Wednesday, May 25, 2011

पण जिथे प्रेम आहे तिथे दुरावाही आहे.....

सकाळचे ५ वाजले होते. बाहेर मूसळधार पाउस पडत होता. बालकनी मध्ये मी तयार होवून पाउस जायची वाट पाहत होतो. अजुनही बाहेर अंधार होता. काल रात्रीच माझ तिच्याशी बोलण झाल होत. तेवढ्यात तिचा एसेमेस (sms) आला. मी जेकेट चढवल आणि निघालो. बाइकमध्ये काल रात्रीच पेट्रोल फूल केल होत. बिल्डिंग खाली आलो. घरासमोरील मंदिरात पहाटेच भजन चालू होत. पावसाचा जोर आता कमी झाला होता. आभाळ बऱ्यापैकी स्वच्छ झाल होत. बाइक काढली, हेलमेट चढवल आणि मी निघालो. मनात आज एक वेगळीच शांतता होती, कुठलीही चलबिचल नव्हती. मेन रस्त्यावर ५ मिनिटे बाइक चालवून मी चौकात आलो. डाव्या हाताला बाइक वळवली. तेवढ्यात तिचा एसेमेस आला की बस निघाली आहे, तू कुठे आहेस??? मी बाइक दामटवली, रस्त्यात मला तिचे आई वडिल दिसले, ते तिला बस स्टैंड वर सोडायला आले होते. बस स्टैंडच्या पुढच्या चौकात मला तिची बस दिसली. मी बाइक अजुन जोरात दामटवली आणि बस सोबत आलो. तिने अगोदरच मला पाहिल होत. ती जेकेट घालून तयार होती. पुढच्या सिग्नल्ला बस थांबली आणि ती खाली उतरली. रिझर्व्हेशन करून पैसे अगोदरच पेड़ केले होते म्हणून कंडक्टर काही बोलला नाही. तिला घेवुन मी निघालो पुण्याच्या दिशेने.



साधारण ७ च्या आसपास आम्ही पनवेल ला आलो. पावसाचा जोर आता चांगलाच वाढला होता. एका होटेलमध्ये सकाळचा नाश्ता करण्यासाठी आलो. गेला १ तास आम्ही एकमेकांशी एकही शब्द बोललो नव्हतो. आता समोरासमोर असून सुद्धा मी मेनू कार्ड उगाचच आलटून पालटून पाहत होतो तर ती कधी मोबाईल मध्ये तर कधी माझ्याकडे पाहत होती. शेवटी पोटभर कांदेपोहे आणि चहा असा नाश्ता उरकला आणि निघालो. बोलायाच खुप काही होत पण............... 

आमचा पुढचा स्टॉप होता लोणावळा. तिच्या सोबतचा हा प्रवास कधीच संपू नये अस वाटत होत. साडे नऊ - दहाच्या सुमारास आम्ही लोणावळयात आलो. मामा मामीसाठी तिने चिक्की आणि जेली घेतली आणि आम्ही निघालो. लोणावळयात अक्षरशः गारठायला झाल होत. मला चहाची खरच गरज होती. हे तिला कळल असाव. तिने खुणेनेच होटेलपाशी थांबण्यास सांगितल. पुढच्याच क्षणी आम्ही होटेल मध्ये चहा घेण्यास बसलो. न राहवून मी तिला विचारल मग ह्या नंतर परत कधी भेटणार??? पण आता पर्यंत रोखून ठेवलेल्या आसवांना तिने वाट मोकळी करून दिली. डोळ्यातले अश्रुच शब्दांची भूमिका बजावत होते.


मी काहीच बोललो नाही. बाइक काढली आणि आम्ही निघालो. शेवटच मला तिला डोळे भरून पहायच होत. मी aamby valley च्या दिशेने बाइक फिरवली. ती काहीच बोलली नाही. प्रेम असेल तर विश्वासही असतो की हो. रस्ता खुप सुंदर होता. नागमोडी वळणे घेत आम्ही जात होतो. जसजस आम्ही वर जात होतो तसतस गारठा वाढत चालला होता, धुक खाली उतरत होत. आयुष्यातला तिच्या सोबतचा अविस्मरणीय अनुभव.


एका ठिकाणी मी बाइक थांबवली. ती बाइकवरून उतरली. खुप काही बोलायच होत तिला आणि मला. पण आम्ही काहीच नाही बोलू शकलो. काहीही न बोलता उमजण हेच तर प्रेम आहे. आम्ही फ़क्त एकमेकांना पाहत राहिलो. एकमेकांपासून दूर होण्याच दुखः होत. ती काहीच न बोलता माझ्या मिठीत विसावली. त्यावेळेस घरून आलेले सर्व कॉल तिने रिजेक्ट केले. प्रेमाची पावतीच होती ती.


आता आम्ही पुण्याकडे येण्याची वाट धरली. वाटेत दुपारच जेवण उरकल. संध्याकाळी ५ वाजता मी स्वारगेटला तिला तिच्या मामा मामीकड़े सोडल. काही दिवसातच ती हायर स्टडीजसाठी यूरोपला जाणार होती. आयुष्यात एक मोठा पॉज (pause) येणार होता. आता आम्हाला एकमेकांचा निरोप घेण कठीण झाल होत. पण जिथे प्रेम आहे तिथे दुरावाही आहे.

आणि एक गोष्ट सांगायची राहिली की हो, बस लेट होती ही थाप घरच्यांना पटली.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.
(ह्यातले सर्व फोटो संदर्भासाठी गूगल (google) वरून घेतले आहेत)

अभिजीत

No comments:

Post a Comment