Thursday, September 4, 2014

The feeling that conquer the world!

आज बरेच दिवसांनी स्वतः च्याच पोस्ट वाचत बसलो होतो. तेंव्हा अस वाटल की हे एवढ सर्व लिहिताना जी मजा आली होती, आज वाचताना ती तूसभर पण कमी झाली नाही. शेवटी काय भावना महत्वाची.....

The feeling that conquer the world.

चला, निरोप घेतो परत भेटूच 

अभिजीत 

Friday, March 28, 2014

उखाणा!!

१५ मार्च २०१४ वेळ सकाळी १० वाजता. आज घरात सत्यनारायणाची पूजा होती. नुक़तच लग्न झालेल (लग्न तारीख १४ मार्च २०१४) नविन जोड़प (अभिजीत आणि गीता) पूजेला बसणार होत, भटजीनी एका सवाशणीला माझ्या उपरण्याची आणि गीताच्या साडीच्या पदराची गाठ मारायला सांगितली. भटजी तिला बोलले, पूजा संपली की दोघांनी उखाणे घेतले तरच ही गाठ सोडायची, नाही तर राहून दे त्यांना असच.

हे ऐकताच माझ्या डोक्यात विचारचक्र चालु झाल, आज मला कोणाची मदत नव्हती घेयची भटजीनि पूजा आरंभ केली. मंत्र उच्चारण चालू झाले. मी भटजीना सत्य नारायणाची कथा मराठीत बोलण्यास सांगितली जेणेकरून थोड़ फार समजाव. सर्वेजण कथा नीट लक्ष देवून ऐकत होते. पण माझ सर्व लक्ष उखाणा काय घेयाचा ह्यातच.

वेळ दुपारी १२ वाजता. पूजा संपायला थोडाच वेळ बाकी होता. मनात मी सर्वे permutations, combinations, rhythms जुळवत होतो पण उखाणा एका लय मधे बसेल तर शपथ. आज पर्यंत लिहिलेल्या कवितांमधे काही ओळी जुळवुन उखाणा बनतो का ते बघत होतो. पण उखाणा एवढा सहजा सहजी तयार होईल तर देवच पावला. शेवटी स्वताचाच ब्रैंड न्यू उखाणा बनवायचा ठरवल.

उखाण्याची पहिली रफ ओळ काहि अशी बनवली होती, "समुद्राच्या तळाशी शिंपल्यांची माळ....." पुढे काही सुचतच नव्हत. सर्व डोक आणि मन पणाला लावून मी प्रयत्न चालू केले. भटजीचे शेवटचे दोन कथा पठन उरले होते आणि हळुहळु उखाणा आकार घेयाला लागला. भटजीनी शेवटची कथा सांगितली आणि मी उखाणा बनवून तयार झालो.

सर्वात शेवटी आम्ही गणपतीची आरती केली आणि सत्यनारायणाची पूजा समाप्त झाली. भटजी बोलले उखाणा घ्या आणि गाठ सोडा. पहिली बारी माझीच होती. मी पूर्णपणे गोंधळलो होतो. उखाणा तर तयार होता पण बोलायला भिती वाटत होती. शेवटी भटजी बोलले मी बोलतो मग तू बोल. त्यांचा उखाणा काही ४-५ ओळींचा होता. मी त्यांना बोललो, तुमचा उखाणा खुप मोठा आहे माझ्या लक्षात नाही राहणार. त्यापेक्षा मीच बोलतो ऐका तर मग......

"स्वर्गात इश्वराने बांधली आमच्या प्रितीची गाठ,
पृथ्वीतलावर गीता ने बांधली माझ्याशी लगिन गाठ."

उखाणा सर्वांना आवडला. उपरण्याची गाठ पण सोडली. मेहनतीच फळ मिळाल :) 

चला, निरोप घेतो. परत भेटुच. 

अभिजीत