Thursday, September 4, 2014

The feeling that conquer the world!

आज बरेच दिवसांनी स्वतः च्याच पोस्ट वाचत बसलो होतो. तेंव्हा अस वाटल की हे एवढ सर्व लिहिताना जी मजा आली होती, आज वाचताना ती तूसभर पण कमी झाली नाही. शेवटी काय भावना महत्वाची.....

The feeling that conquer the world.

चला, निरोप घेतो परत भेटूच 

अभिजीत 

Friday, March 28, 2014

उखाणा!!

१५ मार्च २०१४ वेळ सकाळी १० वाजता. आज घरात सत्यनारायणाची पूजा होती. नुक़तच लग्न झालेल (लग्न तारीख १४ मार्च २०१४) नविन जोड़प (अभिजीत आणि गीता) पूजेला बसणार होत, भटजीनी एका सवाशणीला माझ्या उपरण्याची आणि गीताच्या साडीच्या पदराची गाठ मारायला सांगितली. भटजी तिला बोलले, पूजा संपली की दोघांनी उखाणे घेतले तरच ही गाठ सोडायची, नाही तर राहून दे त्यांना असच.

हे ऐकताच माझ्या डोक्यात विचारचक्र चालु झाल, आज मला कोणाची मदत नव्हती घेयची भटजीनि पूजा आरंभ केली. मंत्र उच्चारण चालू झाले. मी भटजीना सत्य नारायणाची कथा मराठीत बोलण्यास सांगितली जेणेकरून थोड़ फार समजाव. सर्वेजण कथा नीट लक्ष देवून ऐकत होते. पण माझ सर्व लक्ष उखाणा काय घेयाचा ह्यातच.

वेळ दुपारी १२ वाजता. पूजा संपायला थोडाच वेळ बाकी होता. मनात मी सर्वे permutations, combinations, rhythms जुळवत होतो पण उखाणा एका लय मधे बसेल तर शपथ. आज पर्यंत लिहिलेल्या कवितांमधे काही ओळी जुळवुन उखाणा बनतो का ते बघत होतो. पण उखाणा एवढा सहजा सहजी तयार होईल तर देवच पावला. शेवटी स्वताचाच ब्रैंड न्यू उखाणा बनवायचा ठरवल.

उखाण्याची पहिली रफ ओळ काहि अशी बनवली होती, "समुद्राच्या तळाशी शिंपल्यांची माळ....." पुढे काही सुचतच नव्हत. सर्व डोक आणि मन पणाला लावून मी प्रयत्न चालू केले. भटजीचे शेवटचे दोन कथा पठन उरले होते आणि हळुहळु उखाणा आकार घेयाला लागला. भटजीनी शेवटची कथा सांगितली आणि मी उखाणा बनवून तयार झालो.

सर्वात शेवटी आम्ही गणपतीची आरती केली आणि सत्यनारायणाची पूजा समाप्त झाली. भटजी बोलले उखाणा घ्या आणि गाठ सोडा. पहिली बारी माझीच होती. मी पूर्णपणे गोंधळलो होतो. उखाणा तर तयार होता पण बोलायला भिती वाटत होती. शेवटी भटजी बोलले मी बोलतो मग तू बोल. त्यांचा उखाणा काही ४-५ ओळींचा होता. मी त्यांना बोललो, तुमचा उखाणा खुप मोठा आहे माझ्या लक्षात नाही राहणार. त्यापेक्षा मीच बोलतो ऐका तर मग......

"स्वर्गात इश्वराने बांधली आमच्या प्रितीची गाठ,
पृथ्वीतलावर गीता ने बांधली माझ्याशी लगिन गाठ."

उखाणा सर्वांना आवडला. उपरण्याची गाठ पण सोडली. मेहनतीच फळ मिळाल :) 

चला, निरोप घेतो. परत भेटुच. 

अभिजीत 





Thursday, August 15, 2013

वन्दे मातरम!




(वरील छायाचित्र गूगल वरून साभार)

सर्वांना  स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अभिजीत 

Saturday, August 3, 2013

दुनियादारी..

The song which i liked most from the marathi movie दुनियादारी..
मला आवडलेल्या गाण्यातल्या काही ओळी.

देवा तुझ्या गाभार्याला उम्बराच नाही, सांग कुठे ठेवु माथा कळनाच काही
देवा कुठे शोधु तुला मला सांग ना, प्रेम केले एवढाच माझा रे गुन्हा..

देवा काळजाचि  हाक ऐक एकदा तरी, माझ्या या जीवाची आग लागु दे तुझ्या उरी
आरपार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू ..

दुनियादारी..

Wednesday, June 12, 2013

थोडीशी भिजलेली थोडीशी गोंधळलेली.....

रिमझिम पावसात धुक्यात हरवलेली ही वाट
थोडीशी भिजलेली थोडीशी गोंधळलेली
अगदी आठवणीतल्या तिच्यासारखी 
आज ही वाटत उभी असेल ती पुढच्या वळणावर
थोडीशी भिजलेली थोडीशी गोंधळलेली..

अभिजीत 

Tuesday, June 11, 2013

माझ्या मनातला पाऊस.....

हल्ली लिखाण जवळ जवळ थांबलच आहे. वेळच नाही मिळत म्हणाना. जॉब आणि बाकीच्या दुनियादारित अडकून पडलोय. जॉब आणि माझ पैशन (passion) याचा मेळच बसत नाही आहे. जॉबमुळे महिन्याच रोलिंग तर चालु आहे पण जे करायच आहे तिकडे दुर्लक्ष होत आहे. असो. इच्छा आहे तर मार्ग आहे.

आजकाल फेसबुकवर सर्वजण पावसाबद्दल कहिनाकाही लिहित आहेत म्हंटल आपण ही प्रयत्न करून बघुया.

माझ्या मनातला पाऊस.....

अखेरीस  मानसून सुरु झाला.
उन्हाचे मनाला बसलेले चटके काहीसे शीतल झाले.
मन  पुन्हा एकदा नव चैतन्य आणि उमेदेने पुरेपुर भरले.
आणि जगण्याला नविन बळ देवून  गेले.

अभिजीत