Saturday, September 18, 2010

काही क्षण.....

२ आठवडया पूर्वी बँकेत गेलो होतो, थोड काम होत. बँकेची स्लिप भरली आणि रांगेत उभा राहिलो. महिन्याचा पहिलाच आठवडा होता, बँकेत खुप गर्दी होती. सगळी pensioners माणस रांगेत उभी होती. गर्दी पाहून विचार केला की जावू दे नंतर येवू कधीतरी. पण आई ने सांगितलेल काम होत म्हणून गप्प उभा राहिलो रांगेत. साधारण माझा ११ वा किंवा १२ वा नंबर होता. काउंटर वर बसलेली बाई एवढ्या सावकाश काम करत होती, वाटल आज हयानां कंप्यूटर दिले आहेत तरी ही एवढा वेळ लागतो, मग काय फायदा, त्या पेक्षा जुन्या पद्धतीनेच काम करा ना, कशाला हवेत computers. जावून दे हा काही माझा मुददा नाही बोलायचा. रांग एकदम सावकाश पुढे सरकत होती. स्वतःशीच बोलत होतो, काय कराव आता?? वेळ पण काही जात नाही. मग उगाचच इकडे तिकडे पाहू लागलो. तेंव्हा माझ सहजच लक्ष गेल.

माझ्या पुढे १,२ माणस सोडून, एक मुलगी आणी तिच्या पुढे एक मुलगा उभा होता. तो अशा direction मध्ये उभा होता की त्या मुलीला पाहू शकेल. आणि मित्रांनो ह्या मुलाने काउंटर वर त्याचा नंबर येई पर्यंत एकदाही काउंटर कडे वलून बघितल नाही. त्या मुलीला कस इम्प्रेस कराव ह्याच प्रयत्नात तो लागला होता. त्याच्या एखाद दुसरया कमेन्ट वर ती मुलगी हसायची आणि त्याला positive response देयची. म्हणून तो ही खुश होता. तिच्याकडे direct बघता येण शक्य नव्हत म्हणून जस होइल तस तो तिच्या डोळ्यात पहाण्याचा प्रयत्न करत होता. त्याची ही धडपड एखादवेलेस तिला ही समजत होती. म्हणून ती ही smile करून त्याला प्रत्युत्तर देत होती. त्या मुलीची आई, तिथेच एका बाकड्यावर बसली होती. ती ही अधून मधून आपल्या मुली कडे पाहत होती. मधेच मुलगी ही मागे वलून पहायची की आई काय करत आहे. पण त्या मुलाला कोणाचीच काही पडली नव्हती. त्याने आपले प्रयत्न चालूच ठेवले. हे सगळ पाहत असताना, मला एक सुंदर आवाज कानावर आला.

एक मुलगी आणि कोणतरी तिची मैडम माझ्याच रांगेत पाठी उभ्या होत्या. ती मुलगी (तिच्या मैडमशी) बोलत होती की, आज एवढी गर्दी कशी काय??? मी मागे एकदा जेंव्हा आली होती, तर लगेचच माझा नंबर लागला होता. आज खुपच गर्दी आहे. मी एक काम करते, आपण दोघी एकाच रांगेत उभ राहण्यापेक्षा, मी बाजुच्या रांगेत उभी राहते. अस म्हणून ती माझ्या बाजूच्याच रांगेत आली. बाजुच्या रांगेत ती माझ्या थोड पुढे उभी होती. आता पर्यंत तर फ़क्त मी तिचा आवाज ऐकत होतो. पण मागे वलून पाहण्याच साहस काही माझ्याने होत नव्हत. पण आता ती माझ्या पुढेच उभी होती त्यामुले तिला पाहता येण खुप सोप झाल होत.

मी जेंव्हा तिला पाहिल, तर पहातच राहिलो. खुप सुंदर होती दिसायला. शब्दात वर्णन नाही करू शकणार मी. अस समजा की त्या बँकेत कोणी एक सुंदर मुलगी आहे तर ती हीच आहे. मनात विचार येउन गेला की ही माझी प्रेयसी झाली तर. पण ओळख कशी करणार हो मी तिच्याशी???  मागे तिच्या मैडम उभ्या होत्या. बोलायच झाल तरी बोलणार कस?? मी तिच्याकडे पाहत आहे, हे तिला कळल. म्हणून तिने ही एकदा माझ्याकडे पाहिल. तिने बघून न बघितल्यासारख केल. मी ही असच केल. पण थोड्या वेळाने कधी मी तिच्याकडे पाहत होतो तर कधी ती माझ्याकडे. त्या वेळच्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. खुप भारी फीलिंग असत हे, अनुभवण्यात मजा आहे, सांगण्यात नाही.

या सगळ्यात, वेळ कसा निघून गेला कळल नाही. माझा नंबर आला काउंटर वर. मी त्या मैडम ला स्लिप दिली, asusual बराच वेळ घेतला तिने. बैंक मधल काम संपवून मी बाहेर पडलो. माझ एका xerox च्या दुकानात पण काम होत. ते संपवून मी येत असताना, ती मला पुन्हा दिसली. या वेळेस ती एकटी होती. मी तिच्याकडे पाहिल पण तीच काही लक्ष नव्हत. खुप घाईत होती ती. मी तिला पास ऑन झालो आणि घरी येण्याचा मार्ग पकडला.

आज जेंव्हा मी विचार करतो, तेंव्हा मला अस वाटत, समजा त्या वेळेस मी बैंक मधली गर्दी पाहून तिथून निघालो असतो तर या सर्व क्षणांना मला मुकाव लागल असत. चला मित्रांनो निरोप घेण्याची वेळ आली, परत लवकर भेटूच.

अभिजीत