Monday, January 24, 2011

कॉलेज आठवणी - सारांश (माझ्या विचारातून)

कॉलेज आठवणी ही एक काल्पनिक रंगवलेली आठवण आहे. ह्या कथे मध्ये रंगविलेल्या सर्व व्यक्तिरेखा राशी, सई, ग्रीथा, योगी, विरजा, अभि काल्पनिक होत्या. रंगवलेला प्रत्येक क्षण काल्पनिक होता. रंगवलेल प्रत्येक ठिकाण काल्पनिक होत. रंगवलेल प्रत्येक व्यक्ति चित्र काल्पनिक होत.

जेंव्हा मी ही कथा लिहायला घेतली तेंव्हा मला माहीत ही नव्हत की ह्या कथेचा शेवट काय असणार आहे. व्यक्तिरेखांचा विचार केला तर राशी ही एक अशी मुलगी होती की जी दिसायला खुप सुंदर होती. पण सुंदरतेचा तिला काही गर्व नव्हता. (पुष्कळ मुलींना सेंटर ऑफ़ अट्रेक्शन बनायला आवडत. दहा जणांनी त्यांची स्तुति करावी. वेळोवेळी त्यांना मदत करावी अस त्यांना वाटत. घेयला नेहमी तयार असतात हो, देण्याची वेळ आली तर तुम्हाला ओळखही दाखवत नाहीत) पण राशी ह्या मुलीं पेक्षा खुप वेगळी होती. राशीच हे वेगळ पण अभि ला मनापासून आवडल होत. कथे मध्ये राशी अभि ला शोधत लायब्ररी मध्ये येते आणि कथेला एक वेगळ वळण मिळत.

विरजा मित्रांचा मित्र. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी ही पार्टी मागणारा. नेहमी हसत खेळत जगणारा. कोणाला घाबरत नाही पण ग्रीथाने रागाने जरी त्याच्याकडे पाहिल तर शांत बसणारा. विरजा ही व्यक्तिरेखा रेखाटताना जास्त विचार नाही करावा लागला. विरजा त्याच्या भूमिकेत बरोबर फिट झाला. योगी ची भूमिका खुप छोटी होती. श्रीमंत घराण्यातला व्यक्ति. थोडासा शांत आणि गंभीर स्वरूपाचा. मोजकच बोलणारा पण विचार करून बोलणारा. त्यामुळे योगी सुद्धा त्याच्या भूमिकेत बरोबर फिट झाला. ग्रीथा ही एक सपोर्टिंग रोल मध्ये होती. पूर्ण कथेत तिच्या वाट्याला २ ते ३ वाक्यच आली असतील. विरजा जसा ग्रीथा शिवाय अधुरा आहे तसच ग्रीथा सुद्धा विरजा शिवाय अधूरी आहे.

शेवटची व्यक्तिरेखा पण खुप महत्वाची.....सई. सई ने थोडा त्रास दिला. भूमिकेत बसायलाच तयार नव्हती. राशी अभि च्या आयुष्यात आली आणि सई ने ह्या कथेची नायिका तीच आहे हे दाखवून दिल. राशी ह्या कथेत आली नसती तर कदाचित अभि आणि सई एकत्र येयला पुष्कळ वर्षे लागली असती.

ह्या कथेची नायिका जरी सई असली तरीही राशी कुठेही कमी पडत नाही. राशीच प्रेम. तिने घेतलेला इनिशिएटीव. अभि ला आपल समजुन त्याच्या सोबत फिरणारी राशी. हृदयाला कुठेतरी भिड़ते. सई बद्दल म्हणाल तर खुप शांत मुलगी हो. भावनांना समजणारी. लाडीकपणे स्वतःचे हट्ट पुरवून घेणारी. रडण्यासाठी जिला कधी कोणा दुसर्याच्या खांद्याची गरज नाही पडली. तिने अभि वर प्रेम केल आणि त्याच्या सोबतच राहिली. अशी सई सुद्धा तिच्या भूमिकेत बरोबर फिट झाली.

ही कथा ४ भागांमध्ये संपली पण आज जेंव्हा मी विचार करतो की माझी प्रेयसी (आयुष्यभराची सोबतीण) कोण असावी??? तेंव्हा वाटत ती सई च असावी.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

Friday, January 21, 2011

मैत्री.....समजणारे आणि निभावणारे

आजपर्यंत मी अर्ध्याहून जास्त लिखाण मुलीं बद्दल केल आहे. त्याप्रमाणे पुष्कळ जणांच्या मते मी फ्लर्ट आहे. पण ठीक आहे. ज्या व्यक्ति मला ओळखतात त्यांना माहीत आहे मी कसा आहे. असो. पुष्कळ वेळा आपण काही व्यक्तीं कडून काही गोष्टी एक्स्पेक्ट करतो आणि माझ्या मते हे बरोबर आहे. आपण आपल्या लोकांकडून एक्स्पेक्ट नाही करणार तर कोणांकडून करणार??? पण बघायला गेल तर एक्स्पेक्ट नकरणच चांगल असत.

आपले मित्र मैत्रिणी. पुष्कळ वर्ष आपण एकमेकांना ओळखत असतो. काही व्यक्ति अशा असतात की ज्या मनात कुठलिही कटुता न बाळगता आयुष्यभर मैत्री निभावतात. काही व्यक्ति तुमच्या बद्दल मनात मत्सर ठेवून मैत्री निभावतात. काही व्यक्ति स्वतःच्या हिशोबाने तुमच्याशी मैत्री निभावतात. काही व्यक्ति काही अटी घालून तुमच्याशी मैत्री निभावतात. काही व्यक्ति तुम्हाला मित्र, चांगला मित्र किंवा सर्वात चांगला मित्र या केटेगरी मध्ये ठेवतात. पण तुम्हाला जर मित्र, चांगला मित्र आणि सर्वात चांगला मित्र या मधला फरकच कळत नसेल तर तुम्ही फ़क्त मित्र म्हंटल तरी पुष्कळ आहे हो.

काही जणांना सवय असते की एकमेकांना जास्त ओळख़त नसतील तरीही बेस्ट फ्रेंड म्हणायच. माझ म्हणन एवढच आहे की जर खरच मनापासून वाटत असेल तरच बोला. त्या व्यक्ति कडून काही काम काढून घेण्यासाठी कशाला त्याला बेस्ट फ्रेंड म्हणता???

काही मित्र मैत्रिणी वर्षानुवर्षे तुम्हाला ओळखत असतात. पण मैत्री काय असते हेच त्यांना माहीत नसत.

काही व्यक्ति तुमच्याशी मैत्री करतात. मैत्री करताना काही अटी ठेवतात. ह्या अटी ते काही तुम्हाला सांगत नाहीत पण त्यांच्या  बोलण्यातून आणि वागण्यातून ते तुम्हाला बरोबर दाखवतात.

काही व्यक्ति मैत्री मधून शत्रुता निभावत असतात.

काही व्यक्ति तुमच्या मैत्रिणींना पटवण्यासाठी तुमच्याशी मैत्री करतात.

काही व्यक्ति तुमच्या प्रेयसीला पटवण्यासाठी तुमच्याशी मैत्री करतात. (पण बघायला गेल तर हीच खरी वेळ असते आपल्या प्रेयसीला ओळखण्याची)

पुष्कळ व्यक्ति तुम्हाला गृहीत धरतात. अड़चणीत असताना त्यांना तुमची आठवण येते. आनंदाच्या क्षणी ते तुम्हाला विसरतात.

सांगण्याचा हेतु एवढच की हो, पुष्कळ वेळा काहीतरी हेतु ठेवूनच मैत्री केली जाते. मैत्री समजणारे आणि निभावणारे खुप कमी व्यक्ति आहेत हो ह्या जगात.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 

Wednesday, January 19, 2011

Quote 8

people wrote big things in der quote like they care for the people.....but do they understand small things?????


ABHIJEET

Quote 7

If you can't argue, then just ignore.

ABHIJEET

Tuesday, January 18, 2011

Quote 7

In friendship some people say "you don't understand me" but do they understand others feeling?????


ABHIJEET

Quote 6

I don't like "Best Friends" tag because many people don't mean dat.


ABHIJEET

Saturday, January 15, 2011

माझ्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना "मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!"


अभिजीत


Quote 5

Don't entertain people to prove that you are a joker.

ABHIJEET

Quote 4

Forgiveness can't fix broken heart.

ABHIJEET

Quote 3

Worst choices leads to unforgiven destiny.

ABHIJEET

Quote 2

Beautiful scene can be a sinful beauty.

ABHIJEET

Quote 1

I left everything for the sake of nothing.

ABHIJEET

Thursday, January 13, 2011

कॉलेज आठवणी - अंतिम भाग

मी राशीचा निरोप घेतला आणि निघालो. त्या दिवशी मुसळधार पाउस पडत होता. विरजा ला कॉल केला. विचारल कुठे आहात तुम्ही??? पाउस पडत होता म्हणून ते सर्वजण कैंटीन मध्येच होते. धावत धावतच कैंटीन मध्ये गेलो. योगी ने विचारल राशी हो बोलली का??? मी बोललो की, नाही रे, मी तिला प्रपोज नाही केला. त्याला मध्येच अडवून मी विचारल सई कुठे आहे??? ग्रीथा बोलली की ती क्लास रूम मध्ये गेली आहे, येइल थोड्या वेळात. मी म्हंटल ठीक आहे. नंतर प्रश्नांचा एवढा काही भडिमार झाला माझ्यावर काही विचारू नका. विरजा च सुरु झाल की का नाही रे प्रपोज केला??? आता काय उत्तर देवू मी विरजाला. त्याला म्हंटल, प्रेम नाही रे माझ तिच्यावर मग कशाला तिला खोट्या आशा दाखवू. हाँ थोड़ी नाराज असेल माझ्यावर ती. पण ओळखते मला ती. आज ना उद्या समजुन घेइल ती मला. मधेच ग्रीथा ने विचारल आता काय??? मी म्हंटल आता काही नाही, एक नॉर्मल रूटीन लाइफ. हे ऐकून सर्वजण हसायला लागले. योगी बोलला की तुझी लाइफ कधी नॉर्मल रूटीन राहिली आहे का??? आत्ता सुद्धा तू काही तरी नविन करण्याच्या बेतात असणार. माझ योगीच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नव्हत. मला सई ला भेटायच होत.

मी सई ला कॉल केला. कुठे आहेस विचारल. तर मैडम बोलल्या मी क्लास रूम मध्ये आहे. मी विचार केला काही खर नाही आपणच जाव क्लास रूम मध्ये. मी सई ला बोललो की मी येतो क्लास रूम मध्ये, तिथेच थांब. जावू नकोस कुठे. निघताना ग्रीथा ने विचारलच की काय झाल??? मी तिला बोललो की काही नाही. येतो मी थोड्या वेळात. धावत धावत क्लास रूम मध्ये गेलो. बघतो तर काय सई तिथे नाही. परत तिला कॉल केला तर मैडम लायब्ररी मध्ये होत्या. सई माझ्या डोक्यात जायच काम करत होती. मी धावत धावत लायब्ररी मध्ये गेलो. तर मैडम तिथे ही नव्हत्या. एक तर मला कळत नव्हत ती अस का करत आहे??? मी स्वतःलाच म्हंटल ठीक आहे, तिला नाही भेटायच तर राहू देत.

मी तिथून निघालो आणि आमच्या नेहमीच्या जागेवर आलो. कॉलेज सुटल्यावर आम्ही सर्वजण ह्याच जागी भेटायचो. विरजा ची बाइक पण नेहमी ह्याच ठिकाणी उभी असते. विरजाच आणि माझ सिगरेट पिण्याच ठिकाणही हेच. पण ग्रीथा समोर विरजा काय सिगरेट मारेल! म्हणून ह्या सर्व गोष्टी लपुनच. मी तिथे आलो. मला काहीच कळत नव्हत की काय चालू आहे??? विचार करून करून डोक्याची वाट लागली होती. मी सिगरेट लाइट केली आणि बाइक वर बसलो. आता थोडा शांत झालो आणि मन आपोआप सई च्या आठवणीत गुंतत गेल.

२ वर्षापूर्वी सई आणि माझी ओळख झाली होती. सई.....काय सांगू मी तुम्हाला हिच्या बद्दल. खुप शांत. मोजकच बोलणारी. मनाने खुप चांगली. दुनियादारी पासून अलिप्त राहणारी. सर्व लेक्चर्स अटेंड करणारी. तीच फ्रेंड सर्कल सुद्धा तस खुप छोट. आमच्या ग्रुप व्यतिरिक्त दूसरा कुठलाही ग्रुप नाही. म्हणून हसण, रडण, रूसण-फूगण सर्व आमच्या समोरच. कोणा दुसरयाकडे जायची गरज नाही पडली तिला. हट्टाने स्वतःचे लाड पुरवून घेतले आहेत तिने माझ्याकडून. नेहमी पंजाबी ड्रेस मध्येच दिसणार. खुप छान दिसायची राव. आज मला उमजत की मला मुली पंजाबी ड्रेस मध्येच का आवडतात. पडलेल्या प्रश्नांची उत्तर खुप सोप्पी असतात हो फ़क्त संदर्भ जुलून आले पाहिजेत. हाताला सिगरेटचा चटका लागला आणि मी भानावर आलो.

विचार केला निघाव आता. रिसॉर्टला जायच होत. सई सुद्धा कैंटीन मध्ये असेल. आतापर्यंत तिला कळल असेल की मी राशी ला प्रपोज नाही केला ते. मी बाइक वरून उतरलो. सहजच माझ समोर लक्ष गेल. तर साधारण माझ्यापासून १० फुटांवर सई पाठमोरी उभी होती. मैडम भर पावसात भिजत उभ्या होत्या. म्हंटल काय मुलगी आहे ही??? एक तर मला पूर्ण कॉलेज फिरवल आणि आता अशी उभी आहे इथे येवून. किती नखरे करायचे??? कधी आली ही इथे मला कळलच नाही. मी आपल्याच तंद्रित होतो. म्हंटल जावुया तिच्याकडे पण पाउस होता. म्हणून जागेवरुनच तिला हाक मारली. मैडम ओ देयला काही तयार नाही. शेवटी मी तिच्या बाजूला जावून उभा राहिलो.

आमच्या दोघां मधल संभाषण काही अशा प्रकाराच होत :-

अभी : मग झाले का नखरे करून???
सई : नाही अजुन.....बाकि आहेत.
अभी : ओके.
(२ मिनिटे शांतता)
सई : मग काय झाल राशीच??? (माहीत असून सुद्धा)
अभी : होकार दिला तिने.
सई : मग इथे काय करतोयस??? गेला नाही तिच्या सोबत???
अभी : नाही रे. सिगरेट मारायची होती म्हणून आलो होतो. निघतोय आता.
(सई अभीच्या हातावर चापटी मारते)
अभी : ग्रीथाची सवय तुला कधी पासून लागली??? शोभतेस तिची मैत्रिण.
सई : (चिडून) निघ तू. तुला उशीर होत असेल.
अभी : निघायच्या आधी एक विचारू का???
सई : एक काय हजार प्रश्न विचार.
अभी : (चिडून) अस बोलणार असशील तर मी निघतो.
सई : नाही नाही विचार.
अभी : (स्माइल) किती प्रेम करतेस माझ्यावर??? आयुष्य घालवणार का माझ्या सोबत???
सई : (स्माइल) तोच विचार करत आहे.

आम्ही एकमेकांकडे पाहिल. सई ला पहिल्यांदा लाजताना पाहिल होत. त्या पावसात तीच ते लाजण अधिकच खुलुन आल होत. आज कळल होत की प्रेम आहे हे सांगण्यासाठी त्या तीन शब्दांची गरज नसते. मी सई ला बोललो की, पावसात भिजुन झाल असेल तर आपण निघुया. सगळे आपली वाट पाहत असतील. रिसॉर्टला जायच आहे विसरलीस का???

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Wednesday, January 12, 2011

कॉलेज आठवणी - भाग ३

मी आणि ग्रीथा सई च्या घरी गेलो. पाहतो तर काय??? दाराला कुलुप नव्हत म्हणजे मैडम घरातच होत्या. एवढा राग आला होता, म्हंटल काय फलातुगिरी आहे??? एक कॉल नाही अटेंड करू शकत का ही मुलगी. मी कधी कोणावर एवढा रागवत नाही पण त्या वेळेस माझा कंट्रोल नाही राहिला स्वतः वर आणि मी सई वरती खुप रागावलो. मैडम ला काही रडू आवरल नाही आणि त्या सुरु झाल्या. रागाच्या भरात मी ग्रीथा ला बोललो की तू रहा हिच्या सोबत मी चाललो, मला उशीर होत आहे आधीच आणि मी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी काय होणार आहे याची मला काहीच कल्पना नव्हती.

नेहमी प्रमाणे आम्ही लेक्चर्स अटेंड करून कैंटीन मध्ये बसलो होतो. आज कोणीच काही बोलत नव्ह्त. सगळे एकदम गप्प. मला वाटल काय झाल???? मी विचारल सुद्धा. पण तरीही कोणीही काहीही सांगायला तयार नाही. मी सई ला विचारल, तर सई मैडम पण गप्प. तिला विचारल, काय झाल होत काल??? तरीही ह्या मैडम गप्प. ती शांतता माझ्या डोक्यात जात होती म्हणून मी तिथून निघालो. पुढचे काही दिवस वातावरण असच होत. पण नंतर सगळ पूर्ववत झाल. राशीच आणि माझ आता वारंवार भेटण होत असे. मी कॉलेज सुटल्या नंतर एखादा तास राशी सोबत असायचो. योगी आणि विरजा रात्री मला नाक्यावर भेटायचे. एकंदरीत लाइफ एकदम कूल चालली होती. राशीला मी फ्रेंडशिप डे च्या दिवशी प्रपोज करण्याच ठरवल.

एकदिवशी कैंटीन मध्ये बसलेलो असताना मी सर्वांना ही गोष्ट सांगितली. विरजा नेहमी अशी गोष्ट सांगितल्यावर पार्टी मागणारा पण भाई आज शांत होता. मी न राहवून सर्वाना विचारल, काय झाल आहे तुम्हाला??? तुम्हाला काही प्रोब्लेम आहे माझ्यापासून??? माझ्या आनंदात तुम्हाला सहभागी नाही होयच आहे का??? मी अजाणतेपणी कोणाला दुखावल आहे का??? तेंव्हा योगी बोलला की नाही रे, अस काही नाही. आम्हाला तुझी काळजी वाटते एवढच रे. मी पुन्हा विचारल, राशी चांगली मुलगी नाही का??? तेव्हा योगी बोलला, अस नाही रे, राशी खुप चांगली मुलगी आहे. पण तू खरच प्रेम करतो का तिच्यावर??? सेटल होणार आहेस का तिच्या सोबत??? अस तर नाही ना की थोड्या दिवस फिरणार आणि मग सोडून देणार. त्यांचे प्रश्न बरोबर होते. पण माझ्याकडे उत्तर नव्हत. पण त्यांनी मला विचार करण्यास भाग पाडल एवढ नक्की.

नंतरचे काही दिवस मी सतत राशी ला भेटत होतो. दोन तीनदा मुंबई दर्शन सुद्धा करून झाल होत.
ती आणि मी खुप कम्फर्टेबल होतो एकमेकांसोबत. शेवटी फ्रेंडशिप चा दिवस उजाडला. आज मी ग्रुप सोबत वाटर रेसोर्ट ला जाणार होतो आणि राशी ला मी आज विचारणार होतो. कॉलेज ने रिसेस नंतर आम्हाला फ्रेंडशिप डे साजरा करण्यास वेळ दिला. पहिले तर आमचा ग्रुप मध्येच सेलिब्रेट झाला फ्रेंडशिप डे. मी सई ला फ्रेंडशिप रिबिन बांधत होतो. तेंव्हा सई ने मला विचारल की, अभी तू माझ्या सोबत राहशील ना??? आपली फ्रेंडशिप कधी तुटणार तर नाही ना??? सई च्या डोळयात पाणी होत. मी सई ला पहिले कधी अस पाहिल नव्हत. मी आज ना उद्या निघून जाईन अस तिला वाटत होत. मी सई ला बोललो, मी कुठे ही नाही जाणार तुझ्या सोबतच असेन नेहमी. सई चे हे रूप पाहून मी भारावून गेलो होतो. कॉलेज सुटल्यावर भेटू अस बोलून मी राशी ला भेटायला कैंटीन मध्ये गेलो.

कैंटीन मध्ये जात असताना माझ्या डोक्यात असंख्य विचार येत होते. दिड महिन्यापूर्वी मी राशी ला ओळख़त सुद्धा नव्हतो आणि आज मी तिला प्रपोज करणार होतो. योगी ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर शोधत होतो. सई चा तो चेहरा डोळया समोर येत होता. राशी अशी मुलगी होती की जिच्यासोबत मी माझ पूर्ण आयुष्य काढू शकत होतो. काहीच कळत नव्ह्त काय चालू आहे??? आता प्रश्न एवढाच होता की, मी राशी वर प्रेम करतो का??? कारण राशी माझ्यावर प्रेम करते हे मला माहीत होत. शेवटी आज मला एक निर्णय घेण भाग होत. खुप कॉम्प्लीकेटेड असत हो हे प्रेम. जेवढा विचार करणार तेवढे सीरियस होणार तुम्ही. बेस्ट सोल्यूशन.....विचारच करू नका. तेच मी केल आणि राशी समोर जावून उभा राहिलो.

राशी चा त्या दिवशीचा तो रेड आणि ब्लैक कॉम्बिनेशन असलेला पंजाबी ड्रेस तिच्यावर खुप उठून दिसत होता. काय बोलायच काहीच कळत नव्हत. शांत उभा राहिलो. राशी बोलली की बोल काय बोलायच आहे ते. फ़क्त ३ शब्द बोलायचे होते. पण शब्द तोंडातून बाहेर येण्यास काही तयार नव्हते. मला समजुन चुकल होत की माझ राशी वर प्रेम नाही. काल पर्यंत मी माझ्या निर्णयावर ठाम होतो की मी राशीला प्रपोज करणार. पण आज सई ने बोललेल, "अभी तू माझ्या सोबत राहशील ना???" हे वाक्य आपल काम करून गेल होत. सई च्या आवाजातला तो आपलेपणा हृदयाला कुठेतरी भिडला होता.

क्रमशः.....

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

Tuesday, January 11, 2011

कॉलेज आठवणी - भाग २

संध्याकाळी ८ च्या सुमारास आम्ही नाक्यावर आलो. विरजा नाचत नाचतच आला. योगी गाड़ी पार्क करून येत होता. विरजा चा पहिला प्रश्न, कुठे बसायच??? योगी आल्यावर मी सकाळी जे घडल ते त्यांना सांगितल. विरजा ला हे कारण पुरेस होत पार्टीसाठी. मी त्यांना बोललो की अजुन कशात काही नाही कशाला आताच पार्टी करायची??? आपण वाटर रेसोर्ट ला जाणार आहोत तेंव्हा करुया की फुल ऑन पार्टी. पण माझ काही ह्या लोकांनी ऐकल नाही आणि आम्ही आमच्या ठरलेल्या ठिकाणी पार्टी साठी आलो. विरजा सोबत असला की १२ - १ वाजे पर्यंत पार्टी चालणार हे निश्चित. रात्री १ वाजता घरी जावून सकाळी कॉलेजला जायच म्हणजे आमच्या जिवावर येयच. पण नशीब शनिवार होता. मग काय एकदम जल्लोषातच पार्टी केली की. विरजाच एकीकडे चालू होत की, यार तेरी तो निकल पड़ी...अब मेरे लिए कोई धुंड...उसकी कोई फ्रेंड रहेगी अच्छी.....तेंव्हा योगी बोलला, तेरी तो पहेलेसे है यार.....ग्रीथा. हे ऐकून आमची हसता हसता पुरेवाट लागली.

रात्री १ वाजता घरी आलो. आज लायब्ररी मध्ये घडलेल्या प्रसंगाचा विचार करतच झोपी गेलो. सकाळी उशिरा उठलो. नाश्ता करत होतो, तेवढ्यात मोबाईल वरची रिंग वाजली. बघतो तर काय, सई चा फ़ोन. मनात विचार आला, हिने कशाला कॉल केला आता??? काल पार्टी केली हे हिला कळल वाटत. फ़ोन उचलला, काय झाल आहे हे ऐकण्यासाठी. पण नशीब तिला पार्टीच काही माहीत नव्हत. दुपारी भेटायचा प्लान तिने आखला होता. सर्वांची मंजूरी देवून झाली होती, फ़क्त मीच उरलो होतो. तिने मला विचारल नाही तर मला सांगितल की, तू ह्या ह्या वेळेस ह्या ह्या ठिकाणी येणार आहेस. ठरल्या प्रमाणे सर्वजण भेटलो. फुल ऑन टाइमपास झाला. रविवार पूर्णपणे सार्थकी लागला. विरजा ने काल लायब्ररी मध्ये जे घडल ते सई आणि ग्रीथा ला सांगितल. आता माझ त्या मुली सोबत काही होण्या आधीच त्याची चर्चा पूर्ण ग्रुप मध्ये होती. मला विरजाचा राग आला होता आणि बदला घेण्यासाठी ग्रीथा हे नाव पुरेस होत. त्यात योगी ने काल झालेल्या पार्टीचा विषय काढला आणि ग्रीथा ने asusual विरजाला चापटी मारली.

घरी आलो. कधी झोप लागली कळल नाही. सकाळी लेक्चर्स अटेंड करून आम्ही कैंटीन मध्ये बसलो होतो. साधारण पणे ह्याच वेळेस ती तिच्या ग्रुप सोबत कैंटीन मध्ये येत असे. मी ती येण्याची वाट पाहत होतो. सई ने शेवटी विचारल की कोणाची वाट पाहत आहेस??? आणि मी बोलून चुकलो की, राशी. सई ला कळल होत की, राशी मला आवडते. सई ने विचारल, ह्या वेळेस तरी सीरियस का??? पण माझ उत्तर नेहमी सारखच ठरलेल, माहीत नाही. कारण अजुन कशात काही नव्हत. थोड्या वेळाने सई आणि ग्रीथा लेक्चरला निघून गेल्या. तेवढ्यात राशी चा ग्रुप तिथे आला पण ती नव्हती ग्रुप मध्ये. तिच्या ग्रुप मधल्यांना विचारणार तरी कस??? विरजा तयार झाला होता विचारायला पण त्याला योगी ने अड़वल. बर झाल. विरजा ने नीट विचारल तर ठीक नाही तर राडे घालणार हा तिथे. हे आम्हाला माहीत होत. आम्ही तिघेही लेक्चरला जाण्यासाठी निघालो. कैंटीन मधून बाहेर येत नाही तर समोरून राशी येत होती. हे पाहून विरजा आणि योगी ने तिथून कलटी मारली.

मुसळधार पाउस पडत होता. मी कसबस रेनकोट चढवल. मला येताना पाहून ती कैंटीन समोरच्या एका झाडाखाली थांबली. मी धावत धावतच गेलो तिच्याकडे. एकदम भारी दिसत होती. (किती वेळा सांगणार मी हे तुम्हाला) पावसात भिजलेली ती, चेहर्यावरून ओघळणारे पावसाचे ते थेंब, थोडीशी गोंधळलेली. खुप छान दिसत होती राव. पुन्हा एकदा मी स्वतःला सावरल आणि तिला विचारल मग काय करणार आहेस आता??? कैंटीन मध्ये जाणार आहेस का??? ह्यावर तीच उत्तर एकदम भारी होत. ती बोलली की, ह्या पावसात वाफळलेला  चहा पिण्याची मजा काही औरच असते पण आपल्या कैंटीन मधल्या चहाला ती चव नाही. माझ्यासाठी हे उत्तर पुरेस होत. मी तिला २ मिनिट थांबण्यास सांगितल. मी विरजाला कॉल केला आणि त्याच्याकडून बाइक घेतली आणि आम्ही निघालो. पावसाचा जोर काही कमी होत नव्हता.

साधारण १५-२० मिनिटांनी आम्ही त्या जागेवर आलो. त्या जागेबद्दल सांगायच झाल तर. ते काही होटेल बिटेल नव्हत. एक शेड टाकलेली पत्र्याची टपरी. समोर तलाव आणि टपरी पर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी गर्द झाड़ींनी आच्छादलेला. पावसात जर तुम्ही इथे आलात तर "धुक्यात हरवलेली एक वाट" अस तुम्ही या जागेच वर्णन करू शकता. पावसाचा जोर आता पर्यंत कमी झाला होता. मी, योगी, विरजा, सई, ग्रीथा आठवड्यातून एकदा तरी इथे येयचो. मी चहाची आर्डर दिली आणि बाइकपाशी आलो. बघतो तर काय ह्या मैडम गायब. नीट शोधल तर तलावापाशी उभी होती. मी ही तिच्या शेजारी जावून उभा राहिलो. एक वेगळीच शांतता होती तिथे. शहराच्या गोंगाटा पासून एकदम दूर. पुढचे १० मिनिटे आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही. नंतर तिने मला विचारल की, तू नेहमी येतोस इथे??? किती मुलींना आज पर्यंत घेवुन आला आहेस इथे??? तिच्या ह्या प्रश्नावर मला खुप हसू आल. नेहमी खुप बडबड करणारी ही मुलगी आज खुप शांत होती. बहुतेक ह्या जागेचाच असर झाला असावा तिच्यावर.

तो पर्यंत टपरीवाला चहा घेवुन आला. तिला बोललो चहा घे पहिला नंतर बोलू आपण. टपरीवरचा चहा ती पहिल्यांदाच पित असावी हे तिच्या चहा पिण्याच्या स्टाइलकडे पाहून वाटल. चहाचा चटका बसु नये ह्यासाठी ग्लास कसा पकडावा ह्या विचारात होती ती. थोड्या वेळाने चहा थंड झाल्यावर तिने आपले प्रयत्न थांबवले. हे सर्व पहाताना मला हसू काही आवरत नव्हत. अभी हसू नकोस हे जेंव्हा ती रागाने बोलली तेंव्हा मी आवरत घेतल. पुन्हा ५ मिनिटे अशीच शांतता. तिने मला पुन्हा विचारल, आपल्या दोघांमध्ये नक्की काय चालू आहे??? उत्तर तस कठीण होत. पण मी तिला बोललो की, हे तू न समजण्या एवढी काही लहान नाही आता. बहुतेक तिला अपेक्षित उत्तर आता भेटल होत. फ़क्त औपचारिकता बाकि राहिली होती. (तुम्हाला कळलच असेल मला काय बोलायच आहे ते) मी तिला थोड्या वेळाने बोललो की मैडम १२ वाजत आले आहेत, तुमच्या लेक्चरची वेळ झाली. आम्हा दोघांना तिथून निघावस वाटत नव्हत पण उशीर झाला होता आणि मला कामाला जायच होत.

तिथून निघताना ग्रीथाचा कॉल आला. ती सांगत होती की, सई रिसेस नंतर लेक्चरला आली नाही. तिला कॉल करत आहोत आम्ही पण ती कॉल उचलत नाही आहे. मी लगेच सई ला कॉल केला पण माझाही कॉल ती उचलत नव्हती. तिच्या घरी फ़ोन केला तर घरीही कोणी फ़ोन उचलत नव्हत. मी कॉलेजला राशीला सोडल आणि ग्रीथाला येवून भेटलो. ग्रीथा बोलली की रिसेस नंतर ती लेक्चरला नाही आली, लायब्ररी मध्ये गेली होती. पण ती नाही आहे आता तिथे. योगी आणि विरजा तिला कॉलेजमध्ये शोधत आहेत. हे पाहिल आणि मी तिच्या घरी जाण्याच ठरवल.

क्रमशः (उरवरित भाग पुढच्या पोस्टमध्ये)

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत    

Monday, January 10, 2011

कॉलेज आठवणी - भाग १

सकाळचे ६ वाजले होते. खडबडून जागा झालो. कॉलेजच पहिल लेक्चर अटेंड करायच होत. कसाबसा धावत पळत कॉलेजला आलो. ऐन जुलाईचा महिना होता. पाउस मूसळधार कोसळत होता. लेक्चरला बसलो पण १० मिनिटे उशीर झालाच होता. लेक्चर संपले आणी रिसेसला कैंटीन मध्ये आलो. खुप भूक लागली होती. पाहिल तर माझ्या ग्रुपने अगोदरच जागा पकडून ठेवली होती. माझा ग्रुप तसा ५ जणांचा. अभिजीत a.k.a. अभी (म्हणजे मी), योगराज a.k.a. योगी, विराज a.k.a. विरजा, सायली a.k.a. सई आणी ग्रीथा. (हिला काही टोपण नाव नव्हत.) कैंटीन मध्ये फुल ऑन धमाल चालू होती. आम्ही ५ जण असलो म्हणजे विचारू नका, फुल ऑन टाइमपास. कॉलेज सुटल्यावर भेटायच ठरल आणी मी रिसेस नंतरच्या लेक्चरला निघून गेलो.

१२ वाजता मी कॉलेज कैम्पस मध्ये आलो. हे सर्वजण होतेच. येणार्या फ्रेंडशिप डे ला आम्ही कॉलेज सुटल्यानंतर वाटर रेसोर्ट ला जाण्याचा प्लान बनवला. मी तसा सहसा प्लान मध्ये शामिल होत नसे कारण कॉलेज सुटल्यानंतर मी पार्ट टाइम नोकरी करत असे. पण मी सुट्टी घेण्याच ठरवल. १ वाजत आला तसा मी सर्वांचा निरोप घेतला आणी निघालो. गेट मधून बाहेर जाताना एक मुलगी मला पास ऑन झाली, मी मागे वलून पाहिल आणी तिनेही. जस्ट आम्ही एकमेकांना पाहिल आणि निघून गेलो.

दुसऱ्या दिवशी असच कैंटीन मध्ये टाईमपास करत बसलो होतो. थोड्या वेळाने काल जिला पाहिल होत, ती तिच्या ग्रुप सोबत कैंटीन मध्ये आली. आमच्या बाजुच्या टेबल वरती त्यांची फुल ऑन मजा मस्ती चालू होती. मी विरजा ला म्हंटल काय भारी दिसत आहे यार ती.....अगोदर कधी हिला पाहिल नाही रे??? कुठे होती ही??? आम्ही दोघे त्या ग्रुप मधल्या मुलींना बघत आहोत हे सई आणि ग्रीथा च्या लक्षात आल. ग्रीथा ने विरजा ला एक चापटी मारली. पण विरजा कसला ऐकतो तिला, त्याच मुलींना टापण चालूच होत. सई ने एक कटाक्ष टाकुन त्या मुलीकडे आणि नंतर माझ्याकडे पाहिल. तस मी स्वतःला आवरत घेतल आणि विरजा ला बोललो खुप झाल आता, नाही तर इथे कोणाचा तरी खून होइल. ह्या जोक वरती ग्रुप मधल वातावरण थोड हलक झाल. पण मला आणि योगी ला हे कळल नाही की ग्रीथाने विरजा ला चापटी का मारली???

त्या दिवसापासून विरजाला गप्प करण्यासाठी आम्हाला ग्रीथा हे नाव पुरेस होत. एकदिवस शनिवारी मी कॉलेज लायब्ररी मध्ये आलो होतो, एका प्रोजेक्ट संबधी मला काही नोट्स हव्या होत्या. नोट्स काढत होतो, तेवढ्यात कैंटीन मध्ये मी जिच्याकडे पाहत होतो ती माझ्या समोर येवून उभी राहिली. मी २ क्षण तिच्याकडे पाहताच राहिलो. दिसायला सुंदर. बोलके डोळे. डोळ्यावरचे आयब्रोज नीट कोरलेले. ओठावरची फेंट रंगाची लिपस्टिक. पंजाबी ड्रेस घातला होता तिने. पांढरया रंगाचा एम्ब्रॉयडरीवाला स्लीवलेस टॉप, बेबी पिंक रंगाचा पायजमा आणि त्याच रंगाची ओढणी. केस हलकेसे ब्राउन रंगाचे व्यवस्थित सेट केलेले. कानात सिल्वर रंगाचे झुमके. एका हातात पुस्तके, बघतो तर काय नेलपेंट पण बेबी पिंक रंगाची. हातातल घड्याळ पांढरया रंगाच. हातातल्या बांगड्या सुद्धा सिल्वर रंगाच्या आणि पायातली सेंडल सुद्धा त्याच रंगाची. स्वतःला कसबस सावरल आणि प्रश्नार्थक चेहर्याने तिच्याकडे पाहिल. तिने स्माइल केल आणि मी इथे बसु का अस विचारल. मी म्हंटल, ठीक आहे.

थोड्या वेळाने आम्ही कम्फर्टेबल झालो आणि बोलण सुरु झाल. तिने सांगण्यास सुरवात केली की तिने कधी एडमिशन घेतली, कुठल्या इयर ला आहे, कॉलेज व्यतिरिक्त काय करते. खुप बोलत होती राव ती. मी माझ नोट्स काढण बाजूला ठेवल आणि फ़क्त तीच ऐकत बसलो. खरतर ती काय बोलत आहे त्याकडे माझ लक्षच नव्ह्त. पण मधून मधून मी तीच ऐकत आहे हे दाखवण्यासाठी उगाचच समजल्याचे हावभाव तिला दाखवत होतो. अर्धा पाऊण तास बडबड करून झाल्यावर तिला कळल की आपण जास्तच बोलत आहोत. मग तिने मला बोलायला संधी दिली. मी विचार करत बसलो की कसली मुलगी आहे ही राव. थोड्या वेळाने तिच्या लेक्चरची वेळ झाली आणि ती निघाली. मी तिला लायब्ररी बाहेर सोडण्यास गेलो. जाताना तिने मला एक प्रश्न विचारला की, त्या दिवशी तू कैंटीन मध्ये माझ्याकडे का बघत होतास??? उत्तर ऐकण्यासाठी ती थांबली नाही, स्माइल करून निघून गेली. मी पुन्हा एकदा स्वतःला सावरल आणि नोट्स काढण्यासाठी लायब्ररी मध्ये आलो.

आयुष्यात एक नवा मोड़ आला होता. मी विरजा ला आणि योगी ला कॉल केला, संध्याकाळी आम्ही तिघे ८ च्या सुमारास आमच्या नाक्यावर आलो.

क्रमशः (उरवरित भाग पुढच्या पोस्ट मध्ये.)

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत 

Wednesday, January 5, 2011

एक भयाण रात्र.....

काल रात्री १२ वाजता घराबाहेर पडलो. बाइक काढली आणि राउंड मारायला गेलो. थोडा पुढे गेलो तर लक्षात आल की पेट्रोल संपत आल होत. म्हंटल पेट्रोल पंप वर जावून पेट्रोल भरुया पण पेट्रोल पंप साधारण ३ किलोमीटर लांब होत. वाटल बाइक चालेल तो पर्यंत पण कसल काय अर्ध्या वाटेत बाइक बंद पडली. आता पेट्रोल पंप पर्यंत मला बाइक रेटत न्यावी लागणार होती. शिव्या घालत बाइक वरून उतरलो. आता पर्यंत मी स्वतःच्याच तंद्रित होतो. बाइक वरून उतरल्यावर माझ्या लक्षात आल की त्या रस्त्यावर कोणी चिटपाखरू ही नव्हत. माझा नेहमीचा पाया खालचा रस्ता पण आज काही तरी वेगळ वाटत होत.

पेट्रोल पंप कडे जायला २ रस्ते होते. मी शोर्टकट निवडला कारण मला बाइक घेवुन जायच होत. आजुबाजुला कोणी दिसतय का ते पाहत होतो. कोणाची मदत भेटली असती तर बर झाल असत. पण कोणीच नाही त्या रस्त्यावर. मला स्वतःचाच राग येत होता. घरून निघताना का नाही मी चेक केल की बाइक मध्ये किती पेट्रोल आहे ते??? रस्ता पाया खालचाच होता म्हणून मला माहीत होत की मी १० मिनिटात पेट्रोल पंप वर पोहचेन. घरी येयला उशीर होईल हे सांगण्यासाठी मी मोबाईलच्या खिशात हात टाकला. बघतो तर काय मी मोबाईल घरीच विसरलो होतो. आता घरी गेल्यावर माझ काही खर नव्हत. अगोदरच रात्रीचा पाऊण वाजला होता. घरी जायला उशीर नको व्हायला म्हणून मी जलद गतीने चालण्यास सुरवात केली. पण बाइक घेवुन एवढ्या जलद गतीने चालण मला जमत नव्हत. कसाबसा मी बाइक रेटत होतो.

थोड्या वेळाने मला पाठून कोणी तरी चालत येत असल्याची चाहुल लागली. मी पाठी पाहिल तर माझ्यापासून १० फुट अंतरावर  एक बाई माझ्या दिशेने चालत येत होती. मी त्या रस्त्यावर एकटाच नाही आहे हे पाहून मला बर वाटल. पण क्षणार्धात ह्रुदयात भीतीने एकदम धस्स झाल. कोण आहे ही बाई??? एवढ्या रात्री ती काय करत आहे इथे??? असंख्य प्रश्नांनी डोक्यात काहूर माजवल. आता पाठी वलून पाहण्याचही धाडस होत नव्हत. तिरक्या डोळयाने मी तिचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होतो. आता आजुबाजुची भयाण शांतता माझ्यावर हावी झाली होती. मला काही झाल तरी लवकरात लवकर पेट्रोल पंप वर पोहचायच होत. थंडीतही मला दरदरून घाम फुटला होता. हा रस्ता संपत का नाही आहे म्हणून मी घड्याळा कडे पाहिल आणि जागच्या जागीच स्तब्ध झालो. घड्याळात रात्रीचा १.३० वाजला होता, म्हणजे गेला पाऊण तास मी ह्याच रस्त्यावर चालत होतो. सगळ गणित चुकत होत. अस का होत आहे हे समजायला ही काही मार्ग नव्हता. खर तर मी १० मिनिटात पेट्रोल पंप वर पोहचायला  पाहिजे होतो. काही तरी भयानक होणार आहे याची मला चाहुल लागली होती.

एक तर रात्रीचा १.३० वाजला होता. थंडी आता जाणवायला लागली होती. त्या रस्त्यावर एक वेगळीच शांतता पसरली होती. रस्त्यावर जरी अंधुक प्रकाश असला तरी आजुबाजुला भयाण अंधार होता. मी पूर्णपणे घाबरलो होतो. माझ्या चेहर्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. पुढच्या क्षणाला काय होइल याचा बिलकुल अंदाज नव्हता. तेवढ्यात मला वाटल की माझ्या पाठून कोणीतरी धावत येत आहे. मी पाहतो तर काय??? जी थोड्या वेळापूर्वी पाहिली होती तीच बाई. ती अचानकपणे अशी धावत येताना पाहून माझी बोबडिच वळली. एक तर तिचा पांढरा फट चेहरा, बुबूळ नसलेले डोळे, मोकळे सोडलेले केस पहातच मी बाइक तशीच तिथे टाकली आणि धावत सुटलो. साधारण मी १० मिनिटे धावत होतो तरीही ती माझा पाठलाग सोडायला तयार  नव्हती. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आल की पाठी कोणी नाही आहे. मी एकटाच पळत आहे.

पाठी कोणीही नाही आहे हे पाहून जिवात जीव आला. मगाशी जे झाल तो माझा भास होता का ते खर होत??? खरच कोणी बाई माझा पाठलाग करत होती??? आणि हे जर खर असेल तर आता ती कुठे आहे??? भीतीने मी पूर्णपणे रडकुंडीला आलो होतो. आता मला काही झाल तरी घरी जायच होत. घरचे आतापर्यंत मला शोधायला बाहेर निघाले असतील याची मला कल्पना होती. आता मी स्वतःला थोड सावरल. मगाशी जिथे मी बाइक टाकली होती त्या जागेवर आलो. बाइक उचलून रस्त्याच्या कडेला लावली. आता मी बाइक तिथेच ठेवणार होतो आणि ज्या दिशेने आलो त्याच दिशेने धावत सुटणार होतो. घड्याळात पाहिल तर रात्रीचे २ वाजले होते.

पण निघताना माझ्या हे लक्षात नाही आल की, जिथे मी बाइक उभी केली होती, तिथे त्याच बाइक वरती ती बाई बसली होती. मी माझ्या घराच्या दिशेने धावायला सुरवात केली. थोड्या वेळातच मला कळल की ती बाई परत माझ्या पाठी धावत येत आहे.  हे पाहून मला वाटल की ती आता मला सोडणार नाही. मी माझ्या आयुष्याच्या काही शेवटच्या घटका मोजत आहे. मला जीवंत  राहायच होत म्हणून मी माझ्यातली सर्व शक्ति एकवटली आणी वेड्यासारखा पळत सुटलो. साधारण १ तास मी पळत होतो.

आता मला माझ घर दिसायला लागल होत. माझ्या जिवात जीव आला. शेवटच ३० फुटांच अंतर मला कसही करून पार करायच होत. ती काही केल्या माझा पाठलाग सोडायला तयार नव्हती. मी परत जिवाच्या आकांताने धावलो. मी घरात पाऊल टाकणार तेवढ्यात तिने मला धरल आणी फरफटत घेवुन जाऊ लागली. मी हतबलपणे तिच्या विद्रूप चेहर्याकडे पाहत होतो. तिच्या चेहर्यावरचा तो आनंद मला मारण्याचा काही औरच होता. मी मला वाचवण्याचे सगळे प्रयास थांबवले.

मरणाला सामोर जाताना प्रत्येकाला भीती वाटते. तशी मलाही वाटत होती. पण तिचा चेहरा जेवढा भयानक होता, तेवढ भयानक मरण असेल अस मला वाटल नाही. ती मला जिन्यांवरून फरफटत गच्चीवर घेवुन जात होती. शेवटच कोणालातरी हाक मारावी मदतीसाठी अस वाटत होत पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते. माझी तडफड पाहून तिच्या चेहर्यावर एक वेगळच स्मित हास्य उमटल होत. तिने मला गच्चीच्या कठड्यावर उभ केल. त्या वेळेस माझ्या डोळयात कुठली भीती नव्हती. चेहर्यावर कुठले भाव नव्हते. हे पाहून तिला माझा जास्त राग आला आणी तिने मला खाली ढकलून दिले.

खाली पडताना अचानक माझे डोळे उघडले आणी मी झोपेतून जागा झालो. हे एक स्वप्न होत हे जेंव्हा मला कळल, तेंव्हा माझा जीव भांड्यात पडला. घड्याळात पाहिल तर पहाटेचे ५ वाजले होते. पहाटे पडलेली स्वप्न तशी खरी होतात की. :) दुसऱ्या दिवशी सकाळी थोड काम होत म्हणून घराबाहेर पडलो. काल रात्री ज्या रस्त्यावर धावत होतो, त्या रस्त्यावर गेलो. बघतो तर काय??? काल ज्या ठिकाणी मी माझी बाइक पार्क केली होती, ती आज त्याच ठिकाणी उभी होती.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Monday, January 3, 2011

ती मला कधी भेटेल का?????

नविन वर्ष सुरु झाल. गेले दोन तीन दिवस फुल ऑन एन्जॉय चालू आहे. कधी पार्टी तर कधी मूव्ही. तेंव्हा लिहिण्यास काही वेळ भेटला नाही. पुण्याहून पाहुणेही आले होते घरी. आणि पुणे म्हंटल की खुप साऱ्या आठवणी डोळयासमोर येतात. त्यातलीच एक हृदयाच्या खुप जवळ असलेली आठवण.

ऑरकुट वरची माझी एक मैत्रिण पुण्याला रहायला होती दोन तीन वर्षापूर्वी. बघायला गेल तर आम्ही एकमेकांसाठी तसे अनोळखीच. मी मुंबईचा, ती पुण्याची. पण कालांतराने आमची मैत्री वाढत गेली. काही चांगल होयच असेल तर होतच की हो. स्क्रैप थ्रू आम्ही बोलायचो. पण एक वेगळीच मजा होती. वन वे ट्राफिक नव्हत. :) मला जेवढ आवडायच तिच्याशी बोलायला, तेवढच तिला ही आवडायच. मी जेवढा इंटरेस्ट घेयाचो तिच्याशी बोलण्यात तेवढाच ती ही घेयची. कुठे ना कुठे आम्ही जवळ येत होतो. तशी ती खरी गुजरात (अहमदाबादची), पण पुण्याला ती शिकत होती. एक वेगळीच ओढ़ मला तिच्याबद्दल वाटू लागली होती. कधी कधी मैत्री आणि प्रेम ह्यातली रेषा अधिकच पुसट होत जाते.

एक दिवशी मी ऑरकुट लोगिन केल तिचा स्क्रैप आला आहे का हे पाहण्यासाठी. पण त्यादिवशी तिचा एकही स्क्रैप नव्हता. मी माझी फ्रेंड लिस्ट चेक केली तर ती फ्रेंड लिस्ट मध्येही नव्हती. तिने तीच ऑरकुट अकाउंट डिलीट केल होत. काय माझी स्थिति झाली असेल त्यावेळेस हे तुम्ही समजू शकता. पण मला खरा राग आला होता तो एका गोष्टीचा की तिने मला सांगितल नाही अकाउंट डिलीट करताना. मी मनाला समजावल की, तिला गरज नाही माझी तर मलाही नाही गरज तिची.

नंतर मी माझ्या लाइफ मध्ये बिझी होवून गेलो. कधी कधी विचार येयचा की का केल तिने अस??? पण उत्तर सापडायच नाही. ती आयुष्यातून निघून गेली होती पण आठवणीतून जायला काही तयार नव्हती. मला काही झाल तरी ती अशी का निघून गेली याच उत्तर हव होत. मला होणारा त्रास एखाद वेळेस देवालाही कळला असेल. दहा पंधरा दिवसां नंतर मी एकदा माझे इ-मेल चेक करत होतो. तेव्हा मी तिचा मेल पहिला. दहा पंधरा दिवसां अगोदराचा तो मेल होता. म्हणजे ज्या दिवशी तिने तीच अकाउंट डिलीट केल होत, त्याच दिवशी तिने मला मेल केला होता, हे सांगण्यासाठी की ती हे अकाउंट का डिलीट करत आहे. हे पाहिल्यावर मला स्वतःचाच खुप राग आला होता. मी का नाही माझे इ-मेल चेक केले अगोदर. का एवढा वेळ लावला तिच्या इ-मेल ला रिप्लाय देयला??? ती ही माझ्या रिप्लायची वाट पाहत बसली असेल ना. ती पोस्ट ग्रेजुएशनसाठी ohio, USA ला जाणार होती. ohio university मध्ये तीच एडमिशन झाल होत. तिथे ऑरकुट चालत नाही म्हणून तिने तीच अकाउंट डिलीट केल होत.

ह्या गोष्टीला ३-४ वर्ष उलटून गेली असतील. ते ऑरकुट अकाउंट, तो इ-मेल अकाउंट कालांतराने मी डिलीट करून टाकला. आज माझ्याकडे तिच्याशी संपर्क साधण्याच एक ही साधन नाही. तिने मला कधी शोधण्याचा प्रयत्न केला असेल की नाही हे मला माहीत नाही. आज मला हे ही माहीत नाही की ती कुठे आहे??? हे ही माहीत नाही की ती हा ब्लॉग कधी वाचेल की नाही??? ती मला कधी भेटेल की नाही??? पण आठवणी मध्ये ती कुठेनाकुठे नेहमीच असेल.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत

Sunday, January 2, 2011

नये साल का आगाझ है कुछ ऐसा.....

नये साल का आगाझ है कुछ ऐसा
सर्द मौसम में प्यार का पैगाम है कुछ ऐसा
एक बार फिर दिल झूम उठा है कुछ ऐसा
शायद आनेवाली खुषियोंका इंतजार हो जैसा.


अभिजीत