय सांगू तुम्हाला??? फोन घेयची सुद्धा फुरसत नव्हती. तिच्या १० कॉल पाठी एका कॉल ला उत्तर देत होतो. त्यामुळे बाईसाहेब थोड्या रागावल्या होत्या. रविवार च ccd च प्रोमिस मी तिला केल होत म्हणून ती शांत होती. 



रविवारी संध्याकाळी ४ वाजता मी तिला बस स्टॉप वर पिक केल आणि आम्ही निघालो. आभाळ दाटून आल होत कुठल्याही क्षणी पावसाला सुरवात होणार होती. पाउस सुरु होण्याच्या आत माला ccd गाठायच होत म्हणून बाइक मी अजुन जोरात दामटवली. पण काही उपयोग झाला नाही आणि पाउस सुरु झाला. आडोशाला बाइक घेयची म्हन्टली तर मैडम ऐकायला तयार नाहीत, त्यांना पावसात भिजत बाइक राईड ची मजा घेयची होती. काय बोलणार मी, तिला नाही बोलू शकलो नाही. लड़िकपणे तिने हट्ट पुरवून करून घेतले आहेत माझ्याकडून आणि मी ही सहसा तिला कधी नाही बोलत नाही. असो. 



भिजत भिजत आम्ही एकदाचे ccd ला पोहचलो. नेहमीची जागा पकडली आणि आर्डर दिली. स्काय ब्लू रंगाच्या पंजाबी ड्रेस मध्ये खुप सुंदर दिसत होती राव. तिच्यावरून नजर हटवण कठीण होत. ccd मधला अंधुक प्रकाशातला अम्बियंस, बाहेर पडणारा रिमझिम पाउस, वाऱ्यासंग झुलणारी झाड, समुद्रात वाऱ्यावर डोलणार जहाज. सर्वच कस सुंदर, आल्हादायक, ह्रदय स्पंदवणार.



थोड्या वेळाने तिच्या सोबत चौपाटी वर आलो. मावळतिच्या सुर्याला पाहत काही वेळ एकत्र घालवला आणि निघालो. ती रविवारची ccd मधली संध्याकाळ आज ही मनात घर करून आहे.