Tuesday, January 11, 2011

कॉलेज आठवणी - भाग २

संध्याकाळी ८ च्या सुमारास आम्ही नाक्यावर आलो. विरजा नाचत नाचतच आला. योगी गाड़ी पार्क करून येत होता. विरजा चा पहिला प्रश्न, कुठे बसायच??? योगी आल्यावर मी सकाळी जे घडल ते त्यांना सांगितल. विरजा ला हे कारण पुरेस होत पार्टीसाठी. मी त्यांना बोललो की अजुन कशात काही नाही कशाला आताच पार्टी करायची??? आपण वाटर रेसोर्ट ला जाणार आहोत तेंव्हा करुया की फुल ऑन पार्टी. पण माझ काही ह्या लोकांनी ऐकल नाही आणि आम्ही आमच्या ठरलेल्या ठिकाणी पार्टी साठी आलो. विरजा सोबत असला की १२ - १ वाजे पर्यंत पार्टी चालणार हे निश्चित. रात्री १ वाजता घरी जावून सकाळी कॉलेजला जायच म्हणजे आमच्या जिवावर येयच. पण नशीब शनिवार होता. मग काय एकदम जल्लोषातच पार्टी केली की. विरजाच एकीकडे चालू होत की, यार तेरी तो निकल पड़ी...अब मेरे लिए कोई धुंड...उसकी कोई फ्रेंड रहेगी अच्छी.....तेंव्हा योगी बोलला, तेरी तो पहेलेसे है यार.....ग्रीथा. हे ऐकून आमची हसता हसता पुरेवाट लागली.

रात्री १ वाजता घरी आलो. आज लायब्ररी मध्ये घडलेल्या प्रसंगाचा विचार करतच झोपी गेलो. सकाळी उशिरा उठलो. नाश्ता करत होतो, तेवढ्यात मोबाईल वरची रिंग वाजली. बघतो तर काय, सई चा फ़ोन. मनात विचार आला, हिने कशाला कॉल केला आता??? काल पार्टी केली हे हिला कळल वाटत. फ़ोन उचलला, काय झाल आहे हे ऐकण्यासाठी. पण नशीब तिला पार्टीच काही माहीत नव्हत. दुपारी भेटायचा प्लान तिने आखला होता. सर्वांची मंजूरी देवून झाली होती, फ़क्त मीच उरलो होतो. तिने मला विचारल नाही तर मला सांगितल की, तू ह्या ह्या वेळेस ह्या ह्या ठिकाणी येणार आहेस. ठरल्या प्रमाणे सर्वजण भेटलो. फुल ऑन टाइमपास झाला. रविवार पूर्णपणे सार्थकी लागला. विरजा ने काल लायब्ररी मध्ये जे घडल ते सई आणि ग्रीथा ला सांगितल. आता माझ त्या मुली सोबत काही होण्या आधीच त्याची चर्चा पूर्ण ग्रुप मध्ये होती. मला विरजाचा राग आला होता आणि बदला घेण्यासाठी ग्रीथा हे नाव पुरेस होत. त्यात योगी ने काल झालेल्या पार्टीचा विषय काढला आणि ग्रीथा ने asusual विरजाला चापटी मारली.

घरी आलो. कधी झोप लागली कळल नाही. सकाळी लेक्चर्स अटेंड करून आम्ही कैंटीन मध्ये बसलो होतो. साधारण पणे ह्याच वेळेस ती तिच्या ग्रुप सोबत कैंटीन मध्ये येत असे. मी ती येण्याची वाट पाहत होतो. सई ने शेवटी विचारल की कोणाची वाट पाहत आहेस??? आणि मी बोलून चुकलो की, राशी. सई ला कळल होत की, राशी मला आवडते. सई ने विचारल, ह्या वेळेस तरी सीरियस का??? पण माझ उत्तर नेहमी सारखच ठरलेल, माहीत नाही. कारण अजुन कशात काही नव्हत. थोड्या वेळाने सई आणि ग्रीथा लेक्चरला निघून गेल्या. तेवढ्यात राशी चा ग्रुप तिथे आला पण ती नव्हती ग्रुप मध्ये. तिच्या ग्रुप मधल्यांना विचारणार तरी कस??? विरजा तयार झाला होता विचारायला पण त्याला योगी ने अड़वल. बर झाल. विरजा ने नीट विचारल तर ठीक नाही तर राडे घालणार हा तिथे. हे आम्हाला माहीत होत. आम्ही तिघेही लेक्चरला जाण्यासाठी निघालो. कैंटीन मधून बाहेर येत नाही तर समोरून राशी येत होती. हे पाहून विरजा आणि योगी ने तिथून कलटी मारली.

मुसळधार पाउस पडत होता. मी कसबस रेनकोट चढवल. मला येताना पाहून ती कैंटीन समोरच्या एका झाडाखाली थांबली. मी धावत धावतच गेलो तिच्याकडे. एकदम भारी दिसत होती. (किती वेळा सांगणार मी हे तुम्हाला) पावसात भिजलेली ती, चेहर्यावरून ओघळणारे पावसाचे ते थेंब, थोडीशी गोंधळलेली. खुप छान दिसत होती राव. पुन्हा एकदा मी स्वतःला सावरल आणि तिला विचारल मग काय करणार आहेस आता??? कैंटीन मध्ये जाणार आहेस का??? ह्यावर तीच उत्तर एकदम भारी होत. ती बोलली की, ह्या पावसात वाफळलेला  चहा पिण्याची मजा काही औरच असते पण आपल्या कैंटीन मधल्या चहाला ती चव नाही. माझ्यासाठी हे उत्तर पुरेस होत. मी तिला २ मिनिट थांबण्यास सांगितल. मी विरजाला कॉल केला आणि त्याच्याकडून बाइक घेतली आणि आम्ही निघालो. पावसाचा जोर काही कमी होत नव्हता.

साधारण १५-२० मिनिटांनी आम्ही त्या जागेवर आलो. त्या जागेबद्दल सांगायच झाल तर. ते काही होटेल बिटेल नव्हत. एक शेड टाकलेली पत्र्याची टपरी. समोर तलाव आणि टपरी पर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी गर्द झाड़ींनी आच्छादलेला. पावसात जर तुम्ही इथे आलात तर "धुक्यात हरवलेली एक वाट" अस तुम्ही या जागेच वर्णन करू शकता. पावसाचा जोर आता पर्यंत कमी झाला होता. मी, योगी, विरजा, सई, ग्रीथा आठवड्यातून एकदा तरी इथे येयचो. मी चहाची आर्डर दिली आणि बाइकपाशी आलो. बघतो तर काय ह्या मैडम गायब. नीट शोधल तर तलावापाशी उभी होती. मी ही तिच्या शेजारी जावून उभा राहिलो. एक वेगळीच शांतता होती तिथे. शहराच्या गोंगाटा पासून एकदम दूर. पुढचे १० मिनिटे आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही. नंतर तिने मला विचारल की, तू नेहमी येतोस इथे??? किती मुलींना आज पर्यंत घेवुन आला आहेस इथे??? तिच्या ह्या प्रश्नावर मला खुप हसू आल. नेहमी खुप बडबड करणारी ही मुलगी आज खुप शांत होती. बहुतेक ह्या जागेचाच असर झाला असावा तिच्यावर.

तो पर्यंत टपरीवाला चहा घेवुन आला. तिला बोललो चहा घे पहिला नंतर बोलू आपण. टपरीवरचा चहा ती पहिल्यांदाच पित असावी हे तिच्या चहा पिण्याच्या स्टाइलकडे पाहून वाटल. चहाचा चटका बसु नये ह्यासाठी ग्लास कसा पकडावा ह्या विचारात होती ती. थोड्या वेळाने चहा थंड झाल्यावर तिने आपले प्रयत्न थांबवले. हे सर्व पहाताना मला हसू काही आवरत नव्हत. अभी हसू नकोस हे जेंव्हा ती रागाने बोलली तेंव्हा मी आवरत घेतल. पुन्हा ५ मिनिटे अशीच शांतता. तिने मला पुन्हा विचारल, आपल्या दोघांमध्ये नक्की काय चालू आहे??? उत्तर तस कठीण होत. पण मी तिला बोललो की, हे तू न समजण्या एवढी काही लहान नाही आता. बहुतेक तिला अपेक्षित उत्तर आता भेटल होत. फ़क्त औपचारिकता बाकि राहिली होती. (तुम्हाला कळलच असेल मला काय बोलायच आहे ते) मी तिला थोड्या वेळाने बोललो की मैडम १२ वाजत आले आहेत, तुमच्या लेक्चरची वेळ झाली. आम्हा दोघांना तिथून निघावस वाटत नव्हत पण उशीर झाला होता आणि मला कामाला जायच होत.

तिथून निघताना ग्रीथाचा कॉल आला. ती सांगत होती की, सई रिसेस नंतर लेक्चरला आली नाही. तिला कॉल करत आहोत आम्ही पण ती कॉल उचलत नाही आहे. मी लगेच सई ला कॉल केला पण माझाही कॉल ती उचलत नव्हती. तिच्या घरी फ़ोन केला तर घरीही कोणी फ़ोन उचलत नव्हत. मी कॉलेजला राशीला सोडल आणि ग्रीथाला येवून भेटलो. ग्रीथा बोलली की रिसेस नंतर ती लेक्चरला नाही आली, लायब्ररी मध्ये गेली होती. पण ती नाही आहे आता तिथे. योगी आणि विरजा तिला कॉलेजमध्ये शोधत आहेत. हे पाहिल आणि मी तिच्या घरी जाण्याच ठरवल.

क्रमशः (उरवरित भाग पुढच्या पोस्टमध्ये)

चला, निरोप घेतो. परत भेटूच.


अभिजीत    

1 comment:

  1. waaa...dukyat haravaleli vat thana east madhe ahe ka west madhe?

    ReplyDelete